आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ आॅक्टोबर १२७०*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅक्टोबर १२७०* संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ आॅक्टोबर १६७२* महाराज केव्हाही गुजरातचे मालक बनतील अशी भीती मुंबईकर इंग्रज व्यक्त करताना दिसतात. आधीच धास्तावलेले सुरत कर यामुळे अधिकच भेदरून गेले. त्यातच प्रतापराव गुजरांकडून पुन्हा सुरतेच्या सुभेदारकडे व प्रजैकडे चौथाईची मागणी करणारे कडक पत्र आले. पाठोपाठ महाराजांचे सैन्य रामनगर पर्यंत येऊन धडकले. त्यामुळे सुरत करांच्या तोंडाचे पाणी पळाले नसते तरच नवल ! महाराजांच्या संभाव्य आक्रमणाला आवर घालण्यासाठी मोगलांनी जंजिरेकर सिद्धीला महाराजांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरतेहून वीस गलबतांचे आरमार त्यांच्या मदतीसाठी व किनारपट्टीवरील महाराजांचा मुलुख झोडपून काढण्यासाठी रवाना झाले. दिलेरखान ही सुरतेच्या आसपासच वावरत होता त्यामुळे गणदेवी पर्यंत येऊन ठेपलेले मराठी खानदेश, वराड, तेलंगणा भागाकडे वळले. बहादुरखान दिलेरखान सह त्यांच्या पाठलागावर निघाला पण वार्याच्या वेगाने पळणाऱ्या मराठ्यांचा बंदोबस्त करणे त्यांना शक्य होईना मराठ्यांनी रामगिरी (