आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष*

⛳ *⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १४९८*
पोर्तुगालचा वास्को-द-गामा दोनशे खलाश्यांसह भारतातील कालिकत बंदरामध्ये येऊन पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १६६५*
किल्ले राजगडाहुन "छत्रपती शिवरायांनी" आपले वकिल 'रघुनाथपंत पंडितराव' यांना "मिर्झाराजे जयसिंह" यांच्याकडे "पुरंदर तह" संदर्भात बोलणी करण्याकरता रवाना केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १६७३*
छत्रपती शिवराय महाबळेश्वर येथे दाखल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १६७७*
जिंजी स्वराज्यात दाखल
२० मे १६७७ च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी स्वराज्यात सामील केला. महाराजांनी नसीर मुहम्मदला ५०००० होन रोख दिले. आणि दक्षिण दिग्विजयार्थ आपली आगेकूच चालूच ठेवली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १६८२*
छत्रपती संभाजीराजेंच्या आदेशाने मुघल सरदार शरीफखानाच्या सैन्यावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला.
वाढलेल्या गवतातून मराठे आले आणि प्रमुख जाहीदखान, चुराघासी, सैफुखान, असहनउल्लाह सह इतर सैन्याची कत्तल करून मराठे पसार झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १७६६*
मल्हारराव होळकर यांचे निधन
( जन्म - १६ मार्च १६९३ ) 
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १८१८*
इंग्रज अधिकारी "क्याप्टन स्कॉटने" 'बल्लारपुर उर्फ चांद्याच्या किल्ल्याला' खिंडार पाडुन प्रवेश केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मे १८१८*
यश मिळवण्याचा निश्चय करुन "मेजर एल्ड्रिजने" आपल्या फौजेनिशी "किल्ले शिवनेरी" व "जुन्नरच्या गढिवर"आक्रमण केले व 'शिवनेरी' बरोबर 'जुन्नरच्या गढिवर' ताबा मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...