२९ आॅगस्ट १६८२छत्रपती संभाजीराजांसोबत असणारा स्वराज्याचा इमानी सेवक "परशुराम जोगी" याला मुघल सरदाराने फीतुरी करून "साल्हेर किल्ला" मुघलांना देण्याची सूचना केली.पण "साल्हेर" स्वराज्यात सुरक्षित.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२९ आॅगस्ट १६६६
आग्र्याहून सुटकेनंतर मुघल सैन्याने "घोलपूर" जवळ ३ व्यक्तींना संशयित म्हणून अटक केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२९ आॅगस्ट १६८२
छत्रपती संभाजीराजांसोबत असणारा स्वराज्याचा इमानी सेवक "परशुराम जोगी" याला मुघल सरदाराने फीतुरी करून "साल्हेर किल्ला" मुघलांना देण्याची सूचना केली.
पण "साल्हेर" स्वराज्यात सुरक्षित.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२९ ऑगस्ट १७०९ 
                             श्री
                                  देव
स्वस्तिश्री श्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध शष्टी इंदूवारस क्षेत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी राजश्री सरदारांनी पागा व शिलेदार (सिलेदार) व हवालदारांनी व कारकुणांनी व लोकांनी किलेहाय व माहालनिहाये व बाजे यास आज्ञा केली ऐसी जे श्री वास्तव चिंचवड यास मौजे चिखली तालुका हवेली प्रांत पुणे हा गाव कुलबाबा कुलकानू हालीपटी पेस्तरपटी देखील सरदेशमुखी सावोत्रा व सरपाटीलकी व सरगौडकी इनाम आहे ऐशस श्रीचा इनाम बिलाकुसूर चालवणे स्वामीस अगत्य आहे तरी तुम्ही ते जाणोन मौजे मजकूरीस घासदाणियाचा अगर फडफमारस वरकड कोणहे बाबेचा उपद्रव येक जरा न देणे रोखापत्र न करणे मौजे मजकुराचा ऐवज सदरहू बाबती देखील श्री कडे पावेल तुम्हास कथला कुसुर करावया गरज नाही बोभाट अलियास ताकिद होईल.
                                            मर्यादेयं विराजते

मराठी अनुवाद
श्री राजा शाहू छत्रपती यांनी चिंचवडच्या देवाने दिलेली चिखली गावाची सनद यांना सरदेशमुखी आणि सरपाटीलकी आणि सरगौडकी इनाम आहे.
श्री चा इनाम बिल कसूर चालवणे कोणताही त्रास न देता व कोणताही उपद्रव न करता हे इनाम चालू द्यावे असे छत्रपती शाहू महाराजांचे आज्ञापत्र किंवा एक हुकुम आहे मराठी भाषेमध्ये आज्ञा.
आणि ही आज्ञा स्वराज्यातील सरदार शिलेदार पागा हवलदार कारकून किल्लेदार आणि सर्वसामान्य रयत जनता त्या सर्वांना ही अज्ञान लागू होती या आज्ञेचे सर्वांनी काटेकोर पालन करावे अशी छत्रपती शाहू महाराजांची आज्ञा

पाहायला गेले तर चिंचवड देवस्थानला चिखली गावची एक सनद आहे पण लक्ष देऊन पाहिले तर एका छत्रपती ची आपल्या सत्तेवर आणि आपल्या स्वराज्यातील सरदार किल्लेदार शिलेदार हवालदार कारकून आणि सर्वसामान्य रयत मधील जनता या सर्वांवर काय पकड आहे हे दिसून येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२९ ऑगस्ट १७८७
दि. २९ ऑगस्ट १७८७ या दिवशी नाना फडणिसानी पुणे दरबारातील पोर्तुगीजांचा वकील नारायण शेणवी धुमे यास बोलवून घेऊन त्याच्यापाशी सोंधेच्या राजाची वास्तपूस केली. ते त्याला म्हणाले, 'संवदेकरांचे पोर्तुगीजानी आजपर्यंत काय केले ते कळून आलेच आहे. आता आपण त्याचे बरवे करू इच्छितो. त्याला आपल्या राज्यावर बसविण्यास शक्य झाल्यास पाहातो.' नाना फडणीस यांचे वरील उद्गार सूचक होते. पोर्तुगीजानी सोंधेच्या राजाचे काहीच बरे केले नव्हते. परस्पर मैत्रीच्या कराराखाली त्यानी सोंधेकरांचे महाल सैन्य धाडून आपल्या ताब्यात घेतले; परंतु सोंधेच्या राजाची त्या महालात काडीचीही सत्ता नव्हती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...