नवरात्रउत्सव रात्र नववी घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध

♦️नवरात्रउत्सव रात्र नववी 

घरातील टाक आणि जानाई निर्ऋतिचा अनुबंध

         नितीन सावंत परभणीकर
         मो : 9970744142

                 इतिहास जपण्याच्या साधणांत आणि पुराव्यांच्या प्रकारात लिखीत, कागदोपत्री हेच एकमेव साधन नसते.तसे पुराव्यांचे विविध प्रकार आहेत.त्यावर अन्यत्र चर्चा करता येइल.पुर्वजांचा इतिहास जपून ठेवण्यात एक आगळेवेगळे ऐतिहासिक साधन म्हणून ज्याचा उल्लेख करवा लागेल ते म्हणजे टाक होत.
           आपल्या पुर्वजांची आठवण म्हणून देवघरात सोने, चांदी, पितळ, इ. धातुंचे बनवलेले प्रतिके म्हणजे टाक होत.
                आपल्या देवघरात आज्जी, पंजी, अज्जोबा, पंजोबांचे जसे टाक असतात, अगदी त्याच सारखे, खंडोबा, बहिरोबा, जोतीबा, जाकाई, जोकाई, मेसाई, जानाई यांचे देखील टाक दिसतात. म्हणजेच हे सर्व आपले कुळ पुर्वज होत. आपले सख्खे सलोहीत रक्तसंबधाचे पुर्वज होत.
                    काही  टाक हे पंचकोनी आसतात तर काही चौरस. त्यापैकी काहींच्या देवघरात पुजल्या जाणाऱ्या जाणाईच्या टाका बद्दल आपण चर्चा करू या. सातारा जिल्ह्यातील अनेकांच्या देवघरात हा जाणाईचा टाक आढळून येतो. तिच्या हातात गव्हाची ओंबी आहे. त्या हाताच्या वर  नांगर आहे. नांगरा खाली शिवलिंग आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतीचे प्रतीक बैल आहे. तसेच बाजूला लहान रुपात मुलगी आहे. या प्रकारच्या टाकातील स्त्रीला जानाई म्हटले जाते.या टाकत शेतीची प्रमुख स्त्री आहे. आणि वारसदार म्हणून मुलगी आहे. हे आहेत मातृवंशीय समाजाचे अवशेष. तिच्या एका हातात त्रीशूळ आहे. ही आयुधे, साधने आपल्यापुढे इतिहास उभा करतात. त्रिशूळ टोळी समाजाचे प्रतिनिधीत्व करतो. जानाई नाव जन म्हणजे ज्ञाती, बहिणीची ज्ञाती वा कुलांचा समूह, मातृसत्ता दाखवते. गव्हाच्या औब्या, शिवलिंग स्त्रिसत्ता दाखवते. नांगर, बैल पुरुषसत्ताक व्यवस्थेचा प्रतिनिधी.ती सर्वसामान्य स्त्री नाही तर तिने डोक्यावर मुकुट परिधान केलेला आहे.म्हणजे ती ज्ञातीप्रमुख आहे.आशाप्रकारे छोटासा टाक एका स्त्रीसत्ताक समाजाचा वारसा सांगतो. हा एक छोटासा टाक आपल्याला फार मोठ्या वारसाकडे घेऊन जातो.

                   ज्या काळात, लिखानाची कला अवगत नव्हती त्या काळात आपले पुर्वज आशा प्रतिकांच्या तथा सणवार, उत्सवांच्या आधारे इतिहास जपत होते.

                  जुण्या नाण्यांप्रमाणेच देवघरातील टाकही इतिहासाच्या संशोधनाचे एक साधन आहे.

                      हा स्त्रीचा टाक शेतीचा शोध लावणाऱ्या निर्ऋती पर्यंत जातो. शेतीची प्रमुख हक्कदार स्त्री असल्याचे सांगतो.निऋतीची वंशजा ही जानाई आहे.महाराष्ट्राभरात अनेक ठिकाणी जानाईचे मंदिरे आहेत.
                      आजूबाजूचा हा वारसा डोळस दृष्टीने पहाणाऱ्या नजरा मेल्या की भारतीय जनता गुलाम बनेल.इंग्रजांच्या पाश्चिमात्य नकारात्मक नास्तिकवादी धारणनेने पुरोगामी चळवळींचा सत्यानाशच झाला आहे.त्यांच्याकडे सत्यान्वेषाची कोणतीही मेथडोलॉजी नाही.भारतीय संस्कृती , वारसा , लोकदैवते , ग्रामसंस्कृती , लोकगिते , लोककलावंत हे काही हेटिंगचा आणि टाकावु विषय नाही.तो विधायक उकल करत जानारा मार्ग आहे.
                      यापासून आपण उपरे होता कामा नये. 
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...