#महरट्ट #राष्ट्रकूट अन #राठ्ठोड

#महरट्ट #राष्ट्रकूट अन #राठ्ठोड

सोमेश्वर भूपतीने यांनी 'महाराष्ट्र' या एकवचनी शब्दाऐवजी 'महाराष्ट्रशू' असे अनेकवचनी दर्शवणारे शब्द मांडले आहेत. आणि ते योग्य हि आहे. कारण महाराष्ट्र एक नव्हता. त्या काळी महाराष्ट्र तीन भाग होते.  

इस ६३४ / ६३५ मधील एका लेखात तीन महाराष्ट्रांचा उल्लेख आहे. त्या तीन महाराष्ट्र मध्ये ९९ हजार गावे होती. असे अतिशयोक्तीने किंवा परमार्थाने म्हटले आहे. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या कोणत्याही शिलालेख किंवा ताम्रपटात या तीनपैकी कोणत्या महाराष्ट्राचा उल्लेख नाही.

पण वि.का. राजवाडे यांच्या मते हे तीन महाराष्ट्र पुढील प्रेमाणे असावेत.  सध्या ज्याला वऱ्हाड म्हणतात ते वहरट्ट आहे.  हा वहरट्ट  उत्तरेला होता.  सध्या ज्याला कऱ्हाड म्हणतात ते कहरट्ट होत.  हा कहरट्ट प्रदेश दक्षिणेला होता. आणि या उत्तर-दक्षिण देशाच्या मध्यभागी असलेल्या  रट्टाचां मध्य देश म्हणजे महरट्ट.  

नाशिक पासून वाई पर्यंतचा प्रदेश हा महरट्ट आहे. खान्देश (कन्हदेश) ते अमरावती हा प्रदेश वहरट्ट आहे. आणि वाई पासून ते कोल्हापूर हा प्रदेश कहरट्ट आहे. वहरट्ट हा उत्तरेकडील  रट्टाचां   देश आहे. कहरट्ट हा देश हा दक्षिणेतील रट्टाचां देश  आहे. आणि महरट्ट म्हणजे या दोन्ही मधला देश.

 ह्या तिन्ही भागात रट्ट लोक राहत. सुरट्ट म्हणजे ज्याला सध्या सोरट (सोमनाथ) म्हणतात तो.  गुजरट्ट म्हणजे ज्याला आता गुजरात म्हणतात तो.  आणि  रट्ट - लट्ट - लाट हा किमनदी पासून ते दमणगंगे पर्यंतचा प्रदेश तो मिळुन १) वहरट्ट २) महरट्ट ३) कहरट्ट ४) सुरट्ट ५) गुजरट्ट  आणि नुसते रट्ट किंवा रट्ट लोकांचा देश. असे सहा प्रकारचे रट्ट देशपरात्वे  होते.

 या रट्टाचें  भाऊबंद राष्ट्रकूट अथवा रठ्ठोड अथवा आधुनिक राठोड हे होते. सारांश हे रट्टाचें मोठे आणि विस्तृत कुळ राजपूताना, काठियावाड, गुजरात, सुरत, वऱ्हाड, नाशिक, पुणे, वाई, क-हाड आणि कोल्हापूर येथे पसरले होते.

इतिहाचार्य वि. का. राजवाडे.

इतिहास हा असा असतो. लोक समान अर्थी शब्द घेऊन इतिहास बदलू पाहतात. पण  घडलेला इतिहास ठाम आहे. स्वतःच्या अस्तित्वात. त्याच कर्तृत्व इतकं ठाम आहे की ते कुठं ना कुठं उमटून राहील आहे. शब्दछलात ते फसणार नाही. इतरांनाही ह्या रट्टाच्या मध्ये आपले स्वतःच अस्तित्व शोधाव लागत यातच रट्टाचीं कीर्ती काय होती याची महती समजते.
पोस्ट उमेश वैद्य

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...