आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १४८२*
मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १६६३*
शाहिस्तेखानावरील छाप्याच्या संदर्भात काहीशी माहिती मिळते ती इंग्रजी पत्रात. ती माहिती पुढीलप्रमाणे आहे :
त्यांत छत्रपती शिवाजी महाराज ४०० निवडक लोकांसह जातीने शाइस्तेखानाच्या तळावर गेले, त्याची हकीकत आहे. कांही बहाणा करून ते सलाम करण्यासाठी म्हणून शाइस्तेखानाच्या तंबूंत गेले आणि लगेच पहारा साफ मारून, शाइस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बिब्या, ४० मोठे दरकदार, मोंगलांचा सेनापती, इत्क्यांचे प्राण हरण करून खुद्द शाइस्तेखानाला आपल्या स्वतःच्या हाताने जखम करून त्याच्या आणखी ६ बायका, आणि दोन मुलगे, शिवाजीने ठार केले. या सगळ्या भानगडीत त्याचे फक्त ६ सैनिक मेले आणि ४० जखमी झाले ! १० हजार घोडेस्वारांचा अधिपती राजा जसवंतसिंग समीप असून पाठलाग न करितां स्तब्ध राहिला. यावरून त्याचे यांत अंग होते असे सगळ्यांना वाटते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १६६५*
पुरंदरचा रणसंग्राम - वज्रगडाचा बुरुज ढासळला
पुरंदरावर तोफ वरती नेत असताना तिकडे गडावरून मराठे शर्थीने लढतच होते, अग्नीवर्षाव करीतचं होते. पुरंदर शर्थीने लढतच होता. पण मोगलही चहूबाजूंनी भिडलेले होते. त्यांचाही किल्ल्यावर मारा सुरूच होता. त्यात आता अशा बलाढ्य तोफा त्यांना येऊन मिळाल्या, आणि या तोफांच्या माऱ्यात वज्रगडाचा एक बुरुज ढासळलाचं ती तारीख होती १२ एप्रिल १६६५....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १६८९*
छत्रपती राजारामांचे सरदार कृष्णाजी गोळेस पत्र
छत्रपती राजाराम महाराजांनी कारभार हातात घेताना नव्या जुन्या सर्व लोकांस जवळ केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर नाइलाजाने मोघलांस मिळालेल्या सरदारांस ही त्यांनी परत स्वराज्यात आणले. त्यांना प्रोतसहन देऊन त्यांच्या कडून स्वामीकार्य करून घेतले. त्या संदर्भात त्यांची काही पत्रे आज इपलब्ध आहेत. त्यातील आज उपलब्ध असलेल्या पैकी सर्वात जुने पत्र किंबहुना कारभार हातात घेतला नंतर चे पहिले पत्र १२ एप्रिल १६८९ रोजी त्यांनी मोघलांस सामील झालेल्या सरदार कृष्णाजी गोळे ह्या सरदारस लिहले. व ह्या पत्राद्वारे त्यास अभय देऊन त्याच्याकडील पायदळाच्या शिपायांची वेतन ही सरकारी खर्चातून देण्याची खात्री त्यास करून दिली. अशा प्रकारे स्वराज्य कार्यास एक एक माणूस गोळा करत असतानाच तिकडे औरंगजेब ही त्याचे डाव टाकत होता. त्यास शह म्हणून नाइलाजाने त्यांस वतनदारी पुन्हा सुरू करावी लागली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १७२०*
बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचा मृत्यू.
(जन्म: १ जानेवारी १६६२)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १७३७*
मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाईघाईत धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १७५२*
मुगल बादशाह आणि मराठ्यांच्यात झालेल्या करारानुसार सर्वप्रथम मराठा मित्र जाट राजा सुरमजलवर आक्रमणाची योजना झाली, सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर ४००० सैनिक आणि दिवाण गंगाधर चंद्रचूडला सोबत घेऊन जाटांच्या प्रदेशांमधून नोव्हेंबर १७५३ ला दिल्लीला पोहोचले
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१२ एप्रिल १७८०*
कॅप्टन कॅम्बेलने बेलापूरचा किल्ला जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment