Posts

सह्याद्रीतील गड-कोटावर मारुतीराया चे स्थान*

🚩🚩 *जय हनुमान* 🚩🚩 *सह्याद्रीतील गड-कोटावर मारुतीराया चे स्थान*         दख्खनच्या पठाराच्या पश्र्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या या पर्वतश्रेणीमुळे अरबी समुद्र किनाऱ्यावरील किनारपट्टीचे मैदान दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत अरबी समुद्राला समांतर अशी ही श्रेणी पसरली  आहे.      सह्याद्री हा खऱ्या अर्थाने पर्वत नसून ती दख्खनच्या पठाराची विभंग कडा आहे. त्यामुळे सह्याद्रीपेक्षा पश्र्चिम घाट हीच संज्ञा अधिक उचित ठरते. याला सह्य पर्वत असेही म्हणतात. महाराष्ट्रात मात्र सह्याद्री हेच नाव प्रचलित आहे. सु. १५० द.ल. वर्षांपूर्वी गोंडवनभूमी या महाखंडाचे विभाजन झाले. त्यावेळी दख्खनच्या पठाराचेही विभाजन झाले असावे. त्यामुळे आजच्या पश्र्चिम किनारपट्टीला समांतर अशी विभंगरेषा निर्माण झाली असावी. या विभंगरेषेच्या पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे पठाराच्या पश्र्चिम कडेला उंची प्राप्त झाली असावी. भारतीय व्दिपकल्प पठाराची ही पश्र्चिम कडा म्हणजेच पश्र्चिम घाट होय.      सह्याद्रीचे उत्तर सह्याद्री व दक्षिण सह्याद्री असे दोन भाग पडतात. उत्तरेस तापी नदीपासू

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ एप्रिल १३३६* दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली. दक्षिणी भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते. वरंगळच्या 'हरिहर व बुक्क' या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ एप्रिल १६७७* त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन आग्र्यामध्ये त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार व वकील होते.  औरंगजेबानेही त्यांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. १८ एप्रिल १६७७ रोजी त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ एप्रिल १७२०* शार्वरीनाम संवत्सर शके १६४२, चैत्र वद्य सप्तमी, दि. १८ एप्रिल १७२० ह्या दिवशी छत्रपती शाहू राजांच्या दरबारात छत्रपतींचा नवनियुक्त बाजीराव पेशवा महाराजांना स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्याचं वचन आत्मविश्वासाने दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ एप्रिल १७७४* गंगाबाईंच्या पोटी पेशवे सवाई माधवराव यांचा  किल्ले पुरंदरावर जन्म. छत्रपती शाहूंनी हा किल्ला पेशव्यांकडे सोपविला होता, काही काळ पेशव्यांचे वास

संत तुकाराम महाराज यांनी भगवान हनुमान याच्यावर अभंग करून त्याना प्रसन्न करण्यासाठी लिहलेला अभंग लिहला.

 श्री हनुमान जयंती  निमित्त  शरण शरण जी हनुमंता । तुज आलो रामदूता ।।१।। काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ।।२।। शूर आणि धीर । स्वामीकाजी तू सादर ।।३।। तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ।।४।। अर्थ - हे हनुमंता ! हे श्रीरामदूता ! मी तुला शरण आलो आहे. ।।१।। भक्तीच्या ज्या श्रेष्ठ वाटा आहेत त्या तू मला दाखव. (कारण भक्तांमध्ये तू श्रेष्ठ आहेस.) ।।२।। तू शूर आहेस आणि धैर्यशाली देखील आहेस. स्वामीच्या सेवेसाठी तू नेहमी तत्पर असतोस. ।।३।। तुकोबा म्हणतात, हे रुद्रा ! अंजनीच्या कुमारा माझ्यावर कृपावर कर. ।।४।। ।राम कृष्ण हरि। #तुका_म्हणे #

ग्वालेरच्या शिंदे आणि कुलदैवत जोतिबा

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄         *🔸जोतिबाच्या नावानं चांगभलं.🔸* *आम्ही इकडे उत्तरेकडे मोठी मुलूखगिरी करण्यास आलो असून मोठी दौलत मिळवली आहे हे खरे आहे, तथापि आमचे कुलदैवत डोंगराचा जोतिबा, छत्रपतींचा भगवा झेंडा व आमची मूळची शिंदखेडची पाटीलकी यांचे विस्मरणाने रहाणारी दौलत आम्ही कस्पटासमान मानतो."* *हे उद्गार आहेत. ग्वालेरच्या महादजी शिंदे यांचे.* *शिंदे घराण्याची ज्योतिबावर खूप मोठी श्रद्धा. शिंदे घराण्याचे कुलदैवत म्हणजे जोतिबा. शिवाजीराव शिंदे यांच्या काळात ग्वाल्हेर व इतर संस्थानांचे एकत्रिकरण होवून मध्यप्रदेशची निर्मिती होणार होती. तेव्हा शिंदे यांनी आपला अधिकारी जोतिबा डोंगरावर पाठवला. एकिकरणासंदर्भात जोतिबाचा प्रसाद घेतला आणि नाथांची एकीकरणासंदर्भात आज्ञा आहे असा कौल घेवूनच परतले. त्यानंतर ग्वाल्हेर संस्थान मध्यप्रदेशात सहभागी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या.* *जोतिबाचे आज जे देवालय आहे ते ग्वालेरच्या राणोजीराव शिंदे यांनी १७३० साली बांधले. तिथेच असणारे केदारेश्वराचे मंदीर दौलतराव शिंदे यांनी बांधले. चोपडाईचे मंदिर प्रितीराव चव्हाण यांनी बांधले तर मालोजी निकम पन्हाळकर यांनी रामेश्वराचे मं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

 डॉ. बाबासाहेब आंबेड14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस,  14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, तसेच हा एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. बाबासाहेबांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्या 1. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : डॉ. आंबेडकरांनी तब्बल 32 पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of In 2). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), स

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *१३ एप्रिल इ.स.१६६३* *(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८५, संवत्सर शोभन, वार सोमवार)* महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले.             महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दवडत नसत. अफजलखानाचा (३२ दाताच्या राक्षसी बोकडाच्या) कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाहीस सळो की पळो करून सोडले. आजही महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली. ४ हजार घोडदळ, आणि १० हजार पायदळासह महाराज राजापुर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले. मात्र महाराजांच्या आगमनाच्या भितीमुळे पोर्तुगिजांची चांगलीच धावपळ झाली. डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले. महाराज मात्र, राजापुरास जाऊन तीरथे राहुजी सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले.  *१३ एप्रिल इ.स.१६६५* दिलेरखानाने मोठ्या जिद्दीने अबदुल्लाखान, फतेलष्कर आणि हाहेली ह्या तोफा टेकड्यांवर चढवल्या. दि. १३ एप्रिल

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ एप्रिल १४८२* मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ एप्रिल १६६३* शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे : त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेले, त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ एप्रिल १६६५* पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला पुरंदरावर तोफ