तब्बल 41 मैदान गजावणारा हरण्या ची किमत 35लाख येवडी आहे. त्याचा रोजचा खुराक नुसता हजार रुपयचा आहे. बसायला मॅट आहे अन शर्यत जिंकल्यावर लोण्याच्या मालीशचा राजेशाही थाट आहे हरण्यचा

 कवठेमहाकाळ येथील बैलगाडा शर्यतीमध्ये हरण्या बैलांना पाऊल ठेवलं तेव्हा सर्वत्र चर्चा चालू झाली हरण्या ही शर्यत जिंकणार. आणि तसंच झालं.एक लाख च पहिले बक्षीस जिकलं हारण्याने.

 हरण्या न आजपर्यंत 41 मैदाने गाजवली आहे. त्यामुळे त्याची किंमत 35 लाख रुपये आहे. या हरण्या ची बैलाचा खुराक पण तसाच आहे. खूराकाला रोज एक हजार रुपये खर्च आहे.

 कोल्हापूरच्या संदीप पाटील आणि सचिन पाटील हे हरण्या चे मालक असून हरण्याच हट्ट पुरवतात.

हरण्या चा जोडीदार सोन्याची किमत आहे 10लाख.

बैल जितका शर्यती जिकंतो तेव्हाडी त्याची किमत वाढत जाते.. हरण्याची किमत आहे तब्बल 35लाख..

 शर्यतीचा बैल दावणीला असला म्हणजे प्रतिष्ठे च मानतात व ज्याच्या दावणीला बैल आहे त्याच नाव कधीही निघत. अस संदीप व सचिन याचं म्हणणं आहे.

पटलांनी हरण्याला 6लाखाला 4वर्षा चा असताना विकत घेतलं होत...आज त्याच वय 6वर्ष आहे. त्याची किमत 35लाख आहे.कारण त्याने 41 शर्यती जिकल्या आहेत.
त्याच मलाकच म्हणणं आहेत 
हरण्या रागीट व इरश्या करतो...

हरण्या च कस आहे.. एकदा शर्यतित सुटला की.. पहिल्यांपासून शेवट पर्यत त्याची गती कमी नाही...
हरण्या शर्यतीत झेंडा पडला की एकदम गोलि गत सुसाट सुटतो असा आहे हरण्याच..41 मैदान मारण्याचा गुपित...

 शर्यतीच्या ट्रॅकवरून बाजूला जाण कधी हरण्याला जमलं च नाही एकादा अपवाद वगळता असे त्याच्या मलाकच म्हणण आहे..


 हरण्या ला सांभाळण्याचा थॉट एकदम राजेशाही आहे..

त्याच रोजचा खर्च च.. एक हजार आहे..

रोज सकाळी दोन लिटर म्हशीच दूध.. आणि तीन लिटर गावरान गाईच 3लिटर दूध लागत.

हरभरा, बाजरी, मटकी,सातू ह्या धान्यच पाच किलो भरडा दिला जातो..

ओली व सुकी लागेल तेव्हडी वैरण दिली जाते.


 त्याची आईट सांगायची झाली तर त्याला रोज गरम पाण्याची अंघोळ लागतिया..

आणि शर्यत जिकूंन आल्यावर पीवर लोण्याचं मालीश करतात हरण्याची..

रोज बसायला रबरी मॅट असत.


 शर्यतीच्या आधी त्याला थोडस उपाशी ठवले जाते.


 खिल्लार बैल हा महाराष्ट्र मध्ये शर्यतीमध्ये जास्त धावतात..

शर्यतीमध्ये धरणात बैलाची किंमत वाढते.
 आणि तो शर्यत जिंकला तर वाढतच जाते.अगदी हरण्या सारखी...
 पाटलांच्या हरण्या चागंली किंमत आली असली तरी त्याना तो विकायचा च नाही..

 शर्यतीची परंपरा शोक, हौऊस म्हणून नाही तर एक शेतकरी बांधवाच कामणुकीच साधन सुद्धा आहे.
 रानातील कामं संपली की पूर्वी शर्यत चालू होत असे.
  उन्हाळा दिवस चालू हातात गावों गावच्या यात्रा चालू होता.
 जशी कुस्त्यांची मैदाने पारंपारिक, तसेच  बैलाच्या शर्यती पारंपरिकच आहेत..




लेखन 
नितीन घाडगे.














Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४