पाकिस्तानच्या सीमेवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. जम्मू कश्मीर या ठिकाणी असणाऱ्या मराठा रेजिमेंट चक्का मचल घाटामध्ये नियंत्रण रेषा बॉण्ड्री( LOC ) जगात प्रथमच एव्हड्या उंची वर छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन केला आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर  शिवरायांची मूर्ती स्थापना.
 जम्मू कश्मीर या ठिकाणी असणाऱ्या मराठा रेजिमेंट चक्का मचल घाटामध्ये नियंत्रण रेषा बॉण्ड्री( LOC ) जवळच छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापन केला आहे.
 संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे.
14800 फूट उची वर घोड्यावर तलवार घेऊन बसलेले शिवाजी महाराज असा पुतळा उभारला आहे.
 पहिल्यांदाच जगात एवढ्या उंचीवर आणि सीमेलगत असा पुतळा उभारण्यात आला  आहे.

अभिमानास्पद...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय समस्त देशवासीयांचेही आराध्य आहेत. या भावनेतून देशात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जागांना, वास्तूंना छत्रपतींची नावे दिलेली आपल्याला आढळतात. देशभर छत्रपतींचे असंख्य पुतळेही आहेत. मात्र सैन्यातील मराठा रेजिमेंटने याबाबतीत एक विक्रमच केला आहे. जम्मू-कश्मीर येथे मच्छलच्या खोऱ्यात मराठा रेजिमेंटने नियंत्रण रेषेजवळ सुमारे १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा स्थापित केला. जगात सर्वप्रथमच महाराजांचा पुतळा एवढ्या उंच जागी बसवला गेला आहे.
पुण्यातील युवा मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी हा सुंदर पुतळा साकारला आहे. मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी हा पुतळा मच्छल येथे बसवण्याचे पवित्र काम केले आहे.
याबाबत कर्नल पवार यांनी सांगितले, ‘‘मावळ्यांना एकत्र करत स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. शिवाजी महाराजांनी शत्रूला आपल्या युद्धनीती आणि धाडसी कर्तृत्वाने पळवून लावले. त्यांच्या मावळ्यांची फौजेप्रमाणे आज लष्कराचे सैन्य देखील सीमेवर शत्रूशी लढत आहे. शिवाजी महाराज हे प्रेरणेचे केंद्र आहेत. गेल्या १४ वर्षांपासून मराठा रेजिमेंट काश्‍मीर खोऱ्यात सीमेवर तैनात आहे. शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये दररोज मिळत राहावे या अनुषंगाने मच्छल येथे शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित करण्याची कल्पना सुचली. 
देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र लढणाऱ्या सैन्यातील शूर-वीर जवानांना छत्रपती शिवरायांचे स्मारक सदैव चेतना, विश्वास व लढण्याचे तेज देत राहील.

जय शिवराय 🚩🚩


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४