*७ डिसेंबर १६६५*सर सेनापती नेताजी पालकरांनी विजापूरकरांकडून फलटण जिंकले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ डिसेंबर १६६५*
सर सेनापती नेताजी पालकरांनी विजापूरकरांकडून फलटण जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ डिसेंबर १६७२*
बारदेशातील मिठावर जास्त जकात बसवण्यासाठी महाराजांनी नरहरी आनंदराव यांना लिहलेले पत्र -
प्रति- नरहरी आनंदराव, सरसुभेदार, ता कुडाळ.
७ डिसेंबर १६७२ - साहेबी प्रभावळी पासून कल्याण भिवंडी पावेतो जबर निरखाचा तह दिल्हा आहे. बरदेशात मीठ बंदरे आहेती. तेथून मीठ खरेदी करून उदमी नेत आहेत. हल्ली आपणाकडे मिठाचा पाड जबर झाला. हे गोष्टी ऐकोन उदमी सर्व बारदेशाकडे जातील. तरी तुम्ही घाटी जकाती जबर बैसवणे. संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडेल ऐसा जकातीचा तह देणे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ डिसेंबर १७१५*
मुसलमानांच्या तावडीतून आपले राज्य मोठ्या पराक्रमाने मिळवून, त्याची सीमा लाहोर आणि अमृतसरपर्यंत विस्तारण्यात बंदा बहादुरांना यश मिळाले होते. परंतु दुर्दैवाचा घालाच जणू बंदा बहादुरांवर कोसळला. मुघली सैन्याने बंदा बहादुरांना धारिवाल गावात, सन १७१५ च्या प्रारंभापासून जवळ जवळ १० महिने वेढून ठेवले होते. अन्नधान्य, पाणी इ. चा साठा जसा संपत आला तसे बंदा बहादूर आणि बरोबरीच्या ७९४ शीख सैनिकाना जगणे असह्य झाले. अखेर सर्वांनी ७ डिसेंबर १७१५ ला आत्मसमर्पण केले. त्या ७९४ शीख सैनिकांसह बंदा सिंह बहादुरांना फेब्रुवारी १७१६ च्या दरम्यान दिल्लीला आणण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ डिसेंबर १७६०*
बळवंतराव मेहेंदळे पानिपतला ठार
बळवंतराव मेहेंदळे हे पानिपतच्या युध्दात वीरमरण पत्करलेले पेशव्यांचे एक मातब्बर सरदार होते. यांच्या सन्मानार्थ मालगुंड येथे इ.स. १७६१ मध्ये पुण्याच्या श्रीमंत पेशव्यांनी हे ओंकारेश्वराचे मंदिर बांधले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ डिसेंबर १८०३*
गव्हर्नर वेलेस्ली स्वत: अचलापुरात तळ ठोकून बसला
१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर इंग्रज व भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड व नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...