किल्ले रायरेश्वराचा इतिहास हिंदवी स्वराज्य शपथभुमी रायरेश्वर या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोहचणार. या उप्रकामाचं शिवप्रेमीन कडून स्वागत होत आहे.
छत्रपती शिवरायांनी दिला स्वातंत्र्याचा महामंत्र
छत्रपती शिवरायांनी रायरेश्वरावरील शंभू महादेव मंदिरात वयाच्या१५ व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. अठरापगड जातीच्या मावळ्यांना शिवरायांनी इथे स्वातंत्र्याचा महामंत्र दिला. शिवरायांच्या विश्ववंदीय लोककल्याणकारी कार्याच्या स्मृतींना विशेष टपाल पाकीटामुळे उजाळा मिळाला आहे.
आम्ही भोरकरचे अध्यक्ष समीर घोडेकर, सचिन देशमुख, सुनिल चिकणे, सुधीर तनपुरे, काळुराम धावडे, टपाल खात्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद भोसले, संतोष शिवतरे, पराग शिळीमकर, सुनिल जंगम आदी यावेळी उपस्थित होते
किल्ले रायरेश्वराचा इतिहास हिंदवी स्वराज्य शपथभुमी रायरेश्वर या विशेष टपाल पाकिटाने जगभरात पोहचणार आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी केले.टपाल खात्याच्या वतीने व रायरेश्वर ग्रामस्थ संस्था यांच्या पुढाकाराने तसेच बायोस्फिअर्स संस्था यांचे सहकार्याने रायरेश्वर हिंदवी स्वराज्य शपथभूमी विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन किल्ले रायरेश्वर (ता. भोर) येथे सोमवारी (दि.१७) पुणे टपाल विभागाच्या संचालिका सिमरन कौर यांच्या हस्ते करण्यात झाले.
संदर्भ :-पुढारी वर्तमान पत्र न्यूज
Comments
Post a Comment