आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १६६०*
शाहीस्तेखान स्वराज्यात घुसला, त्याचा पहिला मुक्काम किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सोनवडी या गावात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १६६०*
सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिलशहाने छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना छत्रपती शिवरायांना मदत न करण्यासाठी धमकीचे पत्र पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १६६५*
मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला.
मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते.
त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १६७९*
मराठ्यांनी विजापूरच्या आदिलशहाकडून कोप्पळ जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १६८९*
मुघल फौजा छत्रपती संभाजीराजेंना कैद करून भीमा कोरेगावला घेऊन आल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १७३९*
सन १९३९ च्या सुरुवातीला मराठ्यांनी माहीम काबीज केल्यानंतर खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. 
दिनांक ३ मार्च सन १७३९ रोजी धारावीच्या पूर्वेकडील भागात तुबाजीपंत, डोंगरीकडील भागात नारोजी कडू व खंडू गोमाजी, पश्चिमेकडील भागात गोविंद हरी पटवर्धन व खंडोजी माणकर यांनी प्रबळ मोर्चे लावून गावाची नाकेबंदी केली. या मोर्चांवर पोर्तुगीजांकडून मारा होत होता पण मराठ्यांनी हे हल्ले परतवून नाकेबंदी कडक केली. अखेरीस मराठ्यांनी तोफांचा मारा केला, सर्व भिंताडे जमीनदोस्त केली, पाणी अगोदरच तोडले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १७८९*
दिल्लीवर मराठा भगवा झेंडा 
गुलाम कादरने दिल्लीत जो हैदोस घातला त्यांच्या बातम्या महादजींच्या कानावर आल्या महादजींनी आपली फौज दिल्लीकडे पाठवली राणेखान, जिवबादादा बक्षी, रायाजी पाटील हे गुलाम कादरवर चालून आले...

एकूण रागरंग पाहून गुलाम कादरने लुट ताब्यात घेऊन दिल्ली सोडली मराठा फौजांनी गुलाम कादरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली गुलाम कादराने अहिल्याबाई होळकर वगैरे अनेकांना पत्रे पाठवून मदतीची याचना केली पण गुलामाच्या पापाचे घडे आता भरून आले होते.....
गुलाम मेरठमध्ये कोंडला गेला त्याच्या घोसगडा कडील रस्त्यावर मराठा फौजा आल्या गुलाम तहाची बोलणी करावयास लागला मराठयांना तो जिवंत पाहिजे होता.... 
गुलाम कादर शामली जवळ मराठा सैन्याच्या हातात जिवंत सापडला पैशासाठी त्याच्याशी बोलणी लावण्यात आली नाझीर खोझा, विलासराव, मणियारसिंग या गुलामाच्या साथीदारांना पकडून त्यांच्याकडे पैशाविषयी चौकशा करण्यात आल्या...
अखेर गुलामाचे डोळे काढून बादशाहाकडे पाठविण्यात आले ३ मार्च रोजी गुलामाचा शिरच्छेद करण्यात आला बादशाह शाहआलम ला परत दिल्लीच्या तख्तावर बसविण्यात आले खर्च काढून इतर लुट महादजींनी दिल्लीला पाठवली.... 
"मराठा फौजांच्या या कामगिरीने बादशाहाने त्यांना आपला झेंडा दिल्लीच्या किलल्यावर लावण्यास परवानगी दिली हा मराठा झेंडा पुढची पंधरा वर्ष म्हणजे १८०३ पर्यंत दिल्लीवर फडकत होता"...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्च १७९३*
श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब (पत्नी) रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना तीन-चार महिने ताप येत असताही कोणास निदान झाले नाही. यानंतर एक महिन्याच्या अवधीतच, दि. ३ मार्च १७९३ रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्नसमारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारण्याच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ मार्चला १८१८*
सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात
गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले  गेले. ६ पौंडी अथवा १२ पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज र्न मारा होत होताच. 
१ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करायला प्रिट्झलर काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर ३ तासांत गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरु केला गेला. शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"*  🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४