आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२२ सप्टेंबर १४२२*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ सप्टेंबर १४२२*
यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात औसा किल्ल्याला महत्व आले. बहामनी घराण्याचा ९ वा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलविली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स.१४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याचे विघटन होऊन ५ शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर हि राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने सप्टेंबर १६३६ मध्ये औसा किल्ला जिंकून घेतला व त्याने मुबारक खानाची किल्लेदार म्हणून नियुक्ती केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ सप्टेंबर १६६०*
१७ ऑगस्ट १६६० ला आदिलशाह स्वतःच पन्हाळगड घेण्यासाठी विजापुराहून निघाला. शिवरायांना जेव्हा हे कळले तेव्हा त्याने लगेच एका वकीला करवी पन्हाळगड सोडून देण्याचा निरोप पाठवला. तोवर त्र्यंबकपंताने गड भांडता ठेवला होता. छत्रपती शिवरायांचा निरोप मिळताच २२ सप्टेंबर १६६० रोजी त्याने गड सिद्दीच्या हातात दिला....
१२ जुलै १६६० ला किल्ले पन्हाळ्यावरून निसटल्यावर शिवरायांना मुघलांशी लढायला वेळ हवा असल्याने आदिलशाहीकडून थोडी शांतता हवी होती. योग्य राजकारण करून शिवरायांनी पन्हाळगड सिद्दी जौहरच्या स्वाधीन केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ सप्टेंबर १६७७*
जिंजीच्या किल्ल्याच्या पुनर्बांधणीचे काम शिवाजीराजांनी सुरु केले
इस १६७७-७८ मधे शिवाजीराजांनी महाराष्ट्राबाहेर दौरा केला होता, तो इतिहासात 'दक्षिण दिग्विजय' या नावाने ओळखला जातो! 
हा प्रदिर्घ दौरा करण्यामागे महाराजांचे काही उद्देश होते जसे की, कुतुबशहाची मैत्री संपादन करुन पुढेमागे गरज भासल्यास मुघलांविरुद्ध दक्षिणच्या सत्तांची एकजुट करणे, सावत्र भाऊ व्यंकोजींची भेट घेऊन काही हिताच्या गोष्टी त्यांना समजावुन सांगणे आणि अगदीच गरज पडल्यास त्यांनी बळेच ताब्यात घेतलेला मुलुख आणि संपत्ती स्वराज्याच्या ताब्यात घेणे तसेच, अमराठी मुलुखातील दुर्ग आणि प्रदेश जिंकुन तो मराठा साम्राज्याला जोडणे आणि अर्थातच कुतुबशहाकडुन खंडणीची बोलणी करणे वगैरे वगैरे!
या मोहिमेत मे १६७७ मधे तामिळनाडुतील जिंजीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला! त्या किल्ल्याची आधीची तटबंदी आणि बांधकाम पाडुन महाराजांनी त्याचे नवीन बांधकाम आणि डागडुजी सुरु केली! जिंजीच्या किल्ल्याचे महत्व सांगताना कृष्णाजी अनंत सभासद यांनी म्हणले आहे 'चंदी म्हणजे जैसे विजापुर, भागानगर तैसाच तख्ताचा जागा! येथे राजियांनी राहावे परंतु इकडेही (महाराष्ट्रात) राज्य उदंड!' 
जिंजीला त्याकाळी 'चंदी' असे म्हणत असत!
सुरवातीला महाराजांनी मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) इंग्रजांना पत्र पाठवुन जिंजीच्या बांधकामासाठी काही इंजिनियर्सची मदत मागितली होती मात्र, अशी मदत केल्यास शिवाजी प्रबळ होईल आणि मुघलांचे वैर आपल्याला हकनाक पत्करावे लागेल म्हणुन इंग्रजांनी ती मदत करायला नकार दिला! मात्र त्यामुळे महाराजांना काही फरक पडला नाही आणि त्यांनी स्वतःच जिंजीची डागडुजी सुरु केली ! आणि बघा त्यांनी त्या किल्ल्याचे जुने तट आणि बुरुज पाडुन नवीन अशा काही कौशल्याने बांधले की, एक फ्रेंच व्यक्ती त्याविषयी म्हणतो की,
"…………The Bastions are so strategically placed that, Fort appears to be constructed by the European engineers than the Indians"

या जिंजीच्या किल्ल्याचा भविष्यात असा उपयोग झाला की, १६८९ साली राजाराम महाराज जेव्हा मुघलांपासुन वाचत महाराष्ट्राबाहेर निसटले तेव्हा त्यांनी साधारण १६९० पासुन पुढची ७-८ वर्षे जिंजीच्या किल्ल्यातच आश्रय घेतला ! 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ सप्टेंबर १६८३*
मराठ्यांचा पारसिक किल्ल्यावर हल्ला!  
मराठ्यांनी वसई येथील उभी पिके कापली. हे पारसीक गडावरील कॅप्टनला समजले. त्याने आपले २५ सैनिक पाठविले. मराठ्यांनी पळ काढण्याचा बहाणा केला. आपल्या पाठीवर पोर्तुगीज सैनिक घेऊन आपल्या तळा जवळ जेथे आपले ५०० सैनिक बसले होते तेथपर्यंत त्यांना आणले. पोर्तुगीज सैन्य पळू लागले. मराठ्यांनी त्यातील १९ लोकांना कापले. फक्त ६ लोकं पारसिकच्या किल्ल्यात पोहोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ सप्टेंबर १७६२*
कोल्हापूर नरेश छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांचा राजाभिषेक सोहळा पन्हाळा किल्ल्यावर महाराणी जिजाबाईंनी पार पाडला होता. 
छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांना जिजाबाईं राणी साहेब यांनी खानवटकर भोसले घराण्यातून दत्तक घेतले होते .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२२ सप्टेंबर १८८७*
शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊरावअण्णा पाटील यांची आज जयंती.
महाराष्ट्रातील बहुजन रयतेला खरया अर्थाने शिक्षणाची द्वारे खुले करून देणारे कर्मयोगी "अण्णा .."
महाराष्ट्रातील काणा-कोपऱ्यात शिक्षणाची गंगा पोचवणारे आधुनिक भगीरथ "अण्णा"..
आज महारष्ट्रातील खेडोपाड्यात पोचलेल्या रयत शिक्षण संस्था नावाच्या एका अफाट वटवृक्षाचे रोपण करणारे कर्मवीर "अण्णा"
चंदनापरी झिजून शिक्षणाचा सुगंध सर्वदूर पसरवणारे "अण्णा"
वेळप्रसंगी घरदार इतकेच काय पण पत्नी लक्ष्मीबाईंचे स्त्रीधन हि गहाण ठेऊन "रयत" चा कारभार चालवणारे दानशूर "अण्णा"..
अत्यंत बिकट परिस्थितीत सुधा स्वातंत्र्यवीरांचे आधारवड ठरलेले धैर्यवान "अण्णा"..
आमच्या सारख्या लाखो जणांना जगण्यास लायक बनवणारे व मायेचे छत्र देणारे आमचे माता व पिता "अण्णा"
आज त्यांच्या जन्मदिनानिम्मित त्यांना कोटी कोटी प्रणाम..

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४