नाण्यांवरील *नागदेवते* विषयी थोडी माहिती.

*🐍

नाण्यांवरील *नागदेवते* विषयी थोडी माहिती.

*काही भारतीय जुन्या नाण्यांवर आपल्याला नागांची,नाग फण्यांची चित्रे-ठसे-चिन्हे अंकित  केलेली दिसतात*
त्यापैकीच एक म्हणजे *गुटी(आंध्र प्रदेश )* येथील *मराठा सरदार घोरपडे* यांची *नाग* चिन्ह अंकित असणारी  नाणी. 
वरील तांब्याच्या  नाण्यात *पुढील बाजूस आपल्याला पाच फण्यांचा नाग व मागील बाजूस किल्ले व्यंकटगिरी या अक्षरांपैकी किल्ले ट गि ही अक्षरे दिसत आहेत.*
सरदार घोरपडे यांचे *राजचिन्ह नाग* हे असल्यामुळे त्यांच्या सोने व तांब्याच्या नाण्यांवर तसेच इतरही ठिकाणी हे चिन्ह पहायला मिळते.

*गुटीचे घोरपडे हे मुळ भोसले वंशाचे होते. १४ व्या शतकात ते राजस्थान मधून दक्षिणेत स्थलांतरीत झाले.*

*गुलबर्ग्याच्या बहामनी सुलतानांनी राजा घोरपडे बहादूर ही पदवी त्यांना दिली.*

त्यावेळी बरीचशी नाणी ही *किल्ले व्यंकटगिरी* या ठिकाणी पाडण्यात येत असत.
ही नाणी *मुरारराव घोरपडे*  (1750 - 1775 AD) यांच्या  कालावधीतली आहेत.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४