⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १६००*
३१ डिसेंबर १६०० ला एलिझाबेथ राणीने ईस्ट इंडिया कंपनीला पंधरा वर्षांच्या कराराने अतिपूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली.
डचांच्या अतिपूर्वेकडील मसाल्याच्या फायदेशीर व्यापाराला शह देण्यासाठी सप्टेंबर १५९९ मध्ये लंडनमधील व्यापाऱ्यांनी एक संघटना स्थापन केली. देशातील भागधारकांकडून ३,००,००० पौंडांचे भांडवल जमवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १६६३*
छत्रपती शिवराय सुरतवर छाप्यासाठी जाताना वाटेत ३१ डिसेंबर रोजी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महापूजा व दानधर्म केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १६७९*
जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती....
सुरतकर इंग्रजांनी मात्र सतत तिकडून मुंबईकर इंग्रजांना सुनावणे सुरु केले. ३१ डिसेंबर ला शेवटी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला कळवले की, “खांदेरी प्रकरणी कंपनीला विनाकारण खूप खर्च झाला. आम्हाला काही यश आले नाही. मराठ्यांच्या चपळ होड्या सहज कुठेही जाऊ शकतात, कुठूनही हल्ला करू शकतात मात्र आमच्या युद्धनौका अगदीच निरुपयोगी ठरल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करण्याची खटपट सारखी सुरु आहे..”
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १६८७*
हरजीराजे व संतोजी भोसले यांच्यात बेबनाव...!
मोगल सैन्य कर्नाटकात जाणार हे जाणून छत्रपती संभाजी महाराजांनी केसोत्रिमल पिंगळे यांना १२ हजार स्वारांनिशी कर्नाटकात रवाना केले. त्यांचे बरोबर यावेळी संताजी भोसले होते. हरजीराजेंच्या मदतीसाठीच हे सैन्य केसोपंतांबरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी पाठविले. मात्र त्यामुळे अर्काटच्या किल्ल्यासाठी संताजींनी ही मदत केली नाही. या वादातून हरजीराजेंचे, केसोत्रिमलांचे वाद सुरू झाले. यात संताजी भोसले हे केसोत्रिमलांच्या पक्षाचे, त्यामुळे साहजिकच हरजीराजेंचे व संताजी भोसलेंचेही वाद होऊ लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १७६०*
२७ डिसेंबर १७६० या दिवशी नानासाहेबांनी आपला दुसरा विवाह केला. ३१ डिसेंबर १७६० ला पेशव्यांनी लगबगीने उत्तरेकडं प्रयाण केलं.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १७७८*
इंग्रज फौजा खंडाळ्यात मुक्कामला
पावसाळा संपल्या नंतर इंगजांनी मुंबई हून साधारण ४००० फोज घेत प्रयाण केले. रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येउन मिळतील. इंग्रजांचा पणवेल मार्गे , कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकर ही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथ रावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्या सारख्या होत्या. कार्ले, खंडाळा, या भागात इंग्रज पोहोचे पर्यंत त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत चे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिक कापुन जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून त्यातील पाणी पिण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीवेळीसुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरू ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. खंडाळ्यालाआल्या वर मात्र इंग्रज फौजेला त्रास न देता मराठ्यांनी घाट चढु दिला, हेतु हाच होता की परतीचा मार्ग कापला जावा.
यादरम्यान उत्तर भारतातून येणार्या फौजेचा प्रवासही मराठ्यांनी त्रास देत लांबवला. नागपुरच्या भोसलेंना तशा सूचना दिल्या होत्या. त्यापुढे रोहिलेंनाही तशाच सचना होत्या. यामुळे उत्तर भारतातून अत्याधुनिक रसदि इंग्रजांना मिळालीच नाही. ३१ डिसेंबर ला इंग्रज फौजे ने खंडाळ्याचा मुक्काम केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १७९७*
तुकोजी होळकर वारले व त्याच्या मुलांमध्यें सरदारीबद्दल तंटा लागला. तेव्हां दौलतराव शिंद्यानें काशीरावाचा पक्ष घेऊन त्याचा शूर भाऊ मल्हारराव याच्यावर एकाएकीं छापा घालून त्यास ठार मारून त्याच्या अल्पवयस्क मुलास (खंडेराव) आपल्यापाशीं ठेवून त्याच्या नांवें होळकरी संस्थान चालविलें. त्यामुळें त्यांच्यांत व यशवंतरावांत वैर माजलें. आतां शिंदे हा नानांजवळ कबूल केलेली रक्कम व नगरचा किल्ला आणि १० लाखांचा मुलूख मागूं लागला. नानानें बरीच रक्कम भरून उत्तरेकडे कूच केल्यास किल्ला देण्याचें कबूल केलें. कारण क्षणैकबुद्धि रावबाजी त्याच्या साहाय्यानें नानास अपाय करण्यास टपला होता. परंतु शिंदा जाईना. यावेळीं अनेक मसलती झाल्या. अखेर वचन देऊन शिंद्यानें नानांस आपल्या गोटांत आणवून विश्वासघातानें (रावबाजीच्या सांगण्यावरून) त्यानां कैद करून नगरास पाठविलें (३१ डिसेंबर १७९७).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १८०२*
पेशवे बाजीराव दुसरे आणि इंग्रज यांच्यात तह झाला.
या तहानुसार मराठ्यांचा बराचसा भूभाग इंग्रजांच्या अमलाखाली आला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १८१२*
३१ डिसेंबर १८१२ या दिवशी बाजीरावांचेच (दुसरे) सरदार बळवंतराव निळकंठराव पेंडसे यांची कन्या सरस्वतीबाई यांच्याशी बाजीरावांचे लग्न लागले. साताऱ्याच्या जवळच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री माहुली इथल्या पेशव्यांच्या वाड्यात हा विवाह संपन्न झाला. यानिमित्त आशीर्वाद द्यायला सातारकर महाराजही उपस्थित राहिले होते. माहुली संगमावर मोठा दानधर्म करण्यात आला. बाजीरावांनी मोठाच थाट केला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १८१७*
भिमा-कोरेगावची लढाई
रात्री ८ वाजता बॉम्बे नेटीव्ह आर्मीची एक बटालियन (सुमारे हजार सैनिक), मद्रास आर्टिलरीच्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील अधिकारी, आणि २५० घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी हे सगळे कोरेगावपासून दोन मैलांवर पोहोचले
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ डिसेंबर १९२६*
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा मृत्यू
(जन्म जुलै १२, १८६३) हे मराठी इतिहास-संशोधक होते.
राजवाडे अतिशय प्रखर दृढनिश्चयी इतिहास संशोधक म्हणून ओळखले जात. आजन्म भ्रमंती करून त्यांनी मराठय़ांच्या इतिहासाची कागदपत्रे जमविली आणि अस्सल साधनांचे बावीस खंड संपादून प्रसिद्ध केले.
त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment