आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जून १६६६*
आग्र्याहून सुटका प्रकरण

🚩 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर आणलेल्या फौजेला रजा देऊन दक्षिणेत पाठवण्यासाठी औरंगजेबाकडे परवाने मागितले.

🚩 छत्रपती शिवरायांनी रामसिंगला आपल्या जामिनकीतून मुक्त होण्यास सांगितले परंतू रामसिंगने स्पष्ट नकार देत आपली जबाबदारी सोडली नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जून १७५५*
मराठ्यांचे निशाण ग्वाल्हेरच्या किल्यावर डौलाने फडकले
मराठी फौजांनी आणखी एक पराक्रम गाजविला. कुंभेरच्या मराठे-जाट संग्रामात गोहदच्या भीमसिंग जाटाने मराठ्याविरुद्ध भाग घेतला होता. रघुनाथरावाने या जाटाचे पारीपत्य करण्याची कामगिरी विठ्ठल शिवदेवाकडे सोपविली. गोहादचा किल्ला ग्वाल्हेरच्या ईशान्येस बावीस मैलावर होता. विठ्ठल शिवदेवाने ग्वाल्हेर व गोहाद या दोन्ही ठिकाणच्या किल्यांना मोर्चे लावले. विठ्ठल शिवदेवच्या
अनुपस्थितीत भीमसिंग जाटाने ग्वाल्हेरचे मोर्चे उधळून ग्वाल्हेरात प्रवेश केला. विठ्ठल शिवदेवाच्या कित्येक सैनिकांनाहि त्याने कैदेत टाकले. त्यांच्या सुटकेसाठी रदबदली करण्यास आलेल्या विठ्ठल शिवदेवाच्या वकीलाचा अपमान करण्याचे जाटाने कमी केले नाही. दिल्लीहून फौजफाटा मागविला तिकडून आलेल्या नव्या फौजेमुळे विठ्ठल शिवदेवाचा दम वाढला. जाटावर हल्ले करून त्याने जाटाचा दम कोंडला. महादजी शितोळ्याने भीमसिंगाला घोड्यावरून खाली पाडले. आणि विठ्ठल शिवदेवाने क्षणार्धात त्याचा शिरच्छेद केला. जाट पडल्यावर त्याची फौज मोडावयास मराठ्यांना किती उशीर? किल्ला सर करून मराठ्यांचे निशाण ग्वाल्हेरच्या किल्यावर डौलाने फडकू लागले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जून १८५८*
पेशव्यांच्या अगणित संपत्तीची लुट 
इ. स. १८५७ सालीं उत्तर हिंदुस्थानांत बंड उद्भवलें व ब्रह्मावर्त येथील बाजीराव पेशव्यांचा मुलगा नानासाहेब व त्याचा भाऊ हे त्यांत सामील झाले आणि कानपूर, ग्वाल्हेर, झांशी, बांदा वगैरे ठिकाणीं बंडाचा प्रादुर्भाव झाला. त्या वेळीं कारवी येथेंहि कांहीं चलबिचल झाली व तेथील जॉइन्ट मॅजिस्ट्रेट मिस्टर कॉकरेल ह्याच्यावर संकट आलें. इ. स. १८५८ च्या जून महिन्यामध्यें सर ह्यू रोज यानें झांशी, काल्पी वगैरे ठिकाणें घेऊन ग्वाल्हेर हस्तगत केलें व बंडवाल्यांचा अगदीं पराभव केला. त्याच वेळीं जनरल व्हिटलॉक यांनें बांदें शहरावर चाल करून तें हस्तगत केलें व कारवीवर ता. २ जून १८५८ रोजीं मोर्चा वळविला. कारवी येथें बिलकूल लढाई न होतां माधवराव व नारायणराव पेशवे हे व्हिटलॉक साहेबांस शरण आले. जनरल व्हिटलॉक यानें ते बंडांत सामील असल्याचा संशय धरून त्यांस आपल्या लष्करांत कैदेंत ठेविलें. जनरल व्हिटलॉक याच्या सैन्यानें ता. ७ जून इ. स. १८५८ रोजीं कारवी येथील पेशव्यांचा वाडा वगैरे लुटून अगणित संपत्ति हस्तगत केली. ती पुढें विजयाचें बक्षीस म्हणून इंग्रज सैन्यास देण्यात आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४