स्वराज्य संकल्पकशहाजीराजे भोसले
🚩स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩
महाबली, सरलष्कर, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांना त्रिवार मुजरा ..
स्मृतिदिन - २३ जानेवारी १६६४ (शालिवाहन शके १५८५, माघ शु.५ )
शहाजी राजांचा जन्म:-
शहाजी राजांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी मालोजीराजे व दिपाबाई ऊर्फ ऊमाबाई साहेब यांच्या पोटी झाला.
शहाजीराजे हे गनिमी युद्धाच्या सुरुवातीच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. त्यांनी भोसले कुटुंबाला वेगळेपण दिले. तंजावर, कोल्हापूर, सातारा ही मूळ राज्येही भोसले घराण्याची देणगी आहेत.
शाहजीराजे भोसले (१५९४-१६६४) हे 15व्या शतकातील बलाढ्य सेनापती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे स्वप्न पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले.शहाजीराजे यांनी अहमदनगर सल्तनत, विजापूर सल्तनत आणि मुघल साम्राज्यात मोठ्या हुद्द्यावर काम वेगवेगळ्या वेळी काम केले.
आपल्या मुलांची नावं मालोजीनी शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. शहाजी राजे लहान असतांना त्यांचा विवाह जिजाबाईंशी झाला. जिजाबाई या लखुजी जाधवांची कन्या! लखुजी जाधवराव हे अहमदनगर येथील निजाम शहाचे मराठा सरदार होते.
मालोजीराजे यांना दोन मुलं होती. त्यापैकी थोरले शहाजीराजे तर धाकट्या मुलाचं नाव शरीफजी होतं. शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला," असं डफ यांनी नमूद केलं आहे.
इतिहासतज्ज्ञ डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांनी शहाजीराजे आणि वेरूळ यांचा फार जवळचा संबध असल्याची माहिती दिली. "वेरूळ हे त्यांचं वतनाचं गावं होतं. त्याकाळी दौलताबाद आणि वेरूळ एकच समजलं जायचं. अहमदनगरच्या निजामशाहीचं राज्य सांभाळताना मोगलांशी लढाईचं नियोजन निजामशहानं इथूनच केलं," असं मोरवंचीकर म्हणाले.
मालोजीराजे यांच्या अकाली मृत्यूनंतर शहाजीराजे वयाच्या पाचव्या वर्षीच निजामशाहीचे जहागिरदार कारण्यात आल.
शहाजीराजे अत्यंत देखणे व तेजस्वी पराक्रमी होते..
शहाजी राजांच्या आई उमाबाई या एक धाडसी , दूरदृष्टी असलेल्या महिला होत्या .आणि त्यांच्या देखरेखीखाली शहाजीराजे घडले होते.
अगदी कमी वयात मोठ्या जबाबदाऱ्या आल्याने राजकारण-समाजकारण त्यांना जवळून पाहता आले.
त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला युद्धशास्त्र निपुणतेचे उच्चकोटीचे अधिष्ठान लाभले होते. त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले होते .
उत्तरेकडे आणि दख्खनमधे प्रचंड राजकीय उलथापालथी घडल्या त्यातच शहाजी महाराजांच्या निर्णायक भूमिका होत्या शहाजीराजांचे कर्तुत्व हे त्या काळी इतिहासात उजळून निघाले होते.
ह्या तरुण मराठा योध्याने ,वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी ,म्हणजे इ. स.१६२४ ऑक्टोबरमध्ये ,अहमदनगर जवळ भातवडीच्या टेकाड प्रदेशात दोन सुलतानी महासत्तांचा एकाच दिवशी, एकाच वेळी , जंगी पराभव केला. ही गोष्ट काय साधी नव्हती.
दिल्लीच्या जहांगीर बादशहाची फौज एकवटून निजामशाही बुडवण्यासाठी महाराष्ट्रावर लोटली होती. ती निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजांनी , आपल्या त्या मानाने अगदीच कमी असलेल्या फौजेनिशी अत्यंत कल्पकतेने प्रचंड मोठ्या फौजेचा कमीत कमी वेळात संपूर्ण पराभव केला.
त्यांच्या शौर्याने आणि पराक्रमाने दोन बादशाही सत्तांचा पराभव सह्यप्रदेशातील एक तरुण ,आपल्या थोडक्या फौजेनिशी, थोडक्या वेळात , एकाच वेळी करतो ,हा इ.स. ११०० ते १६०० ह्या पाचशे वर्षातील भरतखंडातला एक विलक्षण चमत्कार होता . गनिमी काव्याचे युद्धतंत्र अत्यंत कल्पकतेने वापरून महाराजसाहेब शहाजीराजे यांनी हा चमत्कार घडवून दाखवला .
मराठी मातीत स्वराज्य निर्मितीचा पाया प्रथमतः शहाजीराजांनीच घातला. आपले स्वप्न आपल्या मुलाच्या हातून साकार करून घेणारा हा नवा पायंडा जगासमोर ठेवणारा हा राजा होता.स्वराज्य स्थापनेची स्फुर्ती जिजाऊ शिवरायांना देणारा व स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता म्हणून शहाजीराजांचे योगदान लक्षणीय आहे.
भातवडीच्या युद्धामुळे शहाजी राजांची प्रतिष्ठा खूप वाढली. त्यांना वगळून आता दक्षिणेत कोणतेही राजकारण अशक्य होते .भातवडीच्या लढाईचे खरे शिल्पकार शहाजी राजेच होते.
रणजित देसाई यांच्या 'श्रीमान योगी'साठी नरहर कुरूंदकर यांनी त्यांना लिहिलेलं पत्रच प्रस्तावना म्हणून वापरलं आहे. या पत्रात कुरूंदकर यांनी "शिवाजीच्या कार्याला मागे शहाजीची परंपरा आहे. ही कल्पना मान्य केल्यावाचून काही घटनांची संगती लागतच नाही. कर्नाटकाची जहागिरी थोरला मुलगा संभाजीसाठी तर पुण्याची जहागिरी धाकटा मुलगा शिवाजीसाठी, असं नियोजन शहाजीने 1636लाच केलं," असं म्हटलं आहे.
पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्वराज्य संस्थापक शहाजी राजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
Comments
Post a Comment