आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १६६०*
सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा
सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून छत्रपती शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १६८७*
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १७००*
छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू...
महाराणी ताराबाईंनी राज्य कारभार हाती घेतला...
औरंग्याने छत्रपती शंभुराजांची अमानुष हत्या केली...
आता मराठे घाबरतील, शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं... पण घडलं भलतचं.... छत्रपती शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला... छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरंगजेबाला टक्कर देवू लागले...दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले...
या काळात छत्रपती राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली...मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते... म्हणून छत्रपती राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले... वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले... संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले... आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले..
मुघलंनी जिंजीला वेढा दिला...पण छत्रपती राजाराम पसार होवून विशालगडावर गेले... तेथून सातारा, कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या... महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते... त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता... परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही... २ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपती राजाराम राजांचा सिंहगडावर मरण पावला... निधन झाले तेंव्हा छत्रपती राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिंधुदुर्गावर छत्रपती शिवरायांचे मंदिर उभारण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १७५६*
इ.स. १७५६ सुमारास , गुजरात प्रांताच्या दक्षिण सीमाभागातील 'वासदे'/'बासदा' ह्या संस्थानच्या राजपरिवारात गृहकलह होता. त्यामुळे राज्याच्या 'गादीवर' बसण्याच्या अधिकाराबाबत पेच/वाद निर्माण झाला होता. ह्या कारणास्तव राजपरिवारातील दावेदार श्री राऊल उदयसिंह यांनी पुण्याला येऊन श्रीमंत पेशव्यांच्या दरबारी ही व्यथा मांडली व त्यावर धर्मशास्त्र व न्यायशास्त्र अनुसार निर्णय देण्यास विनंती केली.
त्यावेळी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांचे 'कारभारी' त्र्यंबकराव मामा पेठे यांनी हे प्रकरण हाताळले व स्वतः लक्ष घालून, धर्म - न्यायशास्त्र अनुसार योग्यता जाणून घेऊन, पेशव्यांच्या संमतीने , श्री राऊल उदयसिंह यांची स्थापना वासदे संस्थानच्या गादीवर केली.
परिणामी, राजे राऊल उदयसिंह यांनी पेच सुटल्याबद्दल व त्र्यंबकराव पेठे यांनी केलेल्या कार्याची उतराई म्हणून व पेशव्यांशी स्नेहसंबंध कायम राहावे ह्याकरिता , स्वतःच्या खुशालीने आपल्या राज्यातील मौजे 'माणकुन्या' हे गाव दरोबस्त वंशपरंपरागत इ.स. २ मार्च १७५६ रोजी त्र्यंबकरावांना इनाम करून दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १७८१*
श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले यांचा जन्मदिन
आपल्या इतिहासामध्ये जिजाऊमाँसाहेब आपल्याला माहीत होत्याच, त्यानंतर ताराराणीसाहेब आम्हाला माहीत आहेत. परंतु मराठा राज्याचे रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या शाहू महाराजांच्या आईसाहेब आणि संभाजी महाराजांच्या पत्नी "त्यागमूर्ती येसूबाईसाहेब" आमच्या लोकांना माहीत नव्हत्या ज्या आत्ता कुठे माहीत झाल्या. अहिल्याबाई होळकर आहेत, दुसऱ्या जिजाबाई साहेब आहेत अशा अनेक पराक्रमी स्त्रिया ज्यांनी इतिहासाला कलाटणी देणारे कार्य केले. परंतु अशा अनेक स्त्रिया अजूनही आहेत ज्यांचा इतिहास आम्हा सामान्य माणसाला माहीत नाही. अशाच एक पराक्रमी स्त्रीची ओळख (इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना नक्कीच माहीत असेल ) त्या पराक्रमी स्त्रीचे नाव म्हणजे
"श्रीमंत महाराणी, बाकाबाईसाहेब भोसले" यांचा जन्मदिन.
दुसरा रघुजीराजे भोसले यांची पत्नी.
मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे. नागपूरचे राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजीराजे भोसले. ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली. दुसरे रघुजी भोसले (इ.स. १७८८ ते इ.स. १८१६) यांच्या काळात १८०३ पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १७९५*
खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड, तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मार्च १८१८*
इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment