नेम नाही जया एकादशी व्रत । जाणावे ते प्रेत सर्वलोकी ।।त्याचे वय नित्य काळ लेखिताहे । रागे दात खाय करकरा ।।जगतगुरु संत तुकाराम महाराज वरील अभंग रचनेतून समस्त मानव जातीस आव्हान करतात की जो कोणी माणूस किंवा महिला जन्मास येऊन सुद्धा एकादशी व्रत करत नाही. त्याच्या घरात जवळ तुळस नाही, ह्याच्या घरी एक सुद्धा वैष्णव नाही,हरी नाम नाही, कधीच हरी कीर्तणास जातं नाही अश्या लोकांचे काय होते या अभंगतून महाराज करतात.आणि एकादशी का करावी याचं उत्तर मिळेल वाचकांना मिळेल
नेम नाही जया एकादशी व्रत ।
जाणावे ते प्रेत सर्वलोकी ।।
त्याचे वय नित्य काळ लेखिताहे ।
रागे दात खाय करकरा ।।
जयाचिये द्वारी तुळसी वृंदावन ।
नाही ते स्मशान गृह जाण ।।
जये कुळी नाही एकही वैष्णव ।
त्याचा बुडे भवनदीतापा ।।
विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड ।
प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे ।।
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय ।
कीर्तना नवजाय हरिचिया ।।
================
जगतगुरु संत तुकाराम महाराज वरील अभंग रचनेतून समस्त मानव जातीस आव्हान करतात की जो कोणी माणूस किंवा महिला जन्मास येऊन सुद्धा एकादशी व्रत करत नाही, ती पाळत नाही किंबहुना हा नेम जो चुकवतो तो ह्या उभयलोकात प्रेतासमान आहे हे जाणावे आणि त्याचे शरीर शव आहे असे ओळखावे..
अश्या व्यक्तीवर यम सुद्धा खार खाऊन आणि रागाने दात कराकरा वाजवून क्षणोक्षणी त्याचे दिवस मोजत असतो किंबहुना ते कधी एकदा भरतात ह्याचीच वाट पाहत असतो.
महाराज म्हणतात ज्याची घरी दारा शेजारी तुळशी नाही ते घर म्हशानभूमी सारखी आहे व ज्याच्या कुळात कधी एकही वैष्णव जन्मला नाही त्याचे संपूर्ण कुळ ह्या भवसागरात बुडालेच म्हणून जाणा,
म्हणजेच अशा कुळांतील लोकांचा उद्धार होणे कठीण आहे.
म्हणजेच त्या कुळातील लोकांच्या नशिबी ह्या मृत्युलोकातच येरझाऱ्या घालणे ओघाने येते अर्थात जन्म मृत्यू च्या फेऱ्यात हे अडकले असतात त्याची या कैदेतून सुटका नाही..
तसेच ते म्हणतात की ज्याच्या मुखी कधीही विठ्ठलाचे नाम येत नाही, जो कधीही 'नारायण नारायण' असे म्हणत नाही त्याचे मुख हे मुख नसून चर्मकाचे कुंड आहे हे जाणावे.म्हणजेच त्यास मेलेल्या प्राणांच्या कातड्याचे घर जाणावे.
तुकोबाराय शेवटी म्हणतात की एवढेच नव्हे तर जी व्यक्ती कधीही हरिकीर्तनाला अर्थात भगन, मदिरात किंवा जात नाही किंवा तेथे जाण्याचा विचार देखील तिच्या मनात कधी येत नाही अशा व्यक्तीचे हातपाय हे काष्टाचे/लाकडाचे आहेत हे जाणावे, त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना कधीच उपयोग झाला नाही असे मानावे.
त्याना पाय असून देखील काहीच उपयोग नाही...
Comments
Post a Comment