२३ आॅक्टोबर १६७१*छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसरूर स्वारी नंतर एक महत्वाची माहिती - दंडाराजपुरी , जंजिऱ्याच्या सिद्दींवर दहशत बसवायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार पाठवले -

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ ऑक्टोबर १६६२*
छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये 'रोहिडखोरे - कारी' येथील देशमूख 'सर्जेराव जेधे' यांना पत्र लिहिले.
१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ आॅक्टोबर १६७१*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसरूर स्वारी नंतर एक महत्वाची माहिती - दंडाराजपुरी , जंजिऱ्याच्या सिद्दींवर दहशत बसवायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आरमार पाठवले - इ. स १६७१ ऑक्टोबर २३ (Mumbai- Surat Records) छत्रपती शिवाजी राजांचे राजपुरीदंडावर एक लहान आरमार गेले, राजीयांची जहाजे पाण्यातील सजली. गुराबा, तरांडी, गलबते, शिबाडे, पगार, अशी नाना प्रकारची जहाजे करून दर्यासागर म्हणून मुसलमान सुभेदार व सुभेदार मायनाक भंडारी, २०० जहाजे एक सुभा असे आरमार सजले.
मराठा व सिद्दींच्या जहाजांत युद्ध होऊन सिद्दीची जहाजे जिंकली. युद्ध मोठं होतं, दर्यात सिद्दींची जहाजे फिरेना अशी झाली. त्यावर दर वेळेस युद्ध चालू राहिले ह्यात चोरून मारून हबसी सामान नेत होता पण छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजे जागो समुद्रात तेंव्हा आपली स्थळे बळकट करत होती म्हणून सामान वाचले. जागो -जागी बंदरे, शहरे, म्हणजे मोगल, फिरंगी, इंग्रज, अश्या पातशहा पाण्यात आहेत त्यांची शहरे - बेदनूर, सौंदे, श्रीरंगपट्टण, ऐसी दर्या किनारे मारून युद्ध करून मालमत्ता मिळवली. अश्या प्रकारे आता मराठ्यांची ७०० जहाचे समुद्रात संचार करू लागली , एक समुद्रावरचं मराठा लष्कर, एक मोहीम सजली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ ऑक्टोबर १६८२*
सन १६८२ मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने मुघल सैन्याने कल्याण भिवंडीला वेढा दिला होता. इतर ठिकाणीही त्यांच्या आक्रमक हालचाली सुरू होत्या. अश्यावेळी मुघल, सिद्दी आणि इंग्रज एक झाले तर त्यापासून स्वराज्याला मोठा धोका निर्माण झाला असता म्हणून संभाजीराजेंनी इंग्रजांशी मैत्री करण्यासाठी आपले न्यायाधीश प्रल्हाद निराजी यांना इंग्रजांकडे पाठवायचे ठरवले. त्यानुसार प्रल्हादपंत ऑक्टोबर महिन्यात इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी निघाले. या भेटीत त्यांनी संभाजीराजेंचे सगळे हुकूम इंग्रजांना सांगितले. मुंबईच्या संरक्षणासाठी इंग्रजांना पैशाची व सैन्याची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. शिवाय मराठ्यांकडून इंग्रजाची झालेली नुकसानी भरून देण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी कळवले होते. या भेटीतच शंभुराजेंनी प्रल्हादपंतांच्या मार्फत इंग्रजांकडे दुर्मिळ वस्तू, कुत्री, लहान मोठी पिस्तुले, मोठे बिलोरी आरसे इत्यादी गोष्टी हव्या असल्याचेही कळवले होते. प्रल्हादपंतांच्या या भेटीचा वृंतात मुंबईकरांनी सुरतेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळवला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ ऑक्टोबर १७२६*
बाजीराव पेशवे श्रीरंगपट्टणवर स्वारी करण्यात निघाले. 
स्वारी नोव्हेंबर १७२६ ते एप्रिल १७२७ पर्यंत चालली. ही स्वारी यशस्वी झाली. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ ऑक्टोबर १७६४*
इंग्रज व फ्रेंच यांचे सप्तवार्षिक युद्ध सन १७६३ च्या पॅरीसच्या तहाने संपले. फ्रेंचांना हिंदुस्थानातील वसाहती परत करण्यात आल्या. फ्रेंचांतर्फे लॉरिस्टन ज्यावेळी हिंदुस्थानात आला त्यावेळी पाँडीचरीची अतिशय दयनीय स्थिती पाहून त्यास मोठी चिंता वाटली. महंमद अल्लीच्या लहरी स्वभावावर पाँडीचरीचे जीवन कंठणे प्राप्त झाले. पण पाँडीचरीचे जीवन १७६७ पर्यंत सुधारले. या काळात इंग्रजांनी कर्नाटकात आपला जम बसविला. केप कामोरिनपर्यंत कर्नाटक भूमीचे स्वामी झाले. महमदअल्ली नावाचा धनी राहिला. बंगालमध्ये त्यानी आपली शासनपद्धति सुरू केलीच. पण बक्सारच्या दिनांक २३ ऑक्टोबर १७६४ च्या लढाईने बनारसच्या पूर्वेकडील प्रदेश आपल्या अंकाखाली आणिला आणि स्वतः बादशहाने त्याचे संरक्षण पत्करले. अशा रीतीने इंग्रज ही जबरदस्त सत्ता हिंदुस्थानात सन १७६१ नंतर निर्माण झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ आॅक्टोबर १७७८*
कित्तूरची राणी चन्नम्मा यांचा जन्म.
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९) 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४