आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ मे १६६६*
छत्रपती शिवराय जेव्हा आग्रा शहरात आले होते तेव्हा त्यांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडेतत्वावर घेतले होते. हि गोष्ट औरंगजेबला समजताच त्याने महंमद अमीन खानास इनामवर्दीखानाची चौकशी करून अटक करण्याचे आदेश दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ मे १६७४*
एंद्रीशांतीचा मुहूर्त...
या दिवशी छत्रपती शिवरायांची अग्निप्रतिष्ठा करण्यात आली यात इंद्रायणी पूजा झाली व अनुपान्गिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्विक यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ मे १७०७*
आग्र्याजवळ जाजाऊ येथे ३१ मे रोजी शहजादा आझम व शहजादा मुअज्जम यात युद्ध झाले व आझम त्यात मारला गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*३१ मे १७२५*
सुभेदार मल्हारराव होळकर राजे यांची सून, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी महाराष्ट्रातील चौंडी, जामखेड, अहमदनगर गावी झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment