मराठी आडनावे व त्यांचा मुळ कूळे इतिहास-

मराठी आडनावे व त्यांचा मुळ कूळे इतिहास-

1)शकपाळ-
श्रीनृपसातवाहन कालगणना=शक अनुसरणारे वंशीय.

2)मोरे-
चंद्रगुप्त मौर्य कुळवंशीय.

3)चाळके-
चालुक्य कुळवंशीय.

4)शेलार-
शिलाहार वंशीय.

5)मालुसूरे-
मल्ल कुळवंशीय.
तान्हाजी मालुसूरे सरदार.

6)कदम-
कदंब कुळवंशीय.

7)साळवी-
विजयनगर साळुव कुळवंशीय.
जिंजी किल्ला बांधणारा रुद्राजी साळवी.

8)जाधव-
श्रीभगवानश्रीकृष्ण यादव कुळवंशीय.

9)पालव-
इराणमधील पहलवी 
दक्षिणेतील पल्लव कुळ

10)पवार-
परमार कुळ.

11)सिंदे(शिंदे)-
नागकूळ सिंद कुळवंशीय.
सतारी=वारुळाची जागा पूजक कूळ.

12)साळूंखे-
सोळंकी कुळवंशीय.

13)राऊळ-
बाप्पा रावळ कुळवंशीय.
रावळ=लहान राजा.रावळनाथ=राऊळनाथ.

14)चव्हाण-
चौहान कुळवंशीय.

15)बागल-
बागूल कुळ.

16)राणे-
राणा कुळवंशीय. 
रामनगरचा राजा.

17)दळवी-
दळभार वाहणारे.सेनापती.
पालवणीचा राजा.

18)सूर्वे-
सूर्यराव बिरुद धारण करणारा चव्हाण.
शृंगारपुरचा राजा.

19)सावंत-
सा=सह.वंत=युक्त.श्री भवानी तरवार शिवरायांना देणारा "गोवले" चा पवार कुळांतील राजा.भोसले कुळांतील सावंतराय बिरुद धारण करणारा सावंतवाडीचा राजा.

20)आंगणे-
शिवाजीराजांच्या मसुरे वरील मोहिमेच्या वेळी अंगणात -मोकळ्या जागेत माळरानावर छावणी करुन राहणारे क्षत्रियकुलोत्पन्न बिराजरीतील लोक.


21)मालप-
माल=मल्ल वंशीय. मालप=मराठा आरमारधिकारी.17 नोव्हेंबर 1781 मधील उल्लेख बाबूराव मालप सुभेदार बंदर सिंधुंदूर्ग.

22)ठाकूर-
क्षत्रिय जमावांचा सरदार.

23)महाडिक-
महा=मोठा.नाड=प्रदेश.प्रांत-देश ह्यांतील जेष्ठ-श्रेष्ठ-वरिष्ठ लोक.शिवाजीराजांचे सोयरगत-परसोजीराजे महाडिक व त्यांचा पुत्र शिवाजीराजांचा जमात हरजीराजे महाडिक.

24)जगताप-
जगतपंथ=प्रतिकुल परिस्थितींसीं झुंज घेणारा वीर 

25)फाटक-
सीमारक्षक.महाराणी ताराबाई ह्यांचा किल्ले शिवनेरी व किल्ले रायगड हेथील मोहिम प्रसंगी हणमंतरीव फाटक नावाचा सरदार होता.कोल्हापूर राज्य निर्मिती प्रसंगी ते फाटक घराणे सिंधूदूर्ग परिसरात आले.

26)मोहिते-
शहाजीराजांची द्वितीय धर्मपत्नी राणी तुकाबाईसाहेब ह्या भिकुजी चव्हाण यांच्या सुकन्या.ह्या चव्हाण घराण्यास निजामशाहित अमीरराव हा किताब होता.भिकुजी चव्हाण व त्यांचे तीन पुत्र पुढे महाराष्ट्रात मोहिते उपनाम पावले.

27)नाईक-
कर्नाटकातील नायककूऴ .महाराष्ट्रातील 9 पाईक व ह्यांवरील दहावा नाईक हा आधिकारी.

28)बिर्जे-
बिराजरीतील,नात्यातील आप्तकूळ.

29)लाड-
प्राण्यांची खरेदी व विक्री करणारे व्यापारी.
हे उपनाम इतरही जातींत आहे.

30)घाग-
दखलगीरी,सावधानता,अतित्यशिल सरकारी पदाधिकारी.

31)चोर-
देवगिरीकर यादवकालीन सैन्याची पिछाडी रक्षक सेनापती. इ.स 1647 मधील पुरंदर परिसरातील झालेल्या युद्धात शिवाजीराजांच्या पायदळातील तुकोजी चोर हा क्षत्रिय सेनापती होता.

32)पिसाऴ-
खवळून हल्ला करणारा क्षत्रिय.

33)आगलावे-
तोफखान्यातील तोफांना पेटत्या काकड्याने बत्ती देणारा क्षत्रिय.

34)कुबल-
      शिवाजीराजांनी वेंगुर्ला मोहिप्रसंग किल्ले भूधरगड परिसरांतील तांबवे आसमंतातील जो जमाव आपल्यासोबत नेला त्यांना कुबल हे उपनाम पावले.

35)मुळीक-
     वाई परिसरांतील मुळे=मुळीक=मुलक 

36)खराडे-
       शत्रूवर कडाडून हल्ला करणारे ते खराडे.हा क्षत्रीय समाज दक्षिणेतून खंडोबादेवासोबत महाराष्ट्रांत आला आणि स्थिरावला.खर्डे,खरुडे,खराडे अस्या नावांनी.खंडोबापाली हेथील काळभोर क्षत्रियांसोबत शिवकाळांत झालेल्या सूड प्रवृत्तीमूळे महाराष्ट्रांत विखुरला व कोकमांत स्थिरावला.

37)गावडे-
         कर्नाटकातील गौडा हा प्रतिष्ठेचा पदाधिकाऱ आहे.तो धारण करणारे गावडे उपनाम पावले.मूळ क्षत्रियकुलत्पन्न गावडे प्राप्त परिस्थितींत पोटा पाण्यासाठी व्यावसायांत शिरले.

38)पाटील-
     घाटमाथ्यावर गांव प्रमुख क्षत्रियाने आपले मूलभूत क्षत्रिय उपनाम बाजूला ठेवून परंपरागत पाटील हे उपनाम धारण केले.पाटील ह्याचा शब्दार्थ=पट्ट लिख्ययति इति पाटील-पट्ट म्हणजे राजगादी.जसे पट्टराणी,पट्टाभिषेक.पट्ट वर्धयति इति पटवर्धन तसेच पट्ट करोति इति पटेकर.

39)बागवे-
   मौर्य कुलोत्पन्न क्षत्रिय मोरे जावळी मुलुखांतील केवनाळे व वाकण हेंथे उपराज्य धिकारी होता.तो बागराव बिरुद धारण करीत असे.बागी म्हणजे स्व-तंत्रता उत्सुक.शिवाजीराजांनी जावळी घेतल्यावर तो विजापूरास गेला.पुढे आदिलशहाने बागराव ह्यास मसुरे हेथील निपुत्रिक राज्यपदावर पाठविले आणि बागराव बागवे उपनाम पावला.

40)राऊत-
    राऊत म्हणजे घोड्यावरील शिलेदार. शिवकाळांत गोवाराज्य सरहद्दीवर राऊत स्थायिक झाले.हे क्षत्रिय मराठे होते.कालौघांत आपले मूळ उपनाम विसरले कारण राऊत नावांला प्रतिष्ठा होती.

41)परब-
    परब-प्रभू-परबु-परब.गावचा प्रमुख.दुय्यम क्षत्रिय घराणे.नाग,शाक्त,शैव,यादव कुळांतील हे लोक.


42)धुरी-
  धुरंधर राज्यकारभाराचा भार वाहणारा शासकीय आधिकारी.

43)देसाई-
    देशवाही मुलुखाचा शासकीय आधिकारी.

44)वारंग-
   तरवारची मूठ आपल्या मुठीत धरणारा

45)शिर्के-
    सैन्याचा आघाडीचा वीर.

46)गवस-
   टेहाळणी पथकांतील वीर

47)तावडे-
   ताव त्वेष.त्वेषानें शत्रूंसी लढणारा वीर.

48)साटम-
  साट-तडाखा.रणात अविश्रांत हातांतील शस्राने तडाखे हाणणारा वीर.

49)पंडीत-
   शिवाजीराजांच्या कुडाळवरील सुभेदार राहुजीपंडीत ह्याच्या हाताखालील सैन्यांतील वीर.

50)घोरपडे-
   बहमनी प्रधान महमंद गवान ह्याच्या विशाळगडावरील मोहिम प्रसंगी इ.स.1470 मध्यें कोकणांतून घोरपड लावून चढलेले क्षत्रिय भोसले कुलोत्पन्न कर्णसिंह ह्याचा पुत्र भीमसिंह ह्याचे कूळ.

51)विचारे-
   किल्ले खेळण्यावरील मोरे कुलोत्पन्न शंकरराय घराण्याने जावळी युद्ध प्रसंगी आपली कन्यका जयंति शिवाजीराजांस विचारपुर्वक विवाह लावून दिली आण विचारवंत मोरे विचारे उपनाम पावले.

52)गायकवाड-
   इ.स.1641 मध्ये 1 व्या वर्षी शिवाजीराजे बंगळूरहून पुण्यास जातांना विजापूरास शहाजीराजांसोबत होते.त्यावेळी एके दिवशी फिरत असताना विजापूरांतील एका रस्त्यांवर  एक कसाई गाय मारीत होता.
 11 वर्षाच्या शिवाजी राजांनी तो गोवध पाहिला.
त्यांना तो गोवध सहन झाला नाही.त्यांनी सोबतच्या अंगरक्षकाला हुकुम केला.त्या कसायाचा हात कलम केला.विजापूरात थोडी गडबड झाली.पण राजदरबाराची प्रतिष्ठा लक्षात घेऊन कोतवालाने प्रतरण मिटविले.सायंकाळी जिजामातांनी विचारले तो गोवध थांबविणारा कोण?सर्वांनी कृष्णाजी म्हणून सांगितले..जिजामाता म्हटल्या, कृष्णाजी आपण तो गायकैवारी आहांत!माझ्या मुलांच्या सांगण्यावरुन आम्हाला सहन न होणारा गोवध आपण थांबविलात.आजपासून तुम्ही गायकैवारी म्हणून उपनमपावलांतव पुढे शब्दांचा अपभ्रंश होऊन "गायकवाड" हे उपनाम पावले.

53)आहेर-
   श्री भगवानश्रीकृष्णाचे यादव कुळ वंशीय.96 कुळांतील आद्य नाव "अहिरराव" या मुळ आडनावाचे अपभ्रंशात्मक रुप.
*गोत्र-भारद्वाज
*देवक-पंचपल्लव
कदाचीत अहिरराव हे एक बिरुद आहे.ज्या आडनावाच्या मागे राव हा शब्द जोडला जातो.ती शक्यतो उपाधीच असते.जसे की हैबतराव,अमीरराव वगैरे.
पुढे कदाचीत राव हे सन्मानपुर्वक नाव तथाकथीतांच्या पचनी पडले नाही व या नावाचा अपभ्रंश होऊन "आहेर" हे उपनाम पावले.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४