Posts

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, महान सेनानी, श्रीमंत राजश्री खंडेराव दाभाडे सरकार यांना विनम्र अभिवादन......🙏🙏🙏🚩

Image
मराठा साम्राज्याचे सरसेनापती , शंभुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या अधिपत्याखाली 1707 सालापासून स्वराज्याचे साम्राज्यात रुपातंर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे गुजरात प्रांत स्वराज्याला जोडणारे, स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतराचा महत्वाचा क्षण , घटना  म्हणजे 1719साली सरसेनापती दाभाडे यांच्या नेतृत्वात महाराणी येसुबाईसाहेब यांच्या 37 वर्षाच्या कैदेतून मुक्तात करत दिल्लीवर भगवा फडकवून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अखंड भारत भुमी एका भगव्या खाली आणण्याचे स्वप्न पुर्ण करत मुघल बादशहाचा त्याच्याच भरदरबारात खुन करवत ,स्वतःच्या पित्याचा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेत पुर्ण करण्याच्या या महत्वपुर्ण कामगीरीतील अत्यंत विश्वासू  , पराक्रमी , व्यक्ती म्हणून ज्यांचा आदराने नामउल्लेख होतो  अशा  हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती, महान सेनानी, श्रीमंत राजश्री खंडेराव दाभाडे सरकार यांना विनम्र अभिवादन......🙏🙏🙏🚩 छत्रपती शाहू महाराज चरणी समर्पित🚩🚩🚩

#श्री_नारायणेश्वर_मंदिर

Image
#श्री_नारायणेश्वर_मंदिर पुण्यातून साताऱ्याकडे जाताना पुरंदर आणि वज्रगड या किल्यांच्या पायथ्याशी नारायणपूर या नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात एक सुंदर यादवकालीन आणि पंचक्रोशीमध्ये #श्री_नारायणेश्वर_मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. सदर पश्चिमाभिमुख मंदिर हे किमान ८०० / ८५० वर्ष जुने आहे. मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे. पाठीमागचा पुरंदर किल्ला आणि संत  चांगदेवांचे वास्तव्य या साठी हे ठिकाण पूर्वी प्रसिद्ध होत. सध्या मात्र नारायणपूर गावात अलीकडेच नव्याने उभारलेले एकमुखी दत्तमंदिर अधिक प्रसिद्ध आहे.  नारायणेश्वर मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिराभोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंचीची तटबंदी आहे. या मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत प्रशस्त असून आवारात असलेल्या एका पारामध्ये एक मोठा दगडी रांजण पुरून ठेवलेला आहे. तो रांजण नाणेघाट किंवा शिरवळ इथे असलेल्या रांजणांशी मिळताजुळता आहे. मंदिराच्या आवारात डाव्या बाजूला काळ्या पाषाणाची ६/६.५ फुटाची मारुतीची मूर्ती आहे.  यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शि

आश्विन शुद्ध ५ पुन्हा सिव्हासनारोहण !!*छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..*🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻

Image
आश्विन शुद्ध ५ पुन्हा सिव्हासनारोहण !! *छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..* 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻 निश्चलपुरी म्हणतो " मी मंत्र म्हणणारे ब्राह्मण निवडले. ते लाल आसनांवर, लाल वस्त्रें परिधान करून मंत्रपठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरू झाले. आश्विन शु॥ ५ स मी त्यास राज्याभिषेक केला. राजाने त्या दिवशी सकाळी कूंभपूजा केली. सिंहासनापाशी समंत्रक भूमि शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. राजा हातांत तरवार घेऊन सिंहासनापाशी गेला. अनेक देवतांची शांति केली. सिंहासनाच्या सिंहांस बळी दिले. पूर्वेकडील सिंहास प्रथम बली दिला. आग्नेयेकडील हर्यक्ष या सिंहास, दक्षिणेकडील पंचास्य या सिंहास, नैर्ऋत्येकडील केसरी नावाच्या सिंहास, पश्चिमेकडील मृगेंन्द्र या सिंहास, मग वायव्येकडील शार्दूल नावाच्या सिंहास, नंतर उत्तरेकडील गजेंद्र या सिंहास, ईशान्येकडील हरि या सिंहास राजाने बली दिले. या आठ सिंहाच्या पाठीवर राजाचें राज्याभिषेकाचें आसन होतें. आसनावर निश्चलने यंत्र ठेवि

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ सप्टेंबर १४२२*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ सप्टेंबर १४२२* यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने सप्टेंबर १६३६ मध्ये औसा किल्ला जिंकून घेतला व त्याने मुबारक खानाची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२२ सप्टेंबर १६६०* १७ ऑगस्ट १६६० ला आदिलशाह स्वतःच पन्हाळगड घेण्यासाठी विजापुराहून निघाला. शिवरायांना जेव्हा हे कळले तेव्हा त्याने लगेच एका वक

सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, परखड विचारवंत, व्रतस्थ शिक्षणमहर्षी, मानवतेचा वटवृक्ष व पुरोगामी विचारांचे प्रणेते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Image
सर्वसामान्यांच्या शिक्षणाचे आधारस्तंभ, सत्यशोधक विचारांचे अनुयायी, परखड विचारवंत, व्रतस्थ शिक्षणमहर्षी, मानवतेचा वटवृक्ष व पुरोगामी विचारांचे प्रणेते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!  शिक्षणातून समाजाचे प्रबोधन होऊ शकते, त्यासाठी शिक्षणाचे महत्व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा विचार घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहचवली. कमवा आणि शिका हा स्वावलंबी जीवनाचा मूलमंत्र दिला. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीच्या इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव नेहमीच आदराने घेतले जाईल. #कर्मवीर #भाऊराव_पाटील  #karmveerbhauraopatil

स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, 3 शंकराचार्यांपैकी एक, हिंदू धर्माचे सर्वोच्च पीठाधीश्‍वर यांच निधन झाले त्यांच्या दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो

Image
स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी, 3 शंकराचार्यांपैकी एक, हिंदू धर्माचे सर्वोच्च पीठाधीश्‍वर यांच निधन झाले त्यांच्या दिवंगत आत्म्याला श्रद्धांजली, ईश्वर त्यांना त्यांच्या चरणी स्थान देवो. 💐💐🙏🙏 #स्वरूपानंद_सरस्वती_जी

छत्रपति शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये प्रचंड विकसित झालेले शिकारीचे एक प्रभावी तंत्र म्हणजे 'चित्ता शिकार' होय

Image
#चित्ता_शिकार / Cheetah Hunting छत्रपति शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूरमध्ये प्रचंड विकसित झालेले शिकारीचे एक प्रभावी तंत्र म्हणजे 'चित्ता शिकार' होय. चित्ता शिकार अथवा ज्याला Cheetah Hunting या नावाने ओळखले जायचे ती म्हणजे चित्त्याची शिकार नसून चित्त्याकडून केली जाणारी काळवीटाची शिकार होय. शाहू महाराज एक निष्णात शिकारी होते. चित्ता हंटींग, हाउंडस् हंटींग, कोळसुंदा हंटींग असे नानाविध शिकार तंत्र स्वतः महाराजांनी विकसित केले होते. तूर्त आपण चित्ता हंटींग बद्दल माहिती घेऊ.... 'चित्त्याचा पळण्याचा वेग असामान्य असतो आणि त्यात एक शास्त्रोक्तपणाही असतो. नजरेने टिपता येणार नाही इतका त्याचा वेग असतो. निसर्गातील अति वेगवान प्राणी हरिण जर पूर्ण शक्ती एकवटून पळायला लागला तरी त्याला पकडण्यासाठी चित्त्याला फारसे प्रयास पडत नाहीत.' चित्त्याचे हेच वैशिष्ट्य हेरुन काळवीटांच्या शिकारीसाठी महाराजांनी चित्त्यांचा खुबीने उपयोग केला. महाराजांकडे शक्यतो आफ्रिकन चित्ते असायचे. पूर्वी चित्त्यांना शिकारीसाठी बैलगाडीतून नेले जाई. पण हि पद्धत सोयीस्कर नव्हती. त्यामुळे महाराजांनी खास चित्त्यांसा