नाम घेता न लगे मोल । नाममंत्र नाही खोल ।।दोची अक्षरांचे काम । उच्चारावे राम राम ।।नाही वर्णधर्मयाती । नामी अवघीच सरती ।।तुका म्हणे नाम । चैतन्य हे निजधाम ।।
नाम घेता न लगे मोल । नाममंत्र नाही खोल ।।
दोची अक्षरांचे काम । उच्चारावे राम राम ।।
नाही वर्णधर्मयाती । नामी अवघीच सरती ।।
तुका म्हणे नाम । चैतन्य हे निजधाम ।।
संत तुकाराम
वरील अभंगात संत तुकाराम महाराज म्हूणतात देवाच नाव घायला नामस्मरण करायला काही मोल अर्थात पैसें दयावे लागत नाहीत.
आणि कोणतेही नाममंत्र म्हणणे बोलणे काही अवघड कर्म काम नाही.
फक्त दोन अक्षराचे नाम आहे आणि राम राम उच्चारणे येवढच सोप काम आहे.ते करा असं आव्हान महाराज करतात..
पुढे अभंगात महाराज म्हूणतात नाव नाम घेण्यासाठी वेगवेगळ्या किंवा विशिष्ट जाती धर्मात जन्म घेण्याची गरज नाही...
जातीने उच्च व नीच असा मुळीच भेद नसतो..वर्ण भेद नसतो...
मग जो नाम घेतो तो कोणत्याही जाती धर्मातील पंथातील असो नाम घेतल्या आयुष्याचा भव सागर तारला जातो..
महाराज म्हणतात नाम व नामस्मरण हे चैतन्याचे म्हणजेच आत्म्याचे निवासस्थान आहे. त्यामुळे भगवंताला शरण जाऊन फक्त नाम घ्या... तो तुम्हाला तारले शिवाय राहणार नाही... असा संदेश वरील अभंग रचनेतून देला असून आपण सर्वांनी त्याच पालन जरूर कराव .....
संकलन :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment