Posts

३० आॅगस्ट १६५८छत्रपती शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे पत्र घेऊन पाठवले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० आॅगस्ट १६१५ बाजीप्रभूंचा जन्म ३० आॅगस्ट १६१५ रोजी शिंद, ता. भोर, जि. पुणे येथे झाला. बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते. बांदलांचे बाजी सरनोबत होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. दोन्ही हातांनी दोन समशेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता. शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० आॅगस्ट १६५८ छत्रपती शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे पत्र घेऊन पाठवले. ३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबला शिवाजीराजेंच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवाजी राजेंनी  पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे. शिवाजी राजेंनी त्याच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते पत्र उ

२९ आॅगस्ट १६८२छत्रपती संभाजीराजांसोबत असणारा स्वराज्याचा इमानी सेवक "परशुराम जोगी" याला मुघल सरदाराने फीतुरी करून "साल्हेर किल्ला" मुघलांना देण्याची सूचना केली.पण "साल्हेर" स्वराज्यात सुरक्षित.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ आॅगस्ट १६६६ आग्र्याहून सुटकेनंतर मुघल सैन्याने "घोलपूर" जवळ ३ व्यक्तींना संशयित म्हणून अटक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ आॅगस्ट १६८२ छत्रपती संभाजीराजांसोबत असणारा स्वराज्याचा इमानी सेवक "परशुराम जोगी" याला मुघल सरदाराने फीतुरी करून "साल्हेर किल्ला" मुघलांना देण्याची सूचना केली. पण "साल्हेर" स्वराज्यात सुरक्षित. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २९ ऑगस्ट १७०९                               श्री                                   देव स्वस्तिश्री श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध शष्टी इंदूवारस क्षेत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी राजश्री सरदारांनी पागा व शिलेदार (सिलेदार) व हवालदारांनी व कारकुणांनी व लोकांनी किलेहाय व माहालनिहाये व बाजे यास आज्ञा केली ऐसी जे श्री वास्तव चिंचवड यास मौजे चिखली तालुका हवेली प्रांत पुणे हा गाव कुलबाबा कुलकानू हालीपटी पेस्तरपटी देखील सरदेशमुखी सावोत्रा व सरपाटीलकी व सरगौडकी इनाम आहे ऐशस श्रीचा इनाम बिलाकुसूर चालवणे स्वामीस अगत्य आहे त

२६ ऑगस्ट १६६४छत्रपती शिवरायांनी मालोंड बंदर जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ आॅगस्ट १३०३ अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले - राणी पद्मावतीचा जोहर  शहाबुद्दीन घोरी निघून गेल्यावर सुमारे शंभर सव्वाशे वर्षे पर्यंत चितोडच्या राजांना बरीच विश्रांती मिळाली. गुलामवंशी  सुलतानांनी त्यांना फारसा उपद्रव दिला नाही .परंतु अल्ला-उद्दीन खिलजी यांची सर्वव्यापी दृष्टी त्यांना फार दिवस चुकवता आली नाही. राणा लक्ष्मणसिंह चितोड येथे राज्य करीत होते. त्यांचे काका रतन सिंह यांनी रुपवती कन्या पद्मावती यांच्याशी विवाह केला होता. पद्मावतीच्या सौंदर्याची किर्ती अल्लाऊदिन खिलजी याच्या कानावर पडली. पद्मावतीला मिळवण्यासाठी अल्लाऊदीन खिलजी याने चितोडवर स्वारी केली. लढाईत राजा रतनसिंह यांना वीर मरण आले. शेवटी इलाज चालत नाही असे पाहून, राणी पद्मावतीनेआपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी पेटत्या अग्नीकुंडात उड्या टाकून राणी पद्मावतीने १६०० स्रियासह अग्नीत प्रवेश केला तो दिवस होता २६ आॅगस्ट १३०३ पद्मावती जोहार करून अजरामर झाली, आणि अल्लाऊदिन खिलजी राखेचे ढीग तुडवीत किल्ल्यावर फिरत राहिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ ऑगस्ट १४९८ १४८४ साली पोर्

२५ आॅगस्ट १६७६"किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅगस्ट १६७४ गोव्यातील "किल्ले फोंडा" वर मराठ्यांचा हल्ला. पण काही चुकीच्या धोरणामुळे हा प्रयत्न फसला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ आॅगस्ट १६७६ "किल्ले जंजिरा" च्या तटबंदीला शिड्या लावलेल्या लायजी पाटलांचा छत्रपती शिवरायांनी सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २५ ऑगस्ट १८०५ यशवंतराव होळकर इंग्रजांच्या लष्करी हालचालींच्या बातम्या काढीत होते. इंग्रजानाही भरतपूरच्या लढाईनंतर आपल्या फौजेची जुळवाजुळव करण्यास सवड हवी होती. पण त्यांना यशवंतरावांचा पिच्छा सोडावयाचा नव्हता. यशवंतराव त्यांचा सदर हेतू ओळखून होते. पंजाब हा त्यानी दौडीचा प्रदेश ठरवून पंजाबातील शीख व त्यांच्या पलिकडील अफगाण यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरु होता. दिनांक २५ ऑगस्ट १८०५ रोजी यशवंतराव राजस्थानच्या बाजूस, दिल्लीच्या अलिकडे असलेल्या रेवाडी नांवाच्या गांवाहून निघाले. मीरखान तीन चार दिवस मागे राहिला होता. शिंद्यांना सामील करून घ्यावे या उद्देशाने तो रेवाडीहून हालला नाही. यशवंतरावानी शिखांशी संधान बांधून त्यांना अनुकूल करून घेतले होते. त्यांचे फ्रेंच व प

२४ आॅगस्ट १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी आज "उत्तर कर्नाटक" जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६०८ ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६५७ औरंगजेबने जर संपूर्ण आदिलशाही बुडवली तर तो अधिक प्रबळ बनेल व "शाहजहान" नंतर आपला प्रतिस्पर्धी म्हणून "दारा शुकोह"ने शाहजहानच्या संमतीने आदिलशहाशी तह केला. त्यात कल्याणी, परिंडा व त्याभोवतालचा भाग, निजामशाही कोकणातील किल्ले, वांगणी परगणा व खंडणीदाखल दीड कोटी रुपये द्यावेत अशा तहातील मुख्य अटी होत्या.  दिल्लीला बादशहा शहाजहान आजारी पडल्याची बातमी औरंगजेबास समजली म्हणून औरंगजेबाने आपली दक्षिणेकडील मोहीम आटोपती घेतली व त्याने सरळ दिल्लीची वाट धरली. इकडे बड्या साहेबिणीने विजापूर दरबार भरविला आणि त्यांत छत्रपती शिवाजीराजांच्या पारिपत्याचा विचार केला. छत्रपती शिवाजी राजांना शासन करावे हे दरबारांत ठरले व ही कामगिरी धिप्पाड अफगाण सरदार अफझलखान याजवर सोपविण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २४ आॅगस्ट १६६१ छत्रपती शिवरायांच्या राणीसाहेब "सकवारबाई" यांना कमळाबाई नावाचे कन्यारत्न प्राप्त झाले. 🏇🚩🏇🚩🏇

२३ ऑगस्ट १६६३छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६३ छत्रपती शिवरायांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील "आचरे" ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ छत्रपती शिवरायांच्या आग्रा सुटकेनंतर मुघल सैनिकांनी "कवी परमानंद" यांना "दौसा" येथून ताब्यात घेतले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ आॅगस्ट १६६६ आग्र्याहून सुटकेनंतर छत्रपती शिवरायांनी खोटे शाही दस्तक दाखवून "चंबळ" नदीचा परीसर नावेने पार केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ ऑगस्ट १६६६ आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या महाराजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व महाराजांना विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांना दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्त

२२ ऑगस्ट १७३३ पर्यंत जंजिरा आणि अंजनवेल हे वगळता सिद्दीची बाकीची सर्व ठाणी मराठ्यांच्या ताब्यात आली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ आॅगस्ट १६३९ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ ऑगस्ट १६८२ औरंगाबाद ही मुघलांची दक्षिणेतील राजधानी.औरंगजेब दख्खन मोहिमेवर आल्यापासून म्हणजे १६८१ पासून ते १६८३ पर्यंत मराठे मुघलांच्या आक्रमणाला तोंड देण्यासोबतच मुघल प्रदेशात हल्ले करून त्या भागाची लुटही करत असत. १६८१ च्या मे महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद परिसरात लूट करून तो प्रदेश उध्वस्त केला होता. त्यासोबतच १६८२ च्या एप्रिल महिन्यात मराठ्यांनी औरंगाबाद पासून जवळच असणारे जालना शहर लुटले होते. २२ ऑगस्ट १६८२ च्या अश्याच एका हल्ल्यात औरंगाबाद पासून जवळच असणाऱ्या कन्नडचा ठाणेदार शहा अलीलनरा जखमी होऊन मराठ्यांच्या हाती लागला. मराठ्यांनी त्याला कैद करून ताब्यात घेतले. आणि मुघल सरदार खानजहान बहाद्दूरला जाऊन मिळाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ ऑगस्ट १६८७ मोगलांच्या सोबत सुरू असलेल्या जीवनमरणाच्या संघर्षातही संभाजीराजे राज्यकारभारात किती तत्पर होते ते त्याच्या पत्रावरून लक्षात येते. शिवाजी महाराजांनी वाई प्रांतातील कसबे निंब येथील