आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩#११_डिसेंबर

🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_डिसेंबर_१६६४
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग ताब्यात घेतला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#११_डिसेंबर_१६६९
सरसेनापती प्रतापराव गुजर व निराजी रावजी यांना धरण्याविषयीचे फर्मान अखेर आजच्या दिवशी मुअज्जमला मिळाले.
३ डिसेंबर १६६९ रोजी सगळे जण निसटले होते, त्याप्रमाणे मुअज्जमने औरंगजेबाला लिहून पाठवले की, सगळे जण निसटून गेले, हाजिर असते तर कैद केले असते. याच घटनेनंतर शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्यातील तह आधिकृतरित्या मोडला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#११_डिसेंबर_१६८३
शंभूराजांनी गोव्यावर चढाई केली आणि त्यांच्या या झंझावातामुळे फिरंग्यांनी आपली राजधानी मार्मा गोव्याला हलवली होती.
आपल्या मातृभूमीला लागलेली ही कीड शंभुराजेंना काढायची होती आणि इतक्यात शहजादा शहाआलम मोठ्या सैन्यानिशी तळकोकणात दाखल होण्याची खबर येऊन धडकली आणि राजांना माघार घेणे भाग पडले पण परतताना शंभूराजांनी साष्टी आणि बारदेशवर एकाच वेळी हल्ले चढवले.
११ डिसेंबरला मराठे मडगावला आले.
कुंकळी व असोळण्याच्या लोकांनी फिरणग्यांना देतो तितका महसूल देण्याचे कबूल केले.
१३ डिसेंबर १६८३ च्या एका अहवालात
"पोर्तुगीज नावे निशाणी आणि ख्रिश्चन लोक गोव्यात शिल्लक ठेवणार नाही"
असे संभाजीराजेंनी म्हणल्याचे व्हाइसरायने नमूद केले होते.
थिए किल्ल्यावर हल्ला चढवून मराठ्यांनी फिरंग्यांना सळो की पळो करून सोडले इतकेच नव्हे तर पाणी प्यायचे सुद्धा बंद केले.
साष्टी आणि बारदेशात जवळ जवळ २६ दिवस मराठ्यांचे भगवे वादळ घोंगावत होते.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
#संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
#सहयाद्री_प्रतिष्ठान_महाराष्ट्र_राज्य
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
๑ ۩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...