Posts

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*८ जून १६४९*

 ⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *८ जून १६४९* छत्रपती शिवरायांनी चाकणचा संग्रामदुर्ग घेतला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *८ जून १६६६* आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठविण्यास सुरूवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *८ जून १६६८* व्हिसेरेईचे पेडण्याचे सुभेदार विरो पंडीतास पत्र "उपद्व्यापी देसायांना आमच्या राज्यातून हाकलून देण्यात आले आहे. व्हिसेरेईने महाराजांनाही ही गोष्ट कळविल्याचा पुरावा उपलब्ध आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने बंडखोर देसायांना गोवा राज्यातून हाकलून लावले ते अर्थात कुडाळ मध्ये परत गेले. परंतु महाराजांनी त्यांना पकडून शासन न करता औदार्याने वाढविले. त्यानंतर त्यांनी ज्याअर्थी बंडाळी माजविल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यावरून ते महाराजांचे प्रजाजन म्हणून कुडाळ मध्ये राहीले असले पाहिजेत. महाराजांचा व पोर्तुगिजांचा जो तह झाला तो महाराजांना फायदेशीर नव्हता, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. परंतु अन्य काही इतिहासकारांचा असा दृष्टिकोन आहे की एका परकी राजवटीने महाराजांशी समान पातळीवर तह के

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ जून १६६६* आग्र्याहून सुटका प्रकरण 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर आणलेल्या फौजेला रजा देऊन दक्षिणेत पाठवण्यासाठी औरंगजेबाकडे परवाने मागितले. 🚩 छत्रपती शिवरायांनी रामसिंगला आपल्या जामिनकीतून मुक्त होण्यास सांगितले परंतू रामसिंगने स्पष्ट नकार देत आपली जबाबदारी सोडली नाही. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *७ जून १७५५* मराठ्यांचे निशाण ग्वाल्हेरच्या किल्यावर डौलाने फडकले मराठी फौजांनी आणखी एक पराक्रम गाजविला. कुंभेरच्या मराठे-जाट संग्रामात गोहदच्या भीमसिंग जाटाने मराठ्याविरुद्ध भाग घेतला होता. रघुनाथरावाने या जाटाचे पारीपत्य करण्याची कामगिरी विठ्ठल शिवदेवाकडे सोपविली. गोहादचा किल्ला ग्वाल्हेरच्या ईशान्येस बावीस मैलावर होता. विठ्ठल शिवदेवाने ग्वाल्हेर व गोहाद या दोन्ही ठिकाणच्या किल्यांना मोर्चे लावले. विठ्ठल शिवदेवच्या अनुपस्थितीत भीमसिंग जाटाने ग्वाल्हेरचे मोर्चे उधळून ग्वाल्हेरात प्रवेश केला. विठ्ठल शिवदेवाच्या कित्येक सैनिकांनाहि त्याने कैदेत टाकले. त्यांच्या सुटकेसाठी रदबदली करण्यास आलेल्या विठ्ठल शिवदेवाच्या वकीलाचा अपमान कर

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १६६६* छत्रपती शिवराय जेव्हा आग्रा शहरात आले होते तेव्हा त्यांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडेतत्वावर घेतले होते. हि गोष्ट औरंगजेबला समजताच त्याने महंमद अमीन खानास इनामवर्दीखानाची चौकशी करून अटक करण्याचे आदेश दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १६७४* एंद्रीशांतीचा मुहूर्त... या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १७०७* आग्र्याजवळ जाजाऊ येथे ३१ मे रोजी शहजादा आझम व शहजादा मुअज्जम यात युद्ध झाले व आझम त्यात मारला गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ मे १७२५* सुभेदार मल्हारराव होळकर राजे यांची सून, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी महाराष्ट्रातील चौंडी, जामखेड, अहमदनगर गावी झाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,* *सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* *"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय म

सरसेनापती हबीरराव**ब्लॉकबस्टर* ⭐⭐⭐⭐⭐पहिल्या ३ दिवसात विक्रमी ८.७१ कोटी कलेक्शन... 🙏🏼

Image
*सरसेनापती हबीरराव* *ब्लॉकबस्टर* ⭐⭐⭐⭐⭐ पहिल्या ३ दिवसात विक्रमी ८.७१ कोटी कलेक्शन... 🙏🏼 फक्तं तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास ..  फक्तं आणि फक्तं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे ..🙏🏼  कोणा एकेकाळी आमच्या मोहिते परिवारातील संदीपदादा मोहिते पाटील यांनी महाराजांना शब्द दिला होता की तुमच्या आणि हंबीरराव मोहितेंच्या पराक्रमाची कथा चंदेरी पडद्यावर अनीन आणि आज आमचे ते स्वप्न तो शब्द खरा झाला.  *महाराष्ट्राचा महासिनेमा "सरसेनापती हंबीरराव" प्रदर्शित झाला.* 🙏🏼 *आम्हा मोहित्यांचे ईमान हे तो राजीयांच्या पायाशी* 🙏🏼 आपण सर्व प्रेक्षकांनी आम्हाला जो उदंड प्रतिसाद दिला प्रेम दिले आशीर्वाद दिले त्या बदल आम्ही आभारी आहोत मना पासून धन्यवाद 🙏🏼 असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा...🚩 *संदीप मोहिते पाटील* *प्रवीण विठ्ठल तरडे* *प्रसाद नारायण मोहिते* 🚩जय भावानी जय शिवाजी🚩

सातारा जिल्हा किल्ले ब्लॉग नंबर 24 किल्ले सुभानमंगळ

आदिलशहाचा वजीर मुस्तफ़ाखानाने २५ जुलै १६४८ रोजी शहाजी राजांना बेसावध गाठुन कैद केले. त्याबरोबर आदिलशहाने शिवाजी महाराजांचे परिपत्य करण्यासाठी फ़तेहखानाला पाठवल. त्यावेळी स्वराज्याचा आकार लहान होता. स्वराज्यात शिरुन त्याची नासधुस करु नये म्हणुन शत्रूला आपल्या स्वराज्यात शिरु द्यायच नाही असा विचार करून महाराजांनी स्वराज्याच्या सीमेवर शत्रुशी दोन हात करायचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पुरंदर किल्ला आणि त्याच्या आसपासचा परीसर हे युध्द क्षेत्र ठरवण्यात आल. महाराज पुरंदरवर असल्याने फ़तेहखानाने पुरंदरच्या जवळ बेलसरला छावणी टाकली आणि बाळाजी हैबतरावांना शिरवळच्या किल्ला घेण्यासाठी पाठवले. महाराजांचे सैन्य कमी होते. त्यांना सैन्याची हानीही करायची नव्हती. त्यामुळे त्यांनी विशेष प्रतिकार न करता किल्ला फ़तेखानाच्या स्वाधिन केला. सुभान मंगळ सहजासहजी हाती आल्याने बाळाजी हैबतराव बेफ़िकीर राहीला. दुसर्‍या दिवशी पहाटेच कावजी मल्हार खासनीस या सरदाराला महाराजांनी सुभानमंगळ घेण्यास पाठवले. त्याने किल्ल्याचा तट फ़ोडुन किल्ल्यात प्रवेश केला आणि गाफ़िल शत्रूवर हल्ला करुन किल्ला जिंकुन घेतला. पहाण्याची ठिकाणे नीरा नदीक

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष*

⛳ *⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १४९८* पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६६५* किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६७३* छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६७७* जिंजी स्वराज्यात दाखल २० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १६८२* छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मे १७६६* मल्हारराव होळकर यांचे निधन ( जन्म - १६ मार्च १६९३ )  पानिपतनंतर मराठेशाहीची

सोलापूर जिल्ह्यातील किल्ले ब्लॉक नंबर एक सोलापूरचा किल्ला

मध्यकालीन इतिहासात सोलापूरच्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान होते. १४ व्या शतकात बहामनी राज्याच्या काळा मध्ये हा किल्ला बांधला गेला. मते, औरंगजेबने या किल्ल्यावर बराच काळ घालवला. पेशव्यांच्या स्वाधीन झाल्यावर दुसरा बाजीराव इथे राहिला होता. बहामनी सुलतानने किल्ल्यात एक मंदिर बांधले होते. हे मंदिरही प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. मुंबई-हैद्राबाद हा महामार्ग सोलापूर शहरातून जातो. सोलापूर शहरात भुईकोट प्रकारचा किल्ला आहे. हा किल्ला भुईकोट किल्ला म्हणून म्हणून ओळखला जातो. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक ४ डिसेंबर, इ.स. १९३० रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून  घोषित केलेले आहे. मध्यकालीन इतिहासामध्ये सोलापूरच्या किल्ल्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. बहमनींच्या राज्याची शकले उडाल्यावर त्यातून पाच शाह्या निर्माण झाल्या. या पाच शाह्यांनी आपली वेगळी चूल मांडली. या पाचही राजवटीच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूरचे भौगोलिक स्थान होते. त्यामुळे सोलापूरचे महत्त्व वाढले. बाराव्या शतकात बांधलेले हा भुईकोट किल्ला सिद्धेश्वर तलावाच्या काठावर वसलेला आहे. इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी व होसी पर्यटकांनी आवर्ज