क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा दुर्मिळ फोटो

क्रांतिसिंह नाना पाटील यांचा हा दुर्मिळ फोटो परवा विट्यामधे कॉम्रेड आनंद मेणसे यानी आम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापिठाला भेट दिला .त्या नंतर या फोटोची चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्या संबंधातील एक लेख इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्री माणसिँग कुमठेकर यानी प्रा. गौतमा काटकरसर या़च्या मदतीने दै. तरुण भारतमधे विस्तृत लेख लीहला .याच बरोबर काही मित्रानी समाज माध्यमावरही काही माहीती प्रसारीत केली. त्या नंतरतर या फोटोची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली.

    मीही याची जास्त माहीती घ्यायला सुरु केली. कॉम्रेड आनंद मेणसे याना हा फोटो कॉम्रेड प्रेमाताई पुरब यांचेकडे मिळाला. प्रेमाताई यांचेकडे हा फोटो कसा आला ? प्रेमाताई आणि क्रांतिसिह यांचे संबध अत्यंत जिव्हाळ्याचे , कौटुंबिक होते. क्रांतिसिंह एकवेळ प्रेमाताईच्या घरी गेले असता . त्याना त्यांच्या शर्टाच्या खिशात हा फोटो हाताला लागला. त्यानी तो प्रेमाताईकडे दिला आणि सांगितले हा ठेव तुझ्याकडे. माझेकडे हा सांभाळायला जागा कुठे आहे. त्यानी प्रेमाताईना त्या संबधातील इतिहास ऐकवला.

     १९३२ साली त्याना पहील्यांदा तुरुंगवास झाला होता. पण तुरुँगातून सोडताना त्याना इस्लामपूरच्या पोलीस स्टेशनवर सकाळ संध्याकाळ असि दोनवेळ हजेरी देणेची आॕर्डरही झाली होती. येडे मच्छीद्र ते इस्लामपूर कृष्णा नदी पार करुन दिवसातून दोनवेळ पायी चालत जावून पोलीस स्टेशननला हजेरी देने अवघड होते. त्यामुळे इस्लामपूर येथे राहणे भाग होते. पण इस्लामपूर येथे राहणे ,जेवणे आर्थीकदृषौट्या परवडणारे न्हवते. सरकारने घर जमीन जप्त केले होते त्यामुळे उत्पन्नाचे साधन न्हवते. क्रांतिसिंहानी त्यावेळी इस्लामपूर काॕग्रेस कमिटीकडे मदतीसाठी विनंती केली. पण ततकालीन कॉग्रेस कमिटीने त्यांची विनंती त्याना अपमाणित करुन नाकारली. त्यानी मोटार गाडीअड्ड्यावर हमाली करायची तयारी केली पण माणूसकि संभाळून असणार्या सर्सामान्य हमालीलानी त्याना हमाली करणेस मणाई केली हमाल म्हणाले तुम्ही मोठी माणस हायसा.देव हायसा तवा हे काम तुमी करु नका आम्ही आमच्या हमालीच्या पैशातून तुमचा खर्च भागवतो. पण हमालाँच्या कष्टाचा पैसा असा फुकट घेणे नाना पाटलाना मंजुर न्हवते. शेवटी त्यानी आपला मुक्काम एका झाडाचा पारावरच ठोकला. घाडगे बाबाचे एक शिष्य खानावळ चालवत होते तेच त्याना दोन भाकरी आणि कालवन आणून देत असे . पण पोलींसाचा ससेमिरा सुरु झालेवर त्यानेही हात अखडता घेतला . पुन्हा त्यानी मक्याची  दोन कणस सकाळी व दोन कणस संध्याकाळी कुठुनतरी भाजुन घ्यायची व त्यावरच आपली भुक भागवणेस सुरवात केली. पोटाचा प्रश्न असाकसातरी सोडवला तरी अंगावरील कपड्याचे काय ? पोटभर खायलाच पैसे न्हवते तर कपडे कुठून घेणार ? यावर उपाय म्हणून त्यानी गाडीअड्यावरील हमालाचेकडून एक पोते मिळवले. त्याचे बंद असलेल्या बाजुला मधे व दोन्ही बाजूला दोन भोके पाडून ते पोतेच सदरा म्हणूनघालयला सुरवात केली. पुढे पॕरोल संंपेपर्यत त्यानी पोत्याचाच सदरा घातला होता.यावेळी त्यांचे अनेकजन पोतेबुवाच म्णत होते. याच काळात एकजनाने त्यांचा हा फोटो काढला व त्याची एक छोटीसी कॉपी त्यांचेकडे दिली होती ती बरेच दिवस त्यांच्या खिशात होती . वर सांगीतल्याप्रमाणे त्यानी सहजम्हणून आपल्या सहकारी प्रेमाताईकडे दिली. प्रेमाताई सजग , जानत्या कम्युनिष्ट कार्यकर्त्यां आहेत त्याना त्या फोटोचे ऐतिहासिक मुल्य माहीत होते . त्यानी बरेच दिवस तो लहानसा फोटो अत्यंत जपुन ठेवला जेव्हा हे फोटो व्यवस्थीत विकसित करणेचे तंत्र उपलब्द झाले तेव्हा तो त्यानी मोठा करुन आपल् कष्टकरी महीलां संघटेनेच्या आफीसमधे मोठ्या दिमाखात लावला. तिथून कॉम्रेड आनंद मेणसे यानी त्यांचेकडे नेहला . गेली ३/४ वर्षे तो फोटो आम्ही आमचेकडे उपलब्ध करुन घेणेचा प्रयत्न करीत होतो . तो शेवटी परवा ६ अॉगष्ट रोजी कॉम्रेड मेणसेसरानी मोठ्या सन्मानपुर्वक आम्हाला भेट दिला. 
      आज या फोटोची चर्चा सर्वत्र होत असताना क्रांतिसिंहाच्या कष्टप्रद वाटचालीचा इतिहासही डोळ्यासमोर उभा राहतो.
सुभाष पाटील याचा लेख 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४