येळकोट... येळकोट... जय मल्हार...
येळकोट... येळकोट... जय मल्हार...
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडोबा आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत जळगावपासून बेळगावपर्यंत प्रत्येक बहुजन घरात हेचं कुलदैवत आहे.
पुणे जिल्ह्यात जेजुरी आणि निमगाव दावडी
साताऱ्यात पाली,
अहमदनगर जिल्ह्यात शेगुड,
सोलापूर जिल्ह्यातील बाळ्याचा खंडोबा,
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सातारे,
नांदेड जिल्ह्यात माळेगाव,
काहींचं कुलदैवत थेट कर्नाटकात बेळगाव, धारवाड जिल्ह्यात आहे.
माझ्या अल्प अभ्यासानुसार महाराष्ट्रात असं एकही गाव किंवा देव्हारा नसेल जिथं खंडोबा पुजला जात नाही. लग्नात पहिला मान खंडोबाचा असतो.खंडोबाचं वैशिष्ट्य म्हणजे लग्नानंतरचे जागरण गोंधळ वगळता, कुठलाही नवस वगैरे करावा लागत नाहीं.विशेष म्हणजे जागरण - गोंधळाच्या कार्यक्रमासाठी मांसाहाराच्या बेताचे आयोजन केलं जातं होतं.(गेलीं काहीं वर्षे गोबर पट्ट्यातील धर्म - संस्कृतीने अतिक्रमण करायला सुरूवात केल्यापासून जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गोड जेवण दिलं जातं.)पंढरीचा पांडुरंग आणि जेजुरीच्या खंडोबाला कुठलही व्रत - वैकल्ये करावा लागत नाहीं.वर्षातून एकदा वारी केली (अगदी मनोरंजन म्हणून वन डे ट्रीप म्हटलं तरी) चालते (जावंच असंही नाही.)
खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे, त्यांचा धर्म कधीच खतरे मे येतं नाही हे छातीठोकपणे सांगतो.
हल्लीं गायपट्ट्यातील सनातनी मार्केटिंग गुरु बाबा - बुवांनी घराघरात शिरकाव करून बहुजनांची कुलदैवते - आराध्यदैवते अडगळीत टाकण्याचे काम सुरू केले आहे.
हिंदुत्वाचे ढोस पाजणाऱ्या उत्तर भारतातल्या कथित धार्मिक - राजकीय नेत्यांना , बूवा - बाबांना आपल्या पांडुरंग, खंडोबा, तुळजाभवानी, अंबाबाई,काळूबाई, भैरवनाथ, म्हसोबा , बिरोबा इतर बहुजन समाजातील कुलदैवत किंवा आराध्य दैवतांचं काहीं देणंघेणं नसतं कारण त्यांच्या कथित हिंदुत्वात त्यांना स्थान नाही.
खरंतर चांगल्या सुशिक्षित , समजदार व्यक्तींनी बेगडी हिंदुत्वाची लागण झालेल्या तरुणांना हे वास्तव लक्षात आणून देणं गरजेचं आहे.पण घडतय उलटं अतिपुरोगामी मंडळी प्रत्येक गोष्टीला अनावश्यक विरोध या तरुणांना हिंदुत्ववाद्यांच्या कळपात ढकलत असतात. ती मंडळी तर पराचा कावळा करण्यात माहीर असतात.
मला असं वाटतं की, आपल्या सर्वांचे सन्मित्र नितीन थोरात यांनी खंडोबावर आणि अंबालक्ष्मीवर पुस्तकं लिहून अनेकांचे कथित हिंदुत्वाचे भूत उतरवले आहे तर अनेक अतिपुरोगाम्यांचे गैरसमज दूर केले आहेत. त्यामुळं त्यांच्या पुस्तकांना भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.
गोबर पट्ट्यातील उघड्या - नागड्या धर्म - संस्कृतीचे अतिक्रमण परतवून लावायचे असेल तर इथली धर्म - संस्कृती समोर ठेवणे हाच पर्याय आहे.हाच आपला ऐतिहासिक महाराष्ट्र धर्म आहे असं मला वाटतं.
असो.मी काय लै हुशार वगैरे काही नाही.फक्तं इतिहास आणि वास्तव सांगत असतो.पटलं तर घ्या.
महाराष्ट्रकडू आबासाहेब पाटील
Comments
Post a Comment