आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ ऑक्टोंबर १६५९*अफजलखानाच्या भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी...
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑक्टोंबर १६५९*
अफजलखानाच्या भेटीचा मसुदा व अटीबाबत अंतिम बोलणी...
आजच्या दिवशी गोपीनाथपंतांच्या शिष्टाई मुळे राजे आणि अफजलखानाचे भेट जवळपास नक्की होणार होती. वाटाघाटी अंतिम टप्यात आल्या होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑक्टोबर १६७९*
मुंबई बेटाजवळील खांदेरी बेट ताब्यात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर आपली माणसे उतरवून कोटाचे बांधकाम सुरू केले होते. मुंबई जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार असणे इंग्रजांना धोकादायक असल्याने त्यांनी या बांधकामाला विरोध करत खांदेरीची नाकेबंदी केली. पण मराठ्यांचे चपळ आरमार त्यांना मात देत खांदेरीवर रसद पोहोचवत असे. त्यामुळे इंग्रजानी मुंबईहून ८ तोफा, १४ इंग्रज सैन्याच्या ५ फायली आणि ३० खलाशी देऊन फोर्टून नावाचे जहाज कॅप्टन स्टीफन अंडरटन याच्या नेतृत्वाखाली खान्देरीच्या नाकेबंदीला पाठवले. या जहाजाबरोबर आणखी दोन तोफा असलेली शिबाडे पाठवली. आता खांदेरीच्या नाकेबंदीत असलेल्या पथकात रिव्हेंज, हेक्टर गुराब, फोर्बुन, ५ शिबाडे आणि मचवे एवढे सामील झाले. खांदेरीच्या नाकेबंदी साठी फोर्चुन मुंबईहून रवाना झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑक्टोबर १६८३*
मुघल आरमाराला पोर्तुगीज मदत करत असल्याच्या कारणावरून संभाजीराजेंनी त्यांच्या उत्तर कोकणातील प्रांतावर स्वारी केली होती. या हल्ल्याने पोर्तुगीजांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे गोव्याचा पोर्तुगीज विजरईने मराठ्यांच्या ताब्यातील दक्षिण कोकणातील प्रांतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. फोंडा किल्ला हा मराठी पोर्तुगीज सरहद्दीवर होता. त्यामुळे मुलखाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्वाचा होता. या किल्ल्यावर पोर्तुगीज विजरई हल्ला करणार असल्याची बातमी समजताच छत्रपती संभाजी महाराज आपले सैन्य घेऊन ते फोंडयाच्या मदतीसाठी गेले होते. याबाबत इंग्रजांची नोंद अशी, आम्हाला असे वाटते की संभाजीराजेंचे सैन्य काही काळ तरी तुमच्या भागाला त्रास देणार नाही. कारण आम्हाला खात्री आहे की, संभाजीराजे स्वतः जातीने १५ हजार लोकांसह गोव्याजवळील फोंडा घाटाकडे गेले आहेत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ऑक्टोबर १७४०*
बाजीराव पेशव्यानी छत्रपती शाहू महाराजांच्या धोरणानुसार माळवा प्रांताचे सुभेदारीची व काशी, प्रयाग, गया आणि मथुरा या हिंदूंच्या पवित्र क्षेत्रांची मागणी मोगल बादशहाकडे केली होती. निजामाने या मागणीस बादशहाची मान्यता मिळवून देण्याचे कबूल केले होते. पण ही मागणी पूर्ण होण्यापूर्वीच बाजीराव पेशवे तारीख २८ एप्रिल १७४० रोजी मरण पावले. तेव्हा ही अपुरी कामगिरी पार पाडण्याची कामगिरी बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब यांस करावी लागली. पेशवे बाळाजी बाजीरावांनी तारीख २१ ऑक्टोबर १७४० रोजी पुण्याहून उत्तरेस जाण्याकरिता निघून माळवा प्रांतावर चढाई केली. बादशहाने प्रयागचा सुभेदार व अयोध्येचा सुभेदार ह्यांना सवाई जयसिंगास मराठ्यांच्या विरुद्ध जाण्यासाठी हुकूम सोडिले. वरील दोन्ही सुभेदारांनी सवाई जयसिंगाच्या मदतीस जाण्यास कुचराई केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ आॅक्टोबर १८५८*
प्राणहितेचा पुत्र, गोंडवनाचा शेर अशा अनेक उपाधींनी गौरविलेले क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर सेडमाके यांचा २१ अॉक्टोबर हा स्मृतिदिन....................!
त्या निमित्ताने या निधड्या छातीच्या क्रांतिवीराला विनम्र अभिवादन ...........!!
त्यांचा जन्म १२ मार्च १८३३ मध्ये दक्षिण गोंडवनाच्या अहेरी जमीनदारीत मोल्लमपल्ली(किष्टापूर)येथे सेडमाके घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुल्लेसूर तर आईचे नाव जुरजाकुंवर होते. त्यांना लक्ष्मणराव, गोविंदराव आणि व्यंकटराव असे तीन लहान भाऊ होते. त्यांनी गोटुल केंद्रात कुस्ती, तलवार, भालाफेक, तिरकामठा आणि बंदूक चालवणे इ.विद्या शिकून घेतल्यानंतर पुढील शिक्षण लॉर्ड डलहौसीने सुरु केलेल्या रायपूरच्या इंग्रजी शाळेत पूर्ण केले. तिथे शिकता शिकताच त्यांना ब्रिटिशांच्या सत्तेचा अजगरी विळखा पाहायला मिळाला. तेव्हा ते रायपूरहून अहेरी जमिनदारीत परतले. शिक्षणाने त्यांच्या व्यक्तिमत्वात कमालीचा बदल झालेला होता. स्वाभिमान, अस्मिता आणि अस्तित्व तसेच स्वराज्याच्या गुलामीची त्यांना जाणिव झाली होती. इंग्रजांच्या कपटनितिचे डाव त्यांच्या लक्षात येवू लागले होते. इंग्रजांच्या वरदहस्ताने येथील सावकार वीर बाबुरावांच्या जमिनदारीत आपला लुटमारीचा धंदा चालू केला होता. नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागे. गरीब जनतेचा फायदा हे सावकार घेत होते. पुढे चालून वीर बाबुरावांच्या अंगी निर्णय क्षमता आणि नेतृत्वक्षमता आलेली होती. वडिलधाऱ्या माणसात बसून बौध्दिक विचारमंथन करण्याची क्षमता व समज वृध्दींगत झालेली होती. इंग्रजांच्या जुलमी सत्तेमुळे आणि सावकारांच्या लुबाडणूकीमुळे देशाच्या एकतेला व अखंडतेला हादरे बसू लागले. त्यामुळे बाबुराव सेडमाके बेचैन झाले. आणि त्याच वेळी त्यांनी दृढनिश्चय केला, "देशाला विकून स्वतः ची पोटं भरणाऱ्यांना मला यमसदनी पाठवायचं आहे. या देशात गुलामीचं जीवन जगणारे लोकं देखील आपलेच आहेत. परकीयांच्या मदतीने येथील सामान्य जनतेला फसवून त्यांचं शोषण करणारेही आपलेच लोक आहेत. हे आज मी डोळ्यांनी बघत आहे. गरीब जनतेला दुःख देणाऱ्या, त्यांना लुटणाऱ्या येथील इंग्रजधारी दुश्मनांना रोखणे हे माझे परम कर्तव्य आहे." त्यासाठी त्यांनी 'जंगोम' संघटनेची स्थापना केली. दरम्यान वीर बाबुरावांचे वंदणीय प्रेरणागुरु, मार्गदर्शक महाराजा शंकरशहा व रघुनाथशहा मडावी यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी ठार केले. तेव्हा वीर बाबुराव प्रचंड संतापले. आणि लगेच त्यांनी राजगड वर प्रथम हल्ला केला. अशाप्रकारे स्वाभिमान, अस्मिता आणि अस्तित्वाची, जुलमाविरुद्धची लढाई चालू झालेली होती. राजगडच्या विजयानंतर इंग्रज अधिकाऱ्यांनी देखील ठरविले की, काहीही झालं तरी चालेल, पण वीर बाबुरावांना पकडायचंच. परंतु वीर बाबुराव इंग्रज बगलबच्यांना सापडणारा नव्हता. अशा तऱ्हेने वीर बाबुरावाने राजगड, नांदगाव, घोसरी, गडीचुर्ला, बामनपेठ आणि सगणापूरच्या लोकांना इंग्रजी राजवटीच्या जुलूमापासून मुक्त करण्याचं महान कार्य केलं. सन १८४८ मध्ये क्रीक्टनने चांदागड ते मोल्लमपल्ली पर्यंत टाकलेल्या टेलिफोन तारा उखडवून टाकण्याचं कार्य वीर बाबुरावांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने पूर्ण केले. या घटनेने क्रीक्टन प्रचंड चवताळला. तेव्हा त्यांना कळून चुकले की, वीर बाबुरावांना पकडणे अशक्य आहे. तेव्हा त्यांनी शेक्सपीयरच्या मदतीने धूर्त आणि कपटाचं राजकारण करायचं ठरवलं. क्रिक्टन आणि शेक्सपीयर यांनी वीर बाबुरावांला पकडण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना आतल्या आत भडकावण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या संघर्षाला, आंदोलनाला कमजोर करण्याचा प्रयत्न केला. शेवटी लक्ष्मीबाई त्यांच्या गळाला लागली. आणि क्रिक्टनच्या कपटी राजकारणाचा विजय झाला. आपल्या आप्तजनांच्या विश्वासावर विसंबून वीर बाबुराव लक्ष्मीबाईच्या घरी भेटायला आले... आणि तिथेच त्यांचा घात झाला. गोंडवनाचा शेर,देशाचा क्रांतिवीर बाबुराव सेडमाके १८ सप्टेंबर १८५८ ला गुप्तवाटेने रात्री लक्ष्मीबाईच्या घरी आले. लक्ष्मीबाईच्या आग्रहाखातर भोजनाकरीता बसले. इतक्यात शेक्सपीयरच्या सैन्यानं वीर बाबुरावांना घेरलं. वीर बाबुराव चपळाईने उठले, मात्र निशस्त्र बाबुराव काहीच करु शकले नाही. इंग्रज सैन्यानी त्यांना पकडलं. स्वजनांनीच घात केला. बाबुराव बेडीत कैद झाले. शेक्सपीयरच्या चेहऱ्यावर मात्र कपटी हास्य उमटले. वीर बाबुराव कपटाने पकडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. जनतेच्या मनात इंग्रजांबद्दलचा आक्रोश शिगेला पोहोचला. वीर बाबुरावांना कैद करुन अहेरीतून त्वरेने चांदागडच्या तुरुंगात ठेवण्यात आले. कशाचाही विलंब न करता वीर बाबुरावांच्या फाशीचा दिवस मुक्रर करण्यात आला.२१अॉक्टोबर १८५८ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता चांदागडच्या जेलमध्ये पिंपळाच्या झाडाला फाशी देण्यात आली... अशा तऱ्हेने प्राणहितेचा पुत्र, गोंडवनाचा शेर, देशाचा क्रांतिवीर शहीद झाला. त्यांच्या विरतेला विनम्र अभिवादन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ ॲाक्टोबर १९४३*
सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment