Posts

4 मार्च 1677 ला छत्रपती शिवाजी महाराज हैदराबाद जवळील गोवळकोंडा येथे पोहोचले

Image
4 मार्च 1677 ला छत्रपती शिवाजी महाराज हैदराबाद जवळील गोवळकोंडा येथे पोहोचले.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३ मार्च १६६०* शाहीस्तेखान स्वराज्यात घुसला, त्याचा पहिला मुक्काम किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सोनवडी या गावात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३ मार्च १६६०* सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिलशहाने छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना छत्रपती शिवरायांना मदत न करण्यासाठी धमकीचे पत्र पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३ मार्च १६६५* मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते. त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३ मार्च १६७९* मराठ्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून कोप्पळ जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३ मार्च १६८९* मुघल फौजा छत्रपती संभाजीराजेंना कैद करून भीमा कोरेगावला घेऊन आल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३ मार्च १७३९* सन १९३९ च्या सुरुवातीला

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजयांनी आजच्या दिवशी म्हणजेच २मार्च १७०० रोजी किल्ले सिंहगड येथे आपला देह ठेवला.स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

Image
आपले बंधू छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे स्वराज्य अत्यंत धामधूमीच्या काळातही तब्बल अकरा वर्षे सांभाळणारे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी आजच्या दिवशी म्हणजेच २मार्च १७०० रोजी किल्ले सिंहगड येथे आपला देह ठेवला.स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🚩

आण्णाभाऊंनी अपरिचित अनेक अनाम वीरांना उजेडात आणले.

Image
आण्णाभाऊंनी अपरिचित  अनेक अनाम वीरांना उजेडात आणले. गावगाड्यातल्या रांगड्या कारभाराचा बरावाईट लेखाजोखा पहिल्यांदा अण्णाभाऊंनीच मांडला... अन्यायग्रस्ततेचा बागुलबुवा उभा करून एकूणच सवर्ण समजला जाणारा समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याच्या काळात जातीय विद्वेषापेक्षा सामाजिक एकतेची महती सांगण्यासाठी " गावगाडा " ही अनादी संकल्पना आण्णाभाऊंइतकी सक्षमपणे आजतागायत कुणीही वापरली नाही.... फकीरा, आणि अण्णाभाऊ या दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन....

*२ मार्च १६६०*सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा

Image
*२ मार्च १६६०* सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून छत्रपती शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ मार्च १६६०* सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून छत्रपती शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ मार्च १६८७* औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२ मार्च १७००* छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू... महाराणी ताराबाईंनी  राज्य कारभार हाती घेतला...  औरंग्याने छत्रपती शंभुराजांची अमानुष हत्या केली... आता मराठे घाबरतील, शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं... पण घडलं भलतचं.... छत्रपती शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला... छत्रपती राजाराम महाराजा

राजवाडा, सातारा, इसवी सन १९००================

Image
राजवाडा, सातारा, इसवी सन १९०० =================== डॉ. ख्रिस्ती नावाच्या माणसाने १९०० सालच्या सुमारास काढलेली ही छायाचित्रे आज केंब्रिज विद्यापीठाच्या संग्रहात आहेत.   राजवाड्याच्या बाहेरील बाजूने सुंदर मराठी शैलीतील भित्तिचित्रे काढलेली होती, ती या फोटोमध्ये अस्पष्ट दिसतात. ही चित्रे दुर्दैवाने आज अस्तित्वात नाहीत, आणि राजवाड्याचे पटांगणही इतके मोकळे राहिलेले नाही.     मूळ दुवा: https://cudl.lib.cam.ac.uk/view/PH-Y-03022-V/44  (इथे चित्र मोठे करुन पहाता येईल)   खाली इंग्रजीत लिहिलेला मजकूर, मूळ शीर्षक:  Satara. The old palace of the Raja - now turned into Government offices. (Sent to me by Rev. G.B. Horne, chaplain of Satara and Mahabaleshwar)  दुसरे चित्र: अदालत वाडा सातारा, इसवी सन १९००  ============================= मूळ शीर्षक: The Court House (sent by Horne)