Posts

सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जवान शुभम पडवळ यांचे मनमाडजवळ रेल्वे अपघातात गुरुवारी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Image
साताऱ्यातील शेंद्रे गावचे सुपुत्र असलेले जवान शुभम पडवळ यांना वीरमरण प्राप्त झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. सुट्टी संपवून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या जवान शुभम पडवळ यांचे मनमाडजवळ रेल्वे अपघातात गुरुवारी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  जवान शुभम दिलीप पडवळ हे शेंद्रे गावचे सुपुत्र होते. पदवीचे शिक्षण पूर्ण करून ते २०१८ साली सैन्यात दाखल झाले. गेल्या चार वर्षांपासून ते १६९ फिल्ड रेजिमेंटमध्ये औरंगाबाद येथे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या निधनाने पडवळ कुटुंबियांवर आणि शेंद्रेच्या ग्रामस्थांवर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हे दु:ख सहन करण्याचे बळ त्यांना मिळो, ही प्रार्थना .

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ डिसेंबर १६४४* सदर पत्र शाहजीराजे भोसले यांनी महादभट बिन तिमणभट यांस मार्गशीर्ष वद्य ९, शके १५६६ दि. १२ डिसेंबर १६४४ रोजी लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, 'तुमच्या वडिलांना तिमणभट बिन दामोदरभट यांना आमच्या मातुश्री उमाई आवा यांनी घृष्णेश्वराचा अभिषेक सांगितला होता. त्याप्रमाणे तुम्हीही अभिषेक करीत जाणे.' ह्यासाठी शाहजीराजांनी वर्षाचे १७ होन दिलेले आहेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ डिसेंबर १६७३* छत्रपती शिवरायांचा कर्नाटकातील हुबळीवर हल्ला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ डिसेंबर १६८४* १६८१ च्या एप्रिल महिन्यापासून मुघलांनी नाशिक जिल्ह्यात आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या. दिंडोरी तालुक्यातील रामसेज किल्ल्याची माहिती मुघल सरदार शहाबुद्दीन खानाला असल्याने औरंगजेबाने खानाला रामसेजला वेढा देण्यासाठी पाठवले होते. पण रामसेज किल्ल्याचा किल्लेदार हा अत्यंत अनुभवी आणि कसलेला योद्धा होता. शिवाय जवळच्याच त्रिंम्बकगडावरून केशव त्रिमल हे रामसेजला युद्धसाहित्य पुरवठा करत होते. शहाबुद्दीन खानाची मात्र त्याच्यापुढे चालेना. त्यामुळे औरंगजेबाने

आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩#११_डिसेंबर

🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_डिसेंबर_१६६४ छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_डिसेंबर_१६६९ सरसेनापती प्रतापराव गुजर व निराजी रावजी यांना धरण्याविषयीचे फर्मान अखेर आजच्या दिवशी मुअज्जमला मिळाले. ३ डिसेंबर १६६९ रोजी सगळे जण निसटले होते, त्याप्रमाणे मुअज्जमने औरंगजेबाला लिहून पाठवले की, सगळे जण निसटून गेले, हाजिर असते तर कैद केले असते. याच घटनेनंतर शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्यातील तह आधिकृतरित्या मोडला. 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 #११_डिसेंबर_१६८३ शंभूराजांनी गोव्यावर चढाई केली आणि त्यांच्या या झंझावातामुळे फिरंग्यांनी आपली राजधानी मार्मा गोव्याला हलवली होती. आपल्या मातृभूमीला लागलेली ही कीड शंभुराजेंना काढायची होती आणि इतक्यात शहजादा शहाआलम मोठ्या सैन्यानिशी तळकोकणात दाखल होण्याची खबर येऊन धडकली आणि राजांना माघार घेणे भाग पडले पण परतताना शंभूराजांनी साष्टी आणि बारदेशवर एकाच वेळी हल्ले चढवले. ११ डिसेंबरला मराठे मडगावला आले. कुंकळी व असोळण्याच्या लोकांनी फिरणग्यांना देतो तितका महसूल देण्याचे कबूल केले. १३ डिसेंबर १

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१० डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१० डिसेंबर १५१०* भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) युरोपियन-(पोर्तुगीज)  सत्तेने राज्य केले. गोव्यात पोर्तुगीज सत्ता १० डिसेंबर १५१० पासून १८ डिसेंबर १९६१ पर्यंत म्हणजे ४५० वर्षं व ८ दिवस होती. त्यापूर्वी १७ फेब्रुवारी १५१० ते ३० मे १५१० म्हणजे ३ महिने १३ दिवस त्यांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवलं होतं. एकूण ४५० वर्षं, ३ महिने व २१ दिवस त्यांनी गोव्यावर राज्य केलं. गोव्याचा इतिहास हा एका पारतंत्र्यानं पीडलेल्या, आर्थिक मागासलेपणानं गांजलेल्या, हताश होऊन जे भोगवट्याला आलं आहे ते निमूट स्वीकारणा-या सोशीक जनसमूहाचा इतिहास आहे. अंधा-या खोलीत वर्षानुवर्षं कोंडून पडलेल्या माणसाला दरवाजा अचानक सताड उघडा झाल्यावर जे वाटेल, ते व तसंच मुक्तीनंतर गोव्याच्या जनतेला वाटलं असलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या वेळी बंडखोरांनी बॅस्टिल व कॅसल तुरुंग फोडून वर्षानुवर्षं अंधारकोठड्यात खितपत पडल्या कैद्यांना मोकळं केलं, तेव्हा त्यांना कुठं जावं ते कळेना. ते भिरभिरले नि त्यातले बरेच जण आपापल्या कोठड्यात जाऊन पडून राहिले. तसंच काहीसं सुरुवातीला गोव्य

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ डिसेंबर १६५४* इंदापूर येथील मशिदीसाठी एक चावर जमीन व तेल इत्यादिबाबत छत्रपति शिवाजीराजांचे पत्र. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ डिसेंबर १६५९* दौलोजीची कोकणावर चाल जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो. अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ डिसेंबर १

६ डिसेंबर १७०१*मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *६ डिसेंबर १६६३* सुरतेवर स्वारी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडावरून प्रस्थान. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *६ डिसेंबर १६६९* शिवापूर प्रमाणेच संभाजी महाराजांच्या नावानी 'संभापूर' नामक पेठ बसवण्याची आज्ञा मोरोपंत पिंगळे यांनी ६ डिसेंबर १६६९ रोजी केलेली दिसते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *६ डिसेंबर १७०१* मल्कापुरास मुक्काम करून विशालगडा नजीक अंबा येथे औरंगजेब ६ डिसेंबर १७०१ रोजी दाखल झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *६ डिसेंबर १९५६* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *६ डिसेंबर १९७६* क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मृत्यू स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००) 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीच

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*५ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *५ डिसेंबर १६५७* मुरादने "मउव्वाजुद्दिन" ही पदवी धारण करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेतला. औरंगजेब मात्र शांत होता. त्याने मुराद बरोबर हातमिळवणी केली. एक गुप्त करार झाला. मुरादने पंजाब, अफगणिस्थान, काश्मीर आणि सिंध प्रांत घ्यावा आणि उरलेला प्रदेश औरंगजेबाने घ्यावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *५ डिसेंबर १६६७* 'महान शिवाजी राजे व कौंट व्हिसेरेइ यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या कराराचा मसुदा' 'महान कौंट व्हिसेरेइ यानी जो करारनामा पाठविला त्याचा आशय असा : 'आमच्या राज्याच्या आश्रयास आलेल्या देसायांचा पाठलाग करीत शिवाजी राजे आपल्या सैन्यासह आमच्या राज्यात घुसल्याचे पाहून आम्हाला फार वाईट वाटले. त्याचे परिमार्जन करण्यासाठी शिवाजी राजे यानी आम्हाला वारंवार पत्रे पाथ्व्वून दिलगिरी प्रदर्शित केली व ह्या राज्याशी असलेली त्यांची मैत्री टिकविण्याची व ती पुढे चालू ठेवण्याची इच्छा दर्शविली. त्याच्या विनंतीस अनुसरून आम्ही पुढील अटी सुचविल्या : १. शिवाजी राजे यांच्या सैन्याने बार्देशमध्ये दि. १९ नवंबर १६६७ रोजी जी बायका मुल