आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२६ आॅक्टोबर १२७०*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ आॅक्टोबर १२७०*
संत नामदेव यांचा जन्म.
(मृत्यू: ३ जुलै १३५०)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ आॅक्टोबर १६७२*
महाराज केव्हाही गुजरातचे मालक बनतील अशी भीती मुंबईकर इंग्रज व्यक्त करताना दिसतात. आधीच धास्तावलेले सुरत कर यामुळे अधिकच भेदरून गेले. त्यातच प्रतापराव गुजरांकडून पुन्हा सुरतेच्या सुभेदारकडे व प्रजैकडे चौथाईची मागणी करणारे कडक पत्र आले. पाठोपाठ महाराजांचे सैन्य रामनगर पर्यंत येऊन धडकले. त्यामुळे सुरत करांच्या तोंडाचे पाणी पळाले नसते तरच नवल ! महाराजांच्या संभाव्य आक्रमणाला आवर घालण्यासाठी मोगलांनी जंजिरेकर सिद्धीला महाराजांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरतेहून वीस गलबतांचे आरमार त्यांच्या मदतीसाठी व किनारपट्टीवरील महाराजांचा मुलुख झोडपून काढण्यासाठी रवाना झाले. दिलेरखान ही सुरतेच्या आसपासच वावरत होता त्यामुळे गणदेवी पर्यंत येऊन ठेपलेले मराठी खानदेश, वराड, तेलंगणा भागाकडे वळले. बहादुरखान दिलेरखान सह त्यांच्या पाठलागावर निघाला पण वार्याच्या वेगाने पळणाऱ्या मराठ्यांचा बंदोबस्त करणे त्यांना शक्य होईना मराठ्यांनी रामगिरी (तेलंगणा) लुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ ऑक्टोबर १६७२*
मुघल दरबारातील ४ मुघली पथके व सरदार, सैनिक मुघलांना सोडुन स्वराज्यात दाखल झाले, त्यांच्यात प्रमुख सिद्धी हिलाल (वेडात मराठे वीर दौडले सातमधील) याचाही समावेश होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ ऑक्टोबर १६९९*
औरंगजेब स्वतः स्वारीवर निघाल्याचे छत्रपती राजाराम महाराजांस समजताच त्यांनी वऱ्हाड खानदेशात स्वारी करण्याची योजना आखली. ही योजना विदर्भातील देवगड नागपूरचा गौंडराजा बख्त बलंद याच्या प्रेरणेने झाली होती. २६ ऑक्टोबर १६९९ रोजी बादशहास कळले की, पुणे व बारामावळ येथे मराठे ठाण मांडून आहेत. बरेच खेडी म्हणजे बंडखोरांची आगरे बनली आहेत. याच दिवशी छत्रपती राजाराम महाराज साताऱ्याहून बाहेर पडले. साताऱ्याच्या पायथ्याशी राणोजी घोरपडे यांस तैनात करण्यात आले. छत्रपती राजाराम महाराजांबरोबर सात हजार स्वार असून धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, दादो मल्हार आदी सरदार होते. चंदनवंदन किल्ल्यापाशी महाराजांना बारा हजाराचे आणखी सैन्य येऊन मिळाले असे ४ नोव्हेंबर (१६९९) च्या मोगल दरबारच्या बातमीपत्रावरून समजते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ ऑक्टोबर १७६०*
रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्‍या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होऊ लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ ऑक्टोबर १८०२*
दुसरा बाजीराव पेशवा पलायन (ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्याच्या विस्तारास कारणीभूत पेशवा)

विठोजी होळकरांच्या ( डिसेंबर १८०१ साली) दुसऱ्या बाजीराव पेशव्याने केलेल्या अमानुष हत्येमुळे यशवंतराव होळकरांनी  पुण्यावर हल्ला करायचा निर्णय केला व पुण्याच्या दिशेने चाल केली. दिनांक ८ ऑक्टोबर १८०२ रोजी पेशव्याच्या फौजेचा बारामतीजवळ त्यांच्या फौजेने पराभव केला. होळकरांचा फौजफाटा पाहून घाबरलेल्या दुसऱ्या बाजीरावाने दिनांक १४ ऑक्टोबर, १८०२ रोजी पुणे येथील तत्कालिन रेसिडेंट कर्नल बॅरी क्लोज याच्याशी बोलणी करण्यासाठी आपला दुत पाठविला.पण  बोलणी पुर्ण होण्याअगोदरच परत पुण्याजवळ हडपसर येथे  होळकर आणि पेशव्यांच्या सेनेचे २५ ऑक्टोबर, १८०२ रोजी युद्ध झाले ज्यात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीराव २६ ऑक्टोबरला पळून महाडला गेला. व तेथुन सुवर्णदुर्गच्या आश्रयास गेला. तेथून त्याने मुंबईच्या गव्हर्नरशी आश्रयासाठी निरोप पाठविला. डिसेंबरमध्ये होळकरांची तुकडी सुवर्णदुर्गला पोहचली पण तत्पुर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून वसईला पोहचला. यशवंतराव होळकरांनी  त्यास समजाविण्याचा   आटोकाट प्रयत्न केला पण तरीही तो इंग्रजांना जाऊन मिळालाच.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ ऑक्टोबर १९४७*
जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांची संस्थान भारतात विलीन करण्यास मान्यता. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर ज्या संस्थानांनी विलिनीकरणास विरोध केला त्यापैकी काश्मीर हे एक होय. इथले राजे हरिसिंग आणि ४० टक्के जनता हिंदु तर उर्वरित ६० टक्के जनता मुस्लीम. त्यांचे नेते शेख अबदुल्ला हे विलीनीकरणाच्या विरोधात होते. याच कारणाने १९४७ ला हे विलीनीकरण घडले नाही.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. फाळणीनंतर निम्मी विमानं, विमानतळं आणि बरेचसे अधिकारी व वायुसैनिक पाकिस्तानात गेले. त्यानंतर जेमतेम दोन महिन्यांनी, २२ ऑक्टोबर १९४७ रोजी पाकिस्तानी लष्कराने सुमारे ३०००० पठाणी सेना काश्मीरात घुसवली होती आणि वेगाने श्रीनगरच्या दिशेने झेपावत होते. पठाणी झुंडीचा व पाकिस्तानी सैनिकांचा नेता पाकिस्तानी खड्या सैन्याचा मेजर जनरल अकबरखान हा होता. या सैन्याची प्रथम जम्मू-काश्मीरचा राजा हरिसिंग यांच्या फौजेशी गाठ पडली. कारण त्या वेळेपर्यंत या प्रदेशाचं भारतात विलीनीकरण झालेलं नव्हतं. इतक्या प्रचंड सेनेस तोंड देईल इतकी सक्षम सेना हरिसिंगाकडे नव्हती. सीमेजवळील मुझफ्फराबाद, उरी, डोमेल आणि बारामुल्ला ही ठिकाणे अक्षरश: लुटत आणि जाळत हल्लेखोर वेगाने राजधानी श्रीनगरच्या रोखाने आगेकूच करत होते. २३ ऑक्टोबरला मुजफ्फराबाद घुसखोराच्या हाती पडले. २४ ऑक्टोबरला श्रीनगरचे वीजकेंद्र उडवल्यामुळे श्रीनगर अंधारात बुडाले. पाकिस्तानी पठाणी झुंडिने २६ ऑक्टोबरला काश्मीरमधील बारामुल्लावर आक्रमण करुन सुमारे ३००० कश्मीरी लोकांची कत्ल केली. हजारो स्त्रियांवर पाशवी बलात्कार केले व अनेक मृत्युमुखी पडल्या. मुझफ्फराबाद ते बारामुल्ला या मार्गावरील गावांची जाळपोळ,लुटालूट आणि कत्तल करत पाकिस्तानच्या पठाणी झुंडिने मार्गक्रमण केले.

हरीसिंहांना पुढचा धोका दिसू लागला. अशा परिस्थितीत या पठाणी सेनेविरोधात महाराजा हरिसिंह यांनी भारतीय सेनेची मदत मागितली मात्र विलीनीकरण झाल्याशिवाय मदत नाही, अशी भूमिका भारत सरकारने घेतल्यामुळे हरिसिंगाकडे इतर पर्याय नव्हता आणि त्याने करारावर स्वाक्षरी केली. या तहनाम्यानुसार संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळणाची जबाबदारी केंद्र सरकारवर सोपविणयात आली. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४