किल्ले सदाशिवगड किल्ला ब्लॉग नंबर 3

किल्ले सदाशिवगडचा डोंगर सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडपासून ६ कि.मी.वर आहे.


 याची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची) या गावातून या डोंगरावर जाता येते.


संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे १००० पायऱ्या आहेत.

आपण आज या ब्लॉग च्या माध्यमातून अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


सदाशिवगड(कराड)

उंची ३०५० फूट. असून या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. किल्ला चढण्यासाठी सोपा आहे. कराड तालुक्यात शहरापासून जवळच हा किल्ला आहे.ओगलेवाडी व हजार माचीच्या हद्दीत हा किल्ला येत डोंगररांग सुरली घाटाची आहे.

या किल्ल्याचा आपण थोडक्यात इतिहास पाहू.
सदाशिवगडचा डोंगर अफझल खानाच्या वधानंतर (१० नोव्हेम्बर १६५९ ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला असे उल्लेख आहेत.

👉सदाशिवगडावर जाताना वाटेत दुर्गादेवी मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर 7 मोठ्या तोफा वाटेत ठेवल्या आहेत.  ब्रिटिश राजचिन्ह तुटलेल्या अवस्थेचा दगडी भाग ठेवला आहे. सदाशिवगड याविषयी इतिहास सांगणारा फलक मंदिरात लावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मंदिराला 2  वेळा भेट दिल्याची नोंद आहे.


👉कऱ्हाडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटा कडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी *छत्रपती शिवाजी महाराजांनी सदाशिवगड बांधून काढला*.

सदाशिवगडचा अठराव्या शतकातला इतिहास फार रंजक आहे.

👉 सन १७५० मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी-द-ताव्हरने पोर्तुगीज राज्य विस्तारासाठी सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु काही काळाने परत तो सौंधेकरांच्या ताब्यात दिला. सन १७६४ साली हैदर अलीने सौंधेकरांचे राज्य जिंकत सदाशिवगडही मिळविला. सन १७६८ मध्ये पोर्तुगिजांनी हैदरच्या सैन्याकडून सदाशिवगड घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान सौंधेकर राजा पोर्तुगिजांच्या आश्रयास बांदोडा येथे येऊन राहिला. पोर्तुगिजांनी सौंधेकरास हैदर अलीकडून राज्य परत मिळवून देण्याचा करार केला होता. परंतु पोर्तुगीज राज्य परत मिळवून देण्याच्या बाबतीत बराच काळ स्वस्थ बसले. तेव्हा सौंधेकराने पुणे दरबारात पेशव्यांशी पत्र व्यवहार करून राज्य हैदरकडून परत मिळविण्यासाठी विनंती केली. तेव्हा पेशव्यांनी सौंधेकरांस पुण्यास वास्तव्यास येण्याचे कळविले. ही गोष्ट पोर्तुगिजांना कळल्यावर सौंधेकर राजास पुण्यास जाण्यास प्रतिबंध केला आणि पोर्तुगीज देत असलेल्या तनख्यावर कायमस्वरूपी बांदोडा येथेच राहावे, असा करार करून घेतला. हा करार होण्यापूर्वीच पोर्तुगिजांनी टिपू सुलतानच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन सदाशिवगड ताब्यात घेतला. २४ जानेवारी १७९१ रोजी पेशव्यांच्या आरमाराने पोर्तुगिजांकडून किल्ला जिंकून घेतला. पण लगेच ३० जानेवारीस परत पोर्तुगिजांनी ताब्यात घेतला. तेव्हा पुणे दरबारातून पोर्तुगिजांस सदाशिवगड ताब्यात घेतल्याबद्दल समज देण्याविषयी अनेक पत्रे आली. परंतु पोर्तुगिजांनी आपण सौंधेकरांसाठी सदाशिवगड ताब्यात घेतला आहे असे कळवले. पण पोर्तुगिजांना हा किल्ला काही सौंधेकरांना द्यायचा नव्हता. पोर्तुगिजांनी सदाशिवगड ताब्यात घेतल्यापासून पुढे दीड वर्ष पुणे दरबारातून सदाशिवगडाविषयी बरेच राजकारण झाले. पेशव्यांचे सरदार पर शुरामभाऊ पटवर्धन टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमेनिमित्ताने कारवार भागात आले होते. तेव्हा त्यांनी आणि काणकोण भागातील देसाई निळू नाईक यांनी पोर्तुगिजांकडे सदाशिवडगडाबाबत बरेच राजकारण केले. परंतु पोर्तुगिजांनी टिपू सुलतानशी स्नेह संबंध वाढवून टिपूस सदाशिवगड देण्याचे ठरविले. तेव्हा परशुराम भाऊंबरोबर पेशव्यांचे आरमार दर्यासारंग बाबूराव साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कारवारजवळच होते. मराठा आरमाराने सदाशिवगडावर हल्ला करत सदाशिवगड ताब्यात घेतला. परंतु पुढे लवकरच टिपू आणि पेशवे यांच्यात तह झाला. तहाच्या अटीनुसार सदाशिवगड परत टिपूस मिळाला. पुढे लवकरच इंग्रजांनी टिपूचे राज्य जिंकले. त्यात सदाशिवगडही मिळाला. सदाशिवगडाच्या अलीकडे पोळे येथे पोर्तुगिजांची चौकी पोर्तुगीज ब्रिटिश राज्यांची सीमा बनली. वरील सर्व घडामोडींत अठराव्या शतकातील राजकारण किती अस्थिर होते हे कळते. या सर्व राजकारणाचा साक्षीदार सदाशिवगड मात्र फार थोड्या अवशेषांसह शिल्लक आहे.


👉सध्या गडावर महादेवाचे प्रशस्त मंदिर आहे,तिथे भाविकांचा नेहमी दर्शनासाठी गर्दी करतात.


👉समोर एक आड(चौकोनी विहीर) असून त्यात १२ महिने पाणी असते



👉 शेजारीच मारुतीचे छोटेसे देऊळ आहे.

👉 बाकी गडावर किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. काही ठिकाणी केवळ जोतीच शिल्लक आहेत.त्याचं संवर्धन करणे गरजेचे आहे.



👉सदशिवगडाखाली घेर्‍यामध्ये जिथे वस्ती आहे तो भाग हजारमाची, बाबरमाची, राजमाची आणि वनवासमाची (गडमाची) या नावाने ओळखले जात आहेत. येथील प्रत्येक वस्तीमधून गडावर येण्यासाठी पाऊल वाटा आहे. हजारमाची पासून सदाशिवगडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या असून पायरीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.

👉 खाजगी वाहने पायरीपर्यंत जातात. पायरी रस्त्याने सदाशिवगड माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजूस चिंचेच्या झाडाखाली एक विहीर असून चिंच विहिर या नावाने ओळखतात.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४