२६ डिसेंबर १६६५*सेनापती नेताजी पालकरांनी विजापुरकरांचे महत्वाचे ठाणे असलेले मंगळवेढ़े जिंकून घेतले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १५३०*
मोगल सत्तेचा संस्थापक मोहम्मद झहीरुद्दीन बाबर याचा मृत्यू. इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैमूरलंगाचा हा वंशज त्याच्या पूर्वजांप्रमाणेच क्रूर असाच होता.
१५२८ मध्ये बाबराने अयोध्येतील राममंदीर पाडले आणि मशीद उभारली आणि तीच ती वादग्रस्त अशी "बाबरी मशीद"
इब्राहिम लोदी आणि राणा सांगाच्या पराभवानंतर बाबरने भारतात मुगल साम्राज्याची स्थापना केली आणि आग्रा राजधानी केली. त्याआधी सुलतानांची राजधानी दिल्ली होती. मात्र बाबरने ती राजधानी केली नाही, कारण तो पठाण होता आणि तुर्कांची सत्ता त्याला मान्य नव्हती. प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने बाबरला दिल्लीपेक्षा आग्रा योग्य वाटले. भारतात मुस्लिम शासकांना 'सुलतान' म्हटले जात होते, बाबरने स्वतःला 'बादशहा' घोषित केले. बाबर फक्त चार वर्षे भारतावर राज्य करु शकला. त्याचा मृत्यू २६ डिसेंबर १५३० मध्ये आग्रा येथे झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १६६५*
सेनापती नेताजी पालकरांनी विजापुरकरांचे महत्वाचे ठाणे असलेले मंगळवेढ़े जिंकून घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १६७८*
मगर पाटील व तुपे पाटील यांच्यातील  हडपसरच्या पाटीलकीतील वाद रायगडावर (श्री राजा शिवछत्रपतीकडे  गेले) याचा संबंध पत्र आहे. यात पुणे परगणे तील देशमुख (शितोळे) यांना दिलेली समज पत्र
श्री राजा शिवछत्रपती - नारोबा मुतालिक देशमुख  परगणे पुणे 
रायाजी मुगर पाटील मौज हाडपसर  याचा व सोनजी तूपा  याचा वेव्हार तू मनास  आणून रायापासून  गुन्हेगारी  सवासे  होनाची घेतली  व गडावरी  पौकिया बदल घातले आहे तरी  मधील  मनसूफी  कराया  तुजला  गरज काय? रायाजीपासून  पैकी  घेतले असतील (ते) परतोन देणे  गडावरून उतरून  निरोप  दे वझे स्वामी निवाडा करतील, खरी होईल तो पाटीलकी खाईल. तू काही इस्कील न करणे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १६९७*
मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्लक्षित राजा छत्रपती राजाराम महाराज 
२६ डिसेंबर १६९७ रोजी  जिंजीच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर महाराज व इतर वीस पुरुष बुरखा घालून शिरक्यांच्या महिलांच्या पालखीत बसले व  गणोजीच्या तळावर आले. त्यांनतर दुसऱ्या दिवशी शिरक्यांनी शिकारीचा मामला सांगून आपल्या काही माणसांबरोबर  महाराज ,येसाजी दाभाडे हे व इतर पुरुषास शिकारीचा वेष परिधान करून छावणीतून बाहेर काढले. मार्गात जळतगतीने मार्ग कर्मन करत असताना येसाजी दभाडे चा प्रवासातील दगदग सहन न होऊन  मृत्यू झाला.  शिरक्यांनी महाराजांना पुढे रणी च्या किल्ल्या च्या आसमंतात लपून असलेल्या धनाजी जाधव ह्यांच्या फौजेकडे सुपूर्द केले. व मागाहून गिरजोजी यादव  राजस्त्रियांना घेऊन आला. ह्या सर्व मामल्यास झुल्फिकार खानाची गुप्त समनती होती. तरीही ह्या प्रकरणात गणोजी शिर्के ह्यास छावणीत अटक झाली होती. वेल्लोर- कोप्पळ-भुदरगड असा परतीचा प्रवास करत राज कुटुंब सोबत महाराज २२ फेब्रुवारी १६९८ रोजी विशाळगडावर पोहचले.
जिंजी वरून निघताना सुरक्षिततेसाठी महाराजांनी खंडो बल्लाळ ह्याच्या मार्फत जिंजी च्या वेढ्यातील गणोजी शिर्के ह्यास दाभोळ च्या वतना बदल्यात आपल्याकडे वळवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १७०१*
औरंगजेब बादशहाने २६ डिसेंबर १७०१ ला विशाळगड किल्ल्याचा वेढा घातला. 
४ जून १७०२ ला परशुरामपंतांनी खेळणा किल्ला ताराबाईं राणींच्या आदेशावरून मोगलांच्या स्वाधीन केला. १७०७ ला महारानी ताराबाईंनी तो परत जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १७१५*
चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १७१८*
हुसेन अली व मराठ्यांनी उज्जैन सोडले. तेथे सैन्याला सवाई जयसिंह व मूहकमसिंह बुंदेला हे फौजेसह येऊन मिळाले. एवढी फौज दिल्लीत येते आहे हे बघून बादशाह घाबरला, त्याने फौज माळव्यात असतानाच सगळ्या मागण्या मान्य केल्या व परत जा असे सांगितले. पण महाराणी येसूबाईसाहेब यांना मुक्त करायचे होते म्हणून मराठे ऐकेनात. फेब्रुवारी १७१९ ला हुसेन अली मराठ्यांसह दिल्लीत दाखल झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १७३५*
‘डर्बी’. ‘मेसर्स जॉन स्पेन्सर ॲंड हेन्री क्रॅब’ ह्या कंपनीचे हे जहाज ईस्ट इंडीया कंपनीने भाडेतत्वावर घेतलेले होते. ह्या जहाजाचा कॅप्टन होता अब्राहम ॲन्सेल्म.
ह्या डर्बी जहाजाने बंगाल ते इंग्लंड माल वाहतूक एकदा केलेली होती. पण दुसऱ्या गोव्याहून निघाल्यानंतर सफरीदरम्यान २६ डिसेंबर १७३५ रोजी संभाजी आंग्र्यांनी ९ जहाजे घेऊन त्याच्यावर दक्षिण कोकणात हल्ला केला आणि पकडून विजयदुर्गाकडे आणले. कॅप्टन ॲन्सेल्मसह बरेच खलाशीही पकडले गेले. डर्बीवर आंग्र्यांना ३ पेट्या भरून चांदी मिळाली. सोबत चांदीचे ३२००० स्पॅनिश डॉलर्सही होते. मालाची किंमत सुमारे वीस लाख होती. (विचार करून पहा - १७३० मध्ये फक्त सुमारे सोळा हजार रुपयांत पुण्यात शनिवारवाडा बांधून झाला होता म्हणजे त्या काळी वीस लाख रूपयांची काय किंमत असेल!) ईस्ट इंडीया कंपनीच्या इतिहासातही संपूर्ण जगात ही सर्वात मोठी लूट होती - ह्यावरूनही लुटीचा अंदाज येईल. संभाजी आंग्र्यांना ह्या लुटीने मोठा हात दिला. त्यांची बरीचशी ह्यामुळे कर्जे फिटली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १७४९*
साताऱ्यानजीक कृष्णाकाठी वडूथ इथे छत्रपती रामराजांनी महाराणी ताराराणींची आदरपूर्वक भेट घेतली. 
छत्रपती रामराजांनी ४ जानेवारी १७५० रोजी मोठ्या समारंभपूर्वक साताऱ्यात प्रवेश केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते कुठल्याही प्रकारचा दत्तक विधीचा कार्यक्रम न होता सिंहासनारूढ झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ डिसेंबर १८३०*
कोल्हापूरचे महाराज बुवासाहेब आणि आनंदीबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी उर्फ बाबासाहेब महाराजांचा जन्म झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४