२४ ऑक्टोबर १६५७*शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १६२४*
भातवडी येथे मोगलांचा सुभेदार लष्करखान व आदिलशाही मुल्ला महंमद ह्या दोघांच्या छावणीवर मलिक अंबरच्या सैन्याचा अचानक हल्ला झाला व मलिक अंबराने त्या दोघांच्या पाडाव केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १६५७*
शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.
औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.
२४ऑक्टोंबर १६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल तर बलशाली आरमार (Navy) ऊभारले पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १६६६*
आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. २४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १६८३*
फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड व मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता. किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला. स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले. संतापलेले ३०० पायदळ आणि ६ मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले. पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १७०९*
कान्होजी आंग्रे यानी आपले आरमार भरभक्कम करून अरबी समुद्रात पोर्तुगीजांचा मुलाहिजा न बाळगता स्वतंत्रपणे वागण्यास प्रारंभ केल्याने पोर्तुगीजांचा आणि त्यांचा संघर्ष निर्माण होणे स्वाभाविक होते. त्याची परिणती अखेर पोर्तुगीज-आंग्रे युद्धात झाली. या युद्धाचा अहवाल गोव्याहून पोर्तुगालच्या राजाकडे जात होता. दि. २४ ऑक्टोबर १७०९ रोजी पोर्तुगालच्या राजाने व्हिसेरेइला सूचना केली की, आंग्यांना पिटल्याखेरीज त्यांच्याशी तहाचा करार करू नये. परंतु सातासमुद्रापलिकडे राहाणाऱ्या पोर्तुगालच्या राजाला आंग़्र्यांच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. ती कल्पना त्याला व्हिसेरेइने दि. २७ डिसेंबर १७१२ रोजी पाठविलेल्या पत्रातून करून दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १७७५*
बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा याचा जन्म.
(मृत्यू : ७ नोव्हेंबर १८६२)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ ऑक्टोबर १७८४*
मराठ्यांचे वाढते वर्चस्व पाहून इंग्रजांच्या घशात पुन्हा एकदा जळजळ उठली. आता कोणत्याही प्रकारे हिंदुस्थान कब्जा करायचा तर दिल्लीचा पातशहा 'आपला' असला पाहिजे याची पूर्ण खात्री वॉरेन हेस्टिंग्जला पटली. अन् म्हणूनच भविष्याचा विचार करून त्याने दिल्लीचा शहाजादा 'जबानबक्श' याला आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. बादशहाला ही बातमी समजली तेव्हा त्याची झोपच उडाली. बापाचा खून करून गादी बळकवण्याची थोर परंपराच जणू मोगलाईत होती. अशावेळेस आपल्याही मागे कोणीतरी मातब्बर असावा, जो इंग्रजांस शह देऊ शकेल असे बादशहाला वाटू लागले. असा मातब्बर कोण होता? होता ना... मराठ्यांचा सेनापती, महादजी शिंदे!! बादशहाने ताबडतोब निरोप पाठवून महादजींची भेट मागितली. मोगलांचा शक्य तितका वापर दौलतीकरता करता यावा या हेतूने महादजीही आग्र्याकडे मार्गस्थ झाले. दि. २४ ऑक्टोबर १७८४ रोजी फत्तेहपूर सिक्रीनजीकच बादशहाचा विश्वासू अफरासिआबखान आणि महादजींच्या भेटी झाल्या. हे पाहून अफरासिआबचा कट्टर शत्रू अन् शाहजादा जबानबक्शचा हस्तक महंमदबेग हमदानी याने १ नोव्हेंबरलाच अफरासिआबचा दग्याने खून पाडला. महादजींना हे समजताच त्यांनी हमदानीवर सैन्य पाठवून त्याला कुंभेरीपार पाठवून दिले. शेवटी दि. १३ नोव्हेंबर १७८४ रोजी भरतपूरजवळच महादजी शिंदे आणि बादशहाची भेट झाली. महादजींनी बादशहाला स्पष्टच सांगितले की, 'आपणास संपूर्ण अधिकार असल्याशिवाय आपल्याकडून बादशाहीचा बंदोबस्त होणे नाही.' आणि म्हणूनच महादजींनी श्रीमंत पेशव्यांच्या नावाने बादशहाजवळ 'वकील-इ-मुतालिक' ही सनद मागितली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४