आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३० जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १५२८*
थोर राजपूत योद्धा महाराणा सांगा उर्फ संग्रामसिंह याचा स्मृतिदिन
राजस्थानचा इतिहास लिहायचा म्हटले तर तो इतिहास महाराणा सांगाच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे. सुमारे ३००- ३५०वर्षे भारतावर राज्य करणार्‍या मोगल सत्तेला त्यांची भारतात पायाभरणी होत नाही तोच मुळापासून उखडून टाकण्याची ताकद त्यावेळी कोणाकडे असेल तर याचे फ़क्त एकच उत्तर इतिहास देतो ते म्हणजे रजपूत योद्धा महाराणा सांगा. आक्रमक, क्रूर, धर्मांध अशा मुसलमान सुलतानांची सहसा कुरापत न काढण्याचा हिंदू राजांचा पायंडा राणा सांग अगदी खुशाल झुगारून देत होता. उलट मुसलमान सुलतानांनाच मैदान सोडून पळून जाण्यास भाग पाडत हिंदूंची मुसलमान सुलतानांवर जबरदस्त दहशत बसवणारा वीर योद्धा म्हणजे महाराणा सांगा होय.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १६४२*
शहाजी राजे कर्नाटकास जातात
माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १६६४*
शहाजीराजांच्या मृत्यूची वार्ता आदिलशहास कळताच त्याने ३० जानेवारी १६६४ रोजी एक दुखवटा संदेश व्यंकोजीराजाना पाठवला “ या खराब वेळी आमच्या कानावर आले कि फर्जंद महाराज परमेश्वरी हुकुमाने या नश्वर जगाचा त्याग करून त्या शाश्वत जगात निघून गेले. हि खबर ऐकून आम्हास अतिशय दु:ख झाले. त्यांनी ( व्यंकोजीराजानी ) परमेश्वरी हुकुमास राजी राहून मन संतोषित ठेवावे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १६८०*
इंग्रज सैन्याने छत्रपती शिवरायांपुढे शरणागती पत्करली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १६८१*
छत्रपती शंभूराजांनी "बुऱ्हाणपूर" शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली.
यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १६८२*
मोगलांनी कल्याण जिंकून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांना सिद्दीवरील मोहीम महाडच्या दादाजी प्रभू देशपांडे यांच्यावर सोपवून मोगल सेनेशी मुकाबला करण्यासाठी रायगडावर परत यावे लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १७१५*
कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.
मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले.
१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात
१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.
२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले.
या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.
सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १७३३*
शाहू महाराजांनी कै. संभाजी राजांच्या व्रुन्दावनाची झाडलोट, स्वच्छता, तसेच निगा राखण्याकरिता गोपाल ढगोजी मेगोजी यांना ३० जानेवारी १७३३ रोजी सनद दिली.
माघ वद्य ११ छ २४ साबान
शके १६५४ सु।। सलास (सलासीन)
मंगळवार (३० जानेवारी, सन १७ मया व अलफ
 राजमंडळ इनाम –
 गोविंद गोपाल ढगोजी
 मेगोजी हे मौजे वढू त।। (तर्फ) पाबल येथे राहुन कैलासवासी 
 यांचे वृंदावनापासी राहुन
 झाडलोट करिताती या
 करिता जफर मजकुरास मौजे
 मजकूर पैकी पड जमीन
 छ२४ शाभान सन सलास
 जमिन बिघे

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १९११*
जॅक्सन खुन प्रकरणी सन १९११ मध्ये विनायक दामोदर सावरकरांवर दोन खटले चालून त्यांना दोन "जन्मठेप काळे पाणी"च्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचाच अर्थ अंदमानात ५० वर्षें सक्तमजूरी! उभ्या आयुष्याची राख-रांगोळी! दुसरा कोणी असता तर त्याने हायच खाल्ली असती. पण वीर सावरकर म्हणजे मूर्तिमंत धैर्याचे महामेरू; त्यांनी ही शिक्षा स्तिथप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. सावरकरांची शिक्षा २४-२-१९११ ला सुरू झाली व ६-१-१९२४ रोजी त्यांना काही अटींवर मुक्त करण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३० जानेवारी १९४८*
महात्मा गांधी पुण्यतिथी
दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४