Posts

रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी.

Image
 रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी... या भूमीतच दक्ष राजाची कन्या सतीने भगवान शिवशंकरास वर म्हणुन प्राप्त केले. दक्ष राजाने आयोजित केलेल्या विश्वशांती यज्ञास उपस्थित राहण्यासाठी आलेले ब्रम्हदेव व सकल देव गण याच भुमीतील तीर्थक्षेत्र ब्रम्हपुरी येथे मुक्कामास होते. येथेच भगवान शिवशंकर कुंभेश्वराच्या रूपाने प्रकट झाले होते. म्हणुनच अदिलशाहीपुर्वी या नगरीस “कुमठे कुंभेश्वराचे” या नावाने ओळखले जात होते. या कुंभेश्वराचे व त्याच्या रक्षणासाठी उभ्या असणार्‍या भैरोबाचे मंदीर आजही जागृत देवस्थाने म्हणुन प्रसिध्द आहेत.  अशाप्रकारे अनादिकालापासून देवादिकांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या या भुमीत शिवछत्रपतींच्या आदर्शांपासून दूर जाणार्‍या पेशव्यांनाही अनेकवेळा हरवणार्‍या शौर्यधुरंधर, रणमर्द, श्रीमंत सरदार फत्तेसिंह माने यांनी आदिमाया महिषासुरमर्दिनीचे व मान्यांचे श्रद्धास्थान जोगेश्वरीचे रूप असलेल्या, दक्षिण भारतात मुळ ठाण असणार्‍या श्री. चौंडेश्वरी देवीची मुर्ती घोडयावरून ‘भाळवणी’ येथून आणुन या नगरीत स्थापन केली ते आर्इ जगदंबेचा अंश असलेले श्री चौंडेश्वरीचे जागृत म

औंढा नागनाथ मंदिरात काचेत ठेवलेली ही विष्णुमुर्ती शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानली जाते

Image
औंढा नागनाथ मंदिरात काचेत ठेवलेली ही विष्णुमुर्ती शिल्पकलेचा अत्युच्च नमुना मानली जाते. या मुर्तीला केशव हे नाव दिलेले आहे. उजव्या खालच्या हातात पद्म, उजव्या वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र व खालच्या हातात गदा आहे.  मुर्तीवर इतके बारीक कोरीवकाम आहे की बोटावरचे नखंही दिसतात. मराठवाड्यात सापडलेल्या बहूतांश विष्णु मुर्ती केशवराज मुर्ती अशाच प्रकारातील आहेत. या रूपातील विष्णुची जी शक्ती आहे तीला किर्ती" या नावाने संबोधले जाते.  मागच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आढळून येतात. १९७२ च्या दूष्काळात रोजगार हमी योजनेत तळ्याचा गाळ काढत असताना ही मुर्ती सापडली. ही मुर्ती गर्भगृहा जवळ ठेवलेली आहे. तिथून काढून मंदिर आवारतच पण बाहेर ठेवावी. जेणेकरून शिल्प अभ्यासकांना नीटपणे पहाता येईल. तसेही आत गर्दी करणारे आंधळे भाविक इकडे पहातच नाहीत. आणि ज्यांना पहायची आहे त्यांना धक्कीबुक्की गर्दीत पहाताही येत नाही.

कदम वाडा, साप गाव (ता.कोरेगाव,जि. सातारा)

Image
कदम वाडा, साप गाव (ता.कोरेगाव,जि. सातारा) महाराष्ट्र म्हणजे पराक्रमी पुरुषांची, नेतृत्वाची आणि त्यातून जन्माला आलेल्या सरदारांची  भूमी. प्रसंगी दिल्लीच्या गादीला घाम फोडला तो या सरदारांनी मग त्यांनी लेच्यापेच्या सारखं का राहावं.  त्यांनी आपला रूतबा राखला च पाहिजे, आणि तो दिसतो त्यांनी त्याकाळी बांधलेल्या वाड्यातून. मग तो वाडा भोरचा , जतच्या डफळ्यांचा, किंवा साप गावातील कदमांचा असो. हे वाडे साक्ष देतात ती मराठ्यांच्या वैभवाची, कर्तृत्वाची, सामर्थ्याची.  साप गावात एका कडेला डौलदार उभा असणारा हा वाडा बघता क्षणी मनात भरतो.  समोर भलेमोठे बुरुज त्यात कोंदलेला अणकुचीदार टोकांचा दरवाजा त्याचा वर नगारखाना. चांगली ५ फूट रुंदीची तटबंदी आणि ६ बुरुजांनी बंधिस्त आहे हा वाडा.  वाडा २ मजली आहे आणि त्यात लाकडावर केलेले कोरीव काम अत्यंत देखणे आहे. तटबंदीच्या आत चौकोनी टाके आणि गोल विहीर आहे. वाडा अगदी एका भुईकोट किल्ल्यासारखा आहे. मुख्य वाडा २ चौकांचा व २ मजली आहे.  वाड्यात दुसऱ्या मजल्यावर बैठक अजून सुस्थित आहे तीवरील लाकडी खांब आणि कोरीव काम रॉयल फील देतात. मुख्य गोष्ट अशी जाणव

सज्जनगड शिलालेख

Image
समर्थ प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर भिंतीवरील पर्शियन शिलालेख आपले लक्ष वेधून घेतो. शिलालेख ५६ सेंमी x ४१ सेंमी आकाराचा असून उठावाच्या पद्धतीने कोरलेला आहे. हा शिलालेख पुढीलप्रमाणे आहे: फार्सी वाचन दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख ३ दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही मराठी अर्थ ऐश्वर्य तुझ्या दारातून सर्वांना तोंड दाखवत आहे हिम्मत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचनामुक्त आहेस तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जमादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशाही रेहान याने काम केले. बांधकाम करणारा आदिलशाही रेहान कोण हे कळून येत नाही. कारण इतिहासात दुसऱ्या इब्राहीम आदिलशहापर्यंत कोणत्याही रेहानचा संदर्भ मिळत नाही.

श्री सेवागिरी महाराज रथ यात्रा 1960 सालचा हा फोटो

Image
श्री सेवागिरी महाराजांनी 10 जानेवारी 1948  मार्गशीर्ष  वद्य चतुर्दशी ला जिवंत समाधी घेतली , त्यानंतर त्यांचा संजीवन समाधी सोहळा सुरुवातीची 3 वर्षे बैल गाडीतून काढला जात होता. त्यानंतर  श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे पहिले मठाधिपती नारायणगिरी महाराज यांनी पुसेगाव पासून जवळच असणाऱ्या विसापुर येथील सुतार श्री शिवराम यांच्याकडून  सागवानी रथ तयार करून घेतला .  श्री सेवागिरी महाराज रथ यात्रा 1960 सालचा हा फोटो

वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो.

Image
धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या शहरासह परिसरात राहिला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जातात. त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो. गडावरील वनराईत तपश्‍चर्या करीत असताना लक्ष्मणाकडील खड्‌ग शस्त्र नजर चुकीनं लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले.तरीहीत्या अवस्थेत तप पूर्ण करुन भगवान महादेवाचे चंद्रसेन आवतार आहेत. लक्ष्मणाने व राम देवांनी चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल असा वर दिला. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्‍याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. मंदिरात सध्या असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मुर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत दाखवले असून ते आजही पहायला मिळत असल्यामुळे या अख्यायिकेला दुजोरा मिळतो. अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात.चंद्रसेन देवांची मूर्ती हीं रामायण काळातील आहे . जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महारा

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...

Image
  राजे राष्ट्रकूट उर्फ ,राठोड उर्फ घाटगे/ घाडगे  राजवंशाचा कुलाचार ----------------- --------------नितीन घाडगे  @..............✍️ सार्वभौम सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे राष्ट्रकूट याचे वंशज राठोड यांना घाटगे 'किताब मिळाला घाटगे अर्थात घाडगे  कुळातील तसेच पडनावाने राहणाऱ्या इतर सर्व वंशजांसाठी त्यांचा कुलाचार अथवा वंशजांसाठीची मंगल कार्यात उपयुक्त असलेली आवश्यक माहिती खाली दिली आहे..... 👉 टीप : कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी... 👉 कुळ - राजे राष्ट्रकूट वंशज असणारी सूर्यवंश असणारी शाखा अपभ्रंश होऊन राठोड उर्फ घाटगे घाडगे  👉 गोत्र - कश्यप  👉 देवक - मूळ देवक सूर्यफुल/ कागल भागामध्ये  घाटगे साळुंखीपंख लावतात. 👉 विशेष सूचना :कागलकर हे मूळचे मलवडी (खटाव)मूळ पुरुष कमराज घाटगे याच्यावंशज शाखा आहे परंतु कोणत्या तरी कारणाने साळुंखीपंख वापरतात .परंतु घाटगे कुळ सूर्यवंशाचे असून देवक:-सूर्यफुल आहे.तर काही भागात पाचपालवी सुद्धा देवक म्हणून सांगितली जाते पुरोहित याच्या कडून. कारण देवक माहित नसेल तर बऱ्याच लोकांन