⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*८ जून १६४९*

 ⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जून १६४९*
छत्रपती शिवरायांनी चाकणचा संग्रामदुर्ग घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जून १६६६*
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठविण्यास सुरूवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जून १६६८*
व्हिसेरेईचे पेडण्याचे सुभेदार विरो पंडीतास पत्र
"उपद्व्यापी देसायांना आमच्या राज्यातून हाकलून देण्यात आले आहे. व्हिसेरेईने महाराजांनाही ही गोष्ट कळविल्याचा पुरावा उपलब्ध आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने बंडखोर देसायांना गोवा राज्यातून हाकलून लावले ते अर्थात कुडाळ मध्ये परत गेले. परंतु महाराजांनी त्यांना पकडून शासन न करता औदार्याने वाढविले. त्यानंतर त्यांनी ज्याअर्थी बंडाळी माजविल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यावरून ते महाराजांचे प्रजाजन म्हणून कुडाळ मध्ये राहीले असले पाहिजेत. महाराजांचा व पोर्तुगिजांचा जो तह झाला तो महाराजांना फायदेशीर नव्हता, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. परंतु अन्य काही इतिहासकारांचा असा दृष्टिकोन आहे की एका परकी राजवटीने महाराजांशी समान पातळीवर तह केल्याने त्यांच्या राज्यास कायदेशीर मान्यता प्राप्त झाली. कारण तोपर्यंत ते बंडखोर म्हणूनच ओळखले जात होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जून १७०३*
व्हिसेरेईचे कान्होजी आंग्रेंस पत्र 
"आमच्या मधल्या मैत्रीची आणि परस्पर सहकार्याची वाच्यता होऊ नये अशी माझी इच्छा आहे. या बाबतीत रामजीपंत व अझमतखान या दोघांशी माझी जी बोलणी झाली आहेत. त्यांचा तपशील आपणाला त्या दोघांकडून कळेलच. इकडे आता पावसाळा सुरू झाला असल्याने समुद्रात वादळ सुरू होण्याची भीती आहे. तो धोका नसल्यास त्या दोघांना मी पाठवून देईन. रामजीपंत आणि अझमतखान या दोघांना कान्होजी आंग्रे यांनी व्हिसेरेईशी मैत्रीची बोलणी करण्यासाठी गोव्यास पाठविले असावे. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जून १७१३*
पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*८ जून १७८७*
टिपू व मराठ्यांचा तह - गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर किल्ले मराठ्यांस परत
टिपूच्या या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता नाना फडणीसाने निजामची यादगीर येथे भेट घेतला आणि दोघांनी टिपूवर स्वारी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे उभयतांनी टिपूवर स्वारी करून अनेक ठाणी काबीज केली. सावनेर येथे मोठी लढाई झाली. पण ती निर्णायक झाली नाही. तेव्हा नाना फडणीसाने मॅलेट यास भेटून इंग्रजांची मदत घेण्याचे ठरविले. त्या वेळी टिपूने मराठ्यांबरोबर १७८७ मध्ये तह केला. त्यानुसार ४८ लक्ष रु. खंडणी ठरली व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर येथील किल्ले मराठ्यांस परत द्यावेत, अदवानी संस्थान निजामास द्यावे आणि सावनेरकरांचा मुलूख त्यांचा त्यांना परत करावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...