पाकिस्तानच्या सीमेवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. जम्मू कश्मीर या ठिकाणी असणाऱ्या मराठा रेजिमेंट चक्का मचल घाटामध्ये नियंत्रण रेषा बॉण्ड्री( LOC ) जगात प्रथमच एव्हड्या उंची वर छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन केला आहे.
पाकिस्तानच्या सीमेवर शिवरायांची मूर्ती स्थापना. जम्मू कश्मीर या ठिकाणी असणाऱ्या मराठा रेजिमेंट चक्का मचल घाटामध्ये नियंत्रण रेषा बॉण्ड्री( LOC ) जवळच छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन केला आहे. संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. 14800 फूट उची वर घोड्यावर तलवार घेऊन बसलेले शिवाजी महाराज असा पुतळा उभारला आहे. पहिल्यांदाच जगात एवढ्या उंचीवर आणि सीमेलगत असा पुतळा उभारण्यात आला आहे. अभिमानास्पद... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय समस्त देशवासीयांचेही आराध्य आहेत. या भावनेतून देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जागांना, वास्तूंना छत्रपतींची नावे दिलेली आपल्याला आढळतात. देशभर छत्रपतींचे असंख्य पुतळेही आहेत. मात्र सैन्यातील मराठा रेजिमेंटने याबाबतीत एक विक्रमच केला आहे. जम्मू-कश्मीर येथे मच्छलच्या खोऱ्यात मराठा रेजिमेंटने नियंत्रण रेषेजवळ सुमारे १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा स्थापित केला. जगात सर्वप्रथमच महाराजांचा पुतळा एवढ्या उंच जागी बसवला गेला आहे. पुण्यातील युवा मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी हा सुंदर पुतळा साकारला आहे.