*२० डिसेंबर १६७८*छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी बेलवडीच्या किल्ल्याला वेढा घातला.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १६२५*
किल्ले पुरंदर हक्काचा महजर
फतहखानने छत्रपती शिवरायांवर चाल केली तेव्हा पुरंदर किल्ला महादजी नीळकंठरावाकडे होता. महादजीचे शाहजीबरोबर चांगले संबंध होते त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवरायांना संकटकाळी गडाचा वापर करु दिला. साधारण १६२५ पासून महादजीच्या घराण्याकडे पुरंदरचा ताबा होता. २० डिसेंबर १६२५ चा एक महजर आहे ज्यात पुरंदरच्या नीळकंठरावाचा उल्लेख येतो. त्यातून हे स्पष्ट होते की मीरासदारीने नीळकंठरावांकडे पुरंदरचा ताबा होता. पुण्याच्या कऱ्हेपठार तरफेत पुरंदर किल्ला येतो. हा परगणा शाहजी राजांना मुकासा म्हणून मिळाला होता. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शाहजी राजांचा ह्या भागावर हक्क होता. तसेच शाहजी राजांचा प्रतिनिधी म्हणून छत्रपती शिवरायांचा त्या भागावर हक्क होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १६७८*
छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी बेलवडीच्या किल्ल्याला वेढा घातला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १७०३*
संताजी शिळिमकर हे द्वितीय छत्रपती शिवाजी महाराज (राजाराम महाराज पुत्र) ह्यांच्या काळात राजगडवर सुवेळा माचीचे तटसरनौबत होते. औरंगजेब बादशाहने राजगडावर आक्रमण केले त्या वेळेस संताजी शिळिंबकर प्राणोत्प्रणाने झुंजले. २० डिसेंबर १७०३ रोजी सुवेळा माचीवरील बिनी बुरुजावर समोरील धमधम्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा स्वतःच्या छातीवर झेलून धारातीर्थी पडले.
सुवेळा माचीवर गणेश शिल्पाच्या उजविकडे तटबंदीला लागून च त्यांची वीरगळ आजही तिथे आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १७३१*
छत्रसाल बुंदेला निधन
छत्रसाल बुंदेला हा चंपतराय बुंदेल्याचा चौथा मुलगा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १७५९*
दत्ताजी कुंजपुऱ्यावर यमुनापार झाला तेव्हा त्याला बातमी मिळाली कि, अब्दालीपुत्र तैमुरशहा आघाडीच्या पथकांसह अंबाल्याच्या उत्तरेस लालडू नजीक आला आहे. सरहिंद ते लालडू हे अंतर सुमारे ५०/६० किमी आहे. २० डिसेंबर पर्यंत दत्ताजीच्या आघाडीच्या फौजा कुरुक्षेत्र – स्थानेश्वरच्या आसपास येऊन पोहोचल्या. कुंजपुरा ते स्थानेश्वर / कुरुक्षेत्र हे अंतर सुमारे ३०/४० किमी असून कुरुक्षेत्र व स्थानेश्वर यांच्या दरम्यान ४/६ किमी अंतर आहे. या ठिकाणापासून लालडू सुमारे ६०/७० किमी अंतरावर आहे. स्थानेश्वर येथील लढाईच्या विवेचनात वरील ठिकाणांमधील अंतर लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
२० डिसेंबरला दत्ताजीच्या सैन्यातील आघाडीची पथके कुरुक्षेत्राच्या आसपास आली तेव्हा अब्दालीच्या आघाडीच्या तुकड्यांशी त्यांची गाठ पडली. उभयपक्षांची एक लहानशी चकमक घडून आली. हि चकमक निकाली निघाली नाही पण कुरुक्षेत्रावर दत्ताजी आडवा आल्यामुळे अब्दालीने आपला बेत बदलला. त्याच्या फौजा थेट दक्षिणेस कुंजपुऱ्यास न जाता यमुनेच्या किनारी असलेल्या जगाध्रीकडे वळल्या. जगाध्री नजीक असलेल्या बुढीया घाटाने यमुना पार करण्याचा अब्दालीने निर्णय घेतला. अब्दालीच्या या बेटांची दत्ताजीला कितपत कल्पना होती हे माहिती नाही. तो कुरुक्षेत्राच्या आसपास युद्धाच्या तयारीत राहिला. या स्थळापासून जवळपास ६० किमी अंतरावर ईशान्येस बुढीया घाट आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १७६०*
छत्रपति संभाजी यांचे निधन (कोल्हापूर)
(२३ मे १६९८-२० डिसेंबर १७६०). करवीर भोसले घराण्यातील १७१४ ते १७६० या काळातील एक कर्तबगार छत्रपती. छत्रपती थोरले राजारामांचे राजसबाईपासून विशाळगड (कोल्हापूर) येथे जन्मलेले कनिष्ठ पुत्र. त्यांचे बहुतेक बालपण महाराणी ताराबाई यांच्या नजरकैदेत व्यतीत झाले. राजसबाई व संभाजींनी अवचित सत्तांतराद्वारे १७१४ मध्ये करवीरची गादी मिळवून महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी यांना पन्हाळ्यात कैदेत टाकले. अधिकारगहणसमयी त्यांचे वय सोळा होते. त्यांनी प्रदीर्घ काळ (सुमारे शेहेचाळीस वर्षे) राज्य केले. लहान असल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचा अनुभव नव्हता; पण रामचंद्रपंत अमात्य, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण अशा मातब्बरांच्या पाठिंब्याने व राजसबाईंच्या छत्राखाली त्यांनी राज्यकारभार केला. या सुमारास साताऱ्यात त्यांचे चुलत बंधू छत्रपती शाहू हळूहळू सत्ता बळकट करण्यात व्यस्त होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १७६०*
गोविंदपंत बुंदेलेंचे बलिदान
पानिपतच्या प्रांतात दोन्ही फौजा आमने सामने उभ्या ठाकल्या होत्या. ते एकमेकांची ताकद आजमावून पहात होते. दिवसा दोन्हीकडच्या फौजा आमनेसामने येत आणि
कधी छोट्या तर कधी भीषण चकमकी करून पुन्हा संध्याकाळी आपल्या आपल्या छावणीत परतीत. असेच काही दिवस गेले, पहिले काही दिवस मराठ्यांची बाजू वरचड होती, झाडलेल्या चकमकीत त्यांचेच वर्चस्व दिसून येत होते पण नंतर परिस्थितीत झपाट्याने बदल होत गेले. मराठ्यांनकडचा अन्नसाठा संपत आला त्यांचा रसद पुरवठा
बंद पाडण्यात आला, छावणीत खायला अन्न महाग झाले. अब्दालीने मराठी फौजेला पाणी पुरविणारे कालवे सुद्धा बंद पाडले. डिसेंबर महिन्यात मराठ्यांचे हाल कोल्ही-कुत्र्यांना सुद्धा नको झाले. याच्या विपरीत परिस्थिती अब्दालीच्या
फौजेत दिसू लागली. जी फौज काही महिन्यापूर्वी हताश झाली होती त्यात एकदम नवा जोम दिसू लागला. ताज्या दमाचे सैनिक काबुलहून येऊन त्यांना मिळाले, गील्च्यांना
नजीब आणि शूजच्या प्रदेशातून व्यवस्थित रसद पुरविली जाऊ लागली. अखेर ही रसद थांबविण्याशिवाय दुसरा पर्याय भाऊ समोर राहिला नाही. पण जनकोजी
किंवा दत्ताजी शिंदे सारखा तडफदार सरदार अंतर्वेदित नव्हता. तिथे मराठ्यांच्या बाजूचा जर कोणी होता तर तो म्हणजे गोविंदपंत बुंदेला. पण गोविंदपंत हा एक मामलेदार होता कोणी शिपाईगडी नाही, त्याचे निम्मे आयुष पालखीत बसण्यात गेले असावे आणि आता त्याला घोड्यावर बसून शत्रूच्या मुलुखात धुडगूस घालणे कर्मकठीण होते. बरे त्याच्या हाताखाली सुद्धा खडी फौज नव्हती त्याला उत्तरेतल्या जाठ, गोसावी, आणि मुसलमानी लोकांचीच मदत घेण्यावाचून पर्याय नव्हता. इतके असून सुद्धा केवळ भाऊची आज्ञा मानून त्याने अब्दालीची रसद मारण्याचे काम अंगावर घेतले होते.
गोविंदपंत यमुना पार होऊन मेरठकडे सरकला व त्याने मुलुख लुटून अब्दालीची रसद तोडण्याचा सपाटाच लावला. जवळजवळ आठ दिवस असेच चालू राहिले आणि अब्दालीच्या छावणीत सुद्धा अन्नाची चणचण भासू लागली. काबुलहून आलेल्या ताज्या दमाच्या फौजेला अब्दालीने गोविंदपंतांचा समाचार घेण्यास पाठविले. तिथे अंतर्वेदित गुजर नामक एका जमीनदाराने खंडणी देतो असे सांगून गोविंदपंतांना थांबवून घेतले आणि अब्दालीस फौज पाठविण्याचा निरोप पाठविला. निरोप मिळताच आताईखान जलालबादेजवळ पोचला. जेवायला बसलेल्या गोविंदपंतांवर गिलचे येऊन धडकले आणि त्यांचे शिर कापून अब्दालीकडे पाठवून दिले. अब्दालीने हे शिर भाऊकडे त्यांस खिजविण्यासाठी म्हणून पाठवून दिले.
ही घटना साधारण २० डिसेंबर १७६० या दिवशी झाली असावी असे अनेक बखरकार लिहितात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १८१७*
दुसर्या मराठा - इंग्रज युद्धातील पहिली लढाई - गफुरखानाची गद्दारी - होळकरांचा पराभव
महिदपुरच्या लढाईचा आद्ल्या दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १८१७ च्या रात्री गफुरखानने डाव साधला. सारे सैन्य, भिमाबाई-मल्हारराव राजधानीत नव्हते. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक आपली तुकडी घुसवली. तुळसाबाईंना त्यांच्या महालातुन बाहेर काढले, क्षिप्रा नदीच्या काठी नेले व त्यांचा शिरच्छेद करुन त्यांना ठार मारले. त्यांचे प्रेत नदीत फेकुन देण्यात आले. त्यांच्यावर कसलेही अंतिम संस्कार करता आले नाही. हत्याकांड होताच गफुरखान तातडीने महिदपुरच्या दिशेने रवाना झाला.
गफुरखानाचे पाप येथेच संपले नाही. तो तुलसाबाईंना ठार मारुन महिदपुरला गेला. २० डिसेंबर रोजी सुरु झालेल्या युद्धात दुपारपर्यंत होळकर जिंकतील असे चित्र असतांना दुपारीच गफुरखान अचानक आपले सैन्य घेऊन पळून गेला. त्यामुळे होळकरांचा तेथे पराभव झाला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२० डिसेंबर १९५६*
राष्ट्रीय संत श्री. गाडगे महाराज पुण्यतिथी
रोजी थोर राष्ट्रीय संत श्री. गाडगे महाराज यांनी इहलोक यात्रा संपवली. आज त्यांची पुण्यतिथी, या थोर समाज सुधारक , संताच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment