आश्विन शुद्ध ५ पुन्हा सिव्हासनारोहण !!*छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..*🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
आश्विन शुद्ध ५ पुन्हा सिव्हासनारोहण !!
*छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..*
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻
निश्चलपुरी म्हणतो " मी मंत्र म्हणणारे ब्राह्मण निवडले. ते लाल आसनांवर, लाल वस्त्रें परिधान करून मंत्रपठण करू लागले. शुभ दिवस पाहून हे कार्य सुरू झाले. आश्विन शु॥ ५ स मी त्यास राज्याभिषेक केला. राजाने त्या दिवशी सकाळी कूंभपूजा केली. सिंहासनापाशी समंत्रक भूमि शुद्ध केली. नवे सिंहासन मांडले. सिंहासनाच्या सिंहांची पूजा केली. राजा हातांत तरवार घेऊन सिंहासनापाशी गेला. अनेक देवतांची शांति केली. सिंहासनाच्या सिंहांस बळी दिले. पूर्वेकडील सिंहास प्रथम बली दिला. आग्नेयेकडील हर्यक्ष या सिंहास, दक्षिणेकडील पंचास्य या सिंहास, नैर्ऋत्येकडील केसरी नावाच्या सिंहास, पश्चिमेकडील मृगेंन्द्र या सिंहास, मग वायव्येकडील शार्दूल नावाच्या सिंहास, नंतर उत्तरेकडील गजेंद्र या सिंहास, ईशान्येकडील हरि या सिंहास राजाने बली दिले. या आठ सिंहाच्या पाठीवर राजाचें राज्याभिषेकाचें आसन होतें. आसनावर निश्चलने यंत्र ठेविलें व त्या आसनास एक बळी दिला.
एका रत्नखचित उच्च आसनावर निश्चलपुरीने रौप्य आसन ठेवलें. त्यावर राजास बसवून राज्याभिषेकाचें कार्य सुरू झालें. आसनाभोवती असलेल्या अष्ट कलशांवर चंद्रकिरणांच्या धारा ओघळत होत्या. त्या अष्टकलशांत पाच पानांचे तुरे ठेवलेले होते व कलशांना लाल रेशमी वस्त्रें गुंडाळली होती. पडदे लाऊन शोभा आणली होती. धूप दरवळत होता. दिवे तेवत होते नंतर मस्तकावर अभिषेकाचें जलसिंचन होऊन राज्याभिषेक उरकला. यावेळी सामवेदगायन चाललें होते. मग निश्चलने शिवाजीराजास सांगितलें, ‘राजा, शिजवलेल्या अन्नाचा प्रचंड ढीग या रायरी पर्वतास अर्पण कर. राजाने तसें केल्यानंतर राजाचे भोजन झालें. हा राज्याभिषेक कुंभ लग्नावर, आयुष्मन योग असताना, अनुराधा नक्षत्र व बुधवार, अश्विन शु॥ ५, आनंद संवत्सर, शके १५९६ या दिवशी झाला, शुभं भवतु ।
छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ सप्टेंबर १६७४ रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्याकरवी ललिता पंचमी दिवशी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला..
संदर्भ - शिवापूर दफ्तरातील यादी
शिवराज राज्याभिषेक कल्पतरू
Comments
Post a Comment