आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*५ डिसेंबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*५ डिसेंबर १६५७*
मुरादने "मउव्वाजुद्दिन" ही पदवी धारण करुन स्वत:ला राज्याभिषेक करुन घेतला. औरंगजेब मात्र शांत होता. त्याने मुराद बरोबर हातमिळवणी केली. एक गुप्त करार झाला. मुरादने पंजाब, अफगणिस्थान, काश्मीर आणि सिंध प्रांत घ्यावा आणि उरलेला प्रदेश औरंगजेबाने घ्यावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*५ डिसेंबर १६६७*
'महान शिवाजी राजे व कौंट व्हिसेरेइ यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या कराराचा मसुदा'
'महान कौंट व्हिसेरेइ यानी जो करारनामा पाठविला त्याचा आशय असा :
'आमच्या राज्याच्या आश्रयास आलेल्या देसायांचा पाठलाग करीत शिवाजी राजे आपल्या सैन्यासह आमच्या राज्यात घुसल्याचे पाहून आम्हाला फार वाईट वाटले. त्याचे परिमार्जन करण्यासाठी शिवाजी राजे यानी आम्हाला वारंवार पत्रे पाथ्व्वून दिलगिरी प्रदर्शित केली व ह्या राज्याशी असलेली त्यांची मैत्री टिकविण्याची व ती पुढे चालू ठेवण्याची इच्छा दर्शविली. त्याच्या विनंतीस अनुसरून आम्ही पुढील अटी सुचविल्या :
१. शिवाजी राजे यांच्या सैन्याने बार्देशमध्ये दि. १९ नवंबर १६६७ रोजी जी बायका मुले कैद करून नेली त्याना त्यानी खंडणी न घेता अथवा त्याना ओलीस न ठेवता सोडून द्यावे त्याचप्रमाणे आमच्या स्वामीच्या प्रजाजनांची गुरेढोरे आणि गोणीचे बैल पळविण्यात आले, तेही परत करावेत. कारण महान व्हिसेरेइ यानी ज्या अर्थी सौम्यपणे लिहिले त्याअर्थी आणि त्यानी लिहिल्याप्रमाणे जी माणसे इकडे कैद करून ठेवण्यात आली होती, त्याना एक छदामही न घेता मुक्त करून, पाद्रि गोंसालु मार्तीश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
२. लखम सावंत आणि केशव नाईक हे जे देसाई आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिले आहेत. त्याना ताकीद करण्यात येत आहे की, त्यांचे वास्तव्य आमच्या राज्यात असेस्तोवर तो त्यांनी शिवाजी राजे यांच्याशी अथवा त्यांच्या प्रजाजनाशी युद्ध करू नये वा त्यांची कुरापत काढू नये. त्यानी जर तसे केले, आणि ते जर मला कळले, अथवा शिवाजी राजे यानी माझ्या निदर्शनास आणले, तर त्याना आमच्या स्वामीच्या राज्यात फिरून प्रवेश मिळणार नाही. आमच्या राज्यात असलेले नारबा सावंत आणि मल्लू शेणवी या दोघाना देखील असाच इशारा देण्यात येत आहे. जे देसाई आमच्या राज्यात येऊन राहिले आहेत, त्यानी बंडाळीस प्रवृत्त होऊ नये म्हणून त्याना गोवा शहरातच वास्तव्य करण्याची सक्ती केली जाईल. त्यानी साष्टीत अथवा बार्देशमध्ये काही गडबड न करता राहिले पाहिजे. त्यानी दंगेधोपे माजविले अथवा या राज्यातील प्रजाजनाची कुरापत काढली, तर त्याना या बेटातून हद्दपार करण्यात येईल.
३. बालाघाटातून जो व्यापारी माल आणि गोणीचे बैल या बेटात तसेच साष्टी आणि बार्देश प्रांतात येतील त्याना प्रतिबंध केला जाऊ नये, अथवा माल अडवून ठेवण्यात येऊ नये. तसेच या बेटांतून अथवा आमच्या स्वामीच्या इतर प्रदेशातून जे गोणीचे बैल बालाघाटी माल आणण्यासाठी जातील त्याना अडथळा केला जाऊ नये. शिवाजी राजे आणि आदिलशहा यांच्यामध्ये युद्ध जुंपले, तरी देखील हा व्यापार चालू राहावा.
४. उभय पक्षांची जमिनीवर आणि समुद्रावरही मैत्री असावी. जर या मैत्रीत व्यत्यय येण्यासारखा एकादे कृत्य घडले तर शिवाजी राजे यानी कौंट व्हिसेरेइ यांच्याकडे व कौंट व्हिसेरेइ यानी शिवाजी राजे यांच्याकडे त्याचा खुलासा मागवा. हा खुलासा मिळाल्याखेरीज मैत्री भंग पावू नये.
उपरिनिर्दिष्ट अट मान्य करण्यात येत आहे.
५. शिवाजी राजे यांना कौंट व्हिसेरेइ यांच्याशी एकाद्या कामाविषयी वाटाघाटी करायच्या असतील, तर एकाद्या विश्वासू मनुष्यामार्फत त्या करता येतील. तीच गोष्ट हत्यारांच्या उपयोगाचीही आहे.
गोवा ५ डिसेंबर १६६७
कौंट व्हिसेरेइ यानी लिहिल्याप्रमाणे व उल्लेखिल्याप्रमाणे मी हे मान्य करीत आहे.
२५ जमादिलाकर, १०६८ पोर्तुगीज ११ डिसेंबर १६६७
शिवाजी राजे यांचा शिक्का.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*५ डिसेंबर १६७३*
छत्रपती शिवरायांनी सर्जाखानाचा पराभव करून त्यास ठार मारले.
सन १६७३ पावसाळा थांबला आणि राजांचे विजयी अश्व पुन्हा दौडू लागले मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागले, याच सुमारास कर्नाटकात यादवी निर्माण होऊन मृत राज्याच्या विधवा पत्नीने महाराजांची मदत मागितल्यावरून राजांनी रायगड सोडला.
राजे हुबळी, काद्रा, कारवार, बंकापूर या भागात स्वारीवर गेले. या भागात मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोलखानने सर्जाखानाची रवानगी केली. त्याने मराठ्यांना चांदगड परिसरात घाटले. झालेल्या झुंजीमध्ये मराठ्यांच्या बाजूचे विठोजी शिंदे नामक एक नामांकित सरदार ठार झाले. पण मराठ्यांनी सर्जाखानला मागे रेटलाच व ते बंकापूरच्या दिशेने पुढे सरकले तर बंकापूर ला बहलोलखान हा अडथळा म्हणून समोर आला. चिडलेले मराठे यानंतर पन्हाळ्याच्या रोखाने मागे फिरले. पन्हाळ्याजवळ बेहलोलच्या सैन्याशी मराठ्यांचे घनघोर युद्ध झाले. या युद्धात विठोजी शिंदेच्या हत्येचा सूड सर्जाखानला मारून उगवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*५ डिसेंबर १६८२*
छत्रपती संभाजीराज्यांचे सरदार नारो त्रिमल आणि मुघल सरदार माणकोजी यांच्यात चकमक झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*५ डिसेंबर १७४६*
सदाशिवराव भाऊसाहेब अवघ्या सोळाव्या वर्षी महादजीपंत पुरंदरे यांच्यासह दिनांक ५ डिसेंबर सन १७४६ रोजी कर्नाटक मोहीमेवर रवाना झाले. या मोहिमेत पाच्छापूर, कित्तूर, परसगड, बदामी, यादवाड, बसवपट्टण, बागलकोट वगैरे ३६ परगणे काबीज केले. बहादूरभेंड्याचा किल्लाही घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*५ डिसेंबर १७९६*
छत्रपती धाकटे शाहूराजे यांच्याकडून बाजीकृष्ण शेलूकर यांनी बाजीराव रघुनाथ तथा दुसरे बाजीराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे आणून दिली. ११ फेब्रुवारी १८१८ रोजी पेशवेपदावरुन बडतर्फ करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment