सरसेनापती म्हाळोजी घोरपडे यांना ३३४ व्या स्मृतिदिन त्रिवार मानाचा मुजरा
म्हाळोजी घोरपडे एक अद्भुत सरसेनापती हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती होणं हे काही खायचं काम नव्हतं, यासाठी अफाट शौर्य, निस्सीम त्याग ,स्वामिनिष्ठा अन अथांग असा पराक्रम गाजवावा लागतो. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई ही सातारा जिल्ह्यातील वाईजवळ. या युद्धात सर्जाखान याचा त्यांनी दारुण पराभव केला होता ,परंतु हंबीरराव मोहिते यांना त्या लढाईत तोफेचा गोळा लागला व रणधुरंदर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातीर्थी पडले. १६ डिसेंबर १६८७ साली हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. आणि स्वराज्याच्या माळेतील एक स्वामीनिष्ठ असा मोती निखळला. कधीही भरून न येणारे नुकसान त्यावेळी झाले. संभाजी राजांना लहानपणापासून वडीलधारी म्हणून असलेला आधार मावळला. वाईच्या लढाईत दुर्दैवाने सरलष्कर हंबीरराव मोहिते यांचा काळ झाला अन स्वराज्याचे सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले. त्यानंतर संभाजी राजांनी *_म्हाळोजी घोरपडे यांसी सरंजामी देऊन मुखत्यारी सांगून त्यांना सरनोबतीची वस्त्रे दिली.आणि म्हाळोजी बाबा स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून रुजू झाले._* तत्पूर्वी म्हाळोजी घोरपडे शहाजीराजां सोबत आदिलशाहीत सरदार हो