आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*९ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ डिसेंबर १६५४*
इंदापूर येथील मशिदीसाठी एक चावर जमीन व तेल इत्यादिबाबत छत्रपति शिवाजीराजांचे पत्र.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ डिसेंबर १६५९*
दौलोजीची कोकणावर चाल
जेव्हा शिवाजी राजे प्रतापगड - वाई - सातारा - कोल्हापूर भागातल्या आदिलशाही चौक्या जिंकत होते तेव्हा त्यांचा सरदार दौलोजी तळ कोकणातून थेट राजापूर पर्यंत गेला होता असे इंग्रज व वलंदेज (Dutch) साधनांमधून दिसते. राजापूरच्या इंग्रजांच्या वखारीतून त्यांच्या सुरतेच्या वखारीला ९ डिसेंबर १६५९ ला लिहीलेल्या पत्रात हा उल्लेख सापडतो.
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या ह्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले. इंग्रजांच्या पत्रावरुन हे स्पष्ट आहे की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचला नव्हता. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती. ह्याची माहिती छत्रपती शिवाजी राजाला होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते. पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ डिसेंबर १६६६*
पुरंदर तहानंतर मोंगल-मराठा फौजा विजापूरवर निघाल्या. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजांचा सेनापती नेताजी पालकर यांनी फलटणचा किल्ला मोंगलांना घेऊन दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ डिसेंबर १६७३*
छत्रपती शिवराय कर्नाटकातील कारवार येथे दाखल झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ डिसेंबर १६८१*
मराठ्यांचा छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली अभेद्य अशा सागरी जलदुर्ग "किल्ले जंजिरा" वर हल्ला. पण इकडे मुघल सैन्य पनवेल पर्यंत येऊन धडकलं होतं आणि राजधानी "किल्ले रायगड" वर हल्ल्याचा त्यांचा डाव होता.
छत्रपती संभाजीराजांना ही खबर मिळताच मराठ्यांना पुन्हा एकदा जंजिऱ्याच्या या मोहीमेतून माघार घ्यावी लागली.
कारण त्यावेळी जंजिरा जिंकण्यापेक्षा राजधानी "किल्ले रायगड" वाचविणे महत्वाचे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*९ डिसेंबर १७६१*
छत्रपती महाराणी ताराराणी स्मृतिदिन
महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांच्या कन्या होत्या.

महाराणी ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला. छत्रपती राजाराम महाराजांशी त्यांचे लग्न १६८३-८४ च्या सुमारास झाले.२५ मार्च १६८९ रोजी मोघलांनी रायगडांस वेढा घातला असता त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई या विशाळगड येथे राहिल्या.रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली.सन १६९४ साली ताराबाई,राजसबाई व अंबिकाबाई यांच्यासह जिंजीला पोहचल्या. ९ जून १६९६ रोजी त्यांना शिवाजी हा पुत्र झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४