Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

 डॉ. बाबासाहेब आंबेड14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, 
14 एप्रिल म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, तसेच हा एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. बाबासाहेबांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही गोष्टी जाणून घ्या

1. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : डॉ. आंबेडकरांनी तब्बल 32 पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of In

2). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), समता (1928), जनता (1930), प्रबुद्ध भारत (1956, जनताचे नामांतर).


3. 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेत डॉ. आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी - इट्स ओरिजिन अॅन्ड इट्स सोल्युशन' या पुस्तकात सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हिल्टन यंग कमिशनला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संकल्पना मांडली. 


4. बाबासाहेब आंबेडकर यांचं खरं आडनाव अंबावडेकर होतं. मात्र, त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी शाळेच्या नोंदीत बाबासाहेबांच्या नावापुढे आपलं आडनाव लावलं होतं.


5. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.


6. इ.स. 2012 मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.


7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयकरण’ करण्याची. शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकऱ्यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. हा एका अर्थाने सामुदायिक शेतीचाच प्रयोग होता. अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. 


8. आंबेडकरांनी इ.स. 1920 साली मुंबईत मूकनायक नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक 31 जानेवारी, 1920 रोजी प्रकाशित करण्यात आला. पहिल्या अंकातील मनोगत नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व हा अन्याय कमी करण्यासाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. 


9. 3 मे 1927 रोजी मुंबईजवळ बदलापूर येथे शिवजयंती उत्सव आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली साजरा केला गेला. बदलापूरच्या गावकऱ्यांनी जातिभेद न ठेवता आंबेडकरांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. बहिष्कृत भारत च्या 20 मे 1927 च्या अंकात छापलेल्या माहितीनुसार आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. 


10. भारतीय संसदेने सर्वसमावेशक हिंदू कोड बिल टाकले तेव्हा आंबेडकरांनी भारताच्या पहिल्या कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिला. हिंदू महिलांना त्यांचे योग्य हक्क देऊन त्यांचा सामाजिक दर्जा उंचावणे आणि सामाजिक विषमता आणि जातीय विषमता दूर करणे हे या विधेयकाचे दोन मुख्य उद्देश होते. महिलांना अनेक महत्त्वाचे अधिकार देणारे सर्वसमावेशक हिंदू कोड बिल मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी तीन वर्षे संघर्ष केला.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...