संत तुकाराम महाराज यांनी भगवान हनुमान याच्यावर अभंग करून त्याना प्रसन्न करण्यासाठी लिहलेला अभंग लिहला.
श्री हनुमान जयंती निमित्त
शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलो रामदूता ।।१।।
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ।।२।।
शूर आणि धीर ।
स्वामीकाजी तू सादर ।।३।।
तुका म्हणे रुद्रा ।
अंजनीचिया कुमरा ।।४।।
अर्थ -
हे हनुमंता ! हे श्रीरामदूता ! मी तुला शरण आलो आहे. ।।१।।
भक्तीच्या ज्या श्रेष्ठ वाटा आहेत त्या तू मला दाखव. (कारण भक्तांमध्ये तू श्रेष्ठ आहेस.) ।।२।।
तू शूर आहेस आणि धैर्यशाली देखील आहेस. स्वामीच्या सेवेसाठी तू नेहमी तत्पर असतोस. ।।३।।
तुकोबा म्हणतात, हे रुद्रा ! अंजनीच्या कुमारा माझ्यावर कृपावर कर. ।।४।।
।राम कृष्ण हरि।
#तुका_म्हणे
#
Comments
Post a Comment