आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१० डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० डिसेंबर १५१०*
भारतावर सर्वाधिक काळ (४५० वर्षे) युरोपियन-(पोर्तुगीज)  सत्तेने राज्य केले.
गोव्यात पोर्तुगीज सत्ता १० डिसेंबर १५१० पासून १८ डिसेंबर १९६१ पर्यंत म्हणजे ४५० वर्षं व ८ दिवस होती. त्यापूर्वी १७ फेब्रुवारी १५१० ते ३० मे १५१० म्हणजे ३ महिने १३ दिवस त्यांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवलं होतं. एकूण ४५० वर्षं, ३ महिने व २१ दिवस त्यांनी गोव्यावर राज्य केलं.
गोव्याचा इतिहास हा एका पारतंत्र्यानं पीडलेल्या, आर्थिक मागासलेपणानं गांजलेल्या, हताश होऊन जे भोगवट्याला आलं आहे ते निमूट स्वीकारणा-या सोशीक जनसमूहाचा इतिहास आहे. अंधा-या खोलीत वर्षानुवर्षं कोंडून पडलेल्या माणसाला दरवाजा अचानक सताड उघडा झाल्यावर जे वाटेल, ते व तसंच मुक्तीनंतर गोव्याच्या जनतेला वाटलं असलं पाहिजे. फ्रेंच राज्यक्रान्तीच्या वेळी बंडखोरांनी बॅस्टिल व कॅसल तुरुंग फोडून वर्षानुवर्षं अंधारकोठड्यात खितपत पडल्या कैद्यांना मोकळं केलं, तेव्हा त्यांना कुठं जावं ते कळेना. ते भिरभिरले नि त्यातले बरेच जण आपापल्या कोठड्यात जाऊन पडून राहिले. तसंच काहीसं सुरुवातीला गोव्यातील एका विशिष्ट वर्गाचं झालं. स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कळायला काही वर्षं जावी लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० डिसेंबर १६५९*
"हेन्री रेव्हींग्टन" या इंग्रज अधिकाऱ्यानेे राजापूरहून लंडनला एक पत्र पाठवले. यात अफजलखान वधाबाबत व छत्रपती शिवाजीराजेंनी आदीलशाहीस धडा शिकविण्याबाबत उघडलेल्या मोहीमेबाबत उल्लेख केला.
"एका महिन्यात हि दंगल शांत होईल असं वाटते. कारण शिवाजीचा बाप शहाजी दक्षिणेकडे आहे ; तो १७००० सैन्य घेऊन आठ दिवसांत येईल अशी अपेक्षा आहे. तो राजधानी ( विजापूर ) वर चालून जाईल आणि तेथील सैन्य अपुरे असल्यामुळे हे राज्य बुडेल." अशाच प्रकारचा उल्लेख पसासं मधील ले. क्र. ७९२, ८१० या गोवेकर पोर्तुगीज गव्हर्नरच्या पत्रात आहे. फरक फक्त इतकाच कि, यात शहाजीचा उल्लेख नाही. परंतु शिवाजी विजापूर बुडवण्याइतपत समर्थ असल्याची पोर्तुगीजांनी यात कबुली दिली आहे. तीच गोष्ट याच पसासं ले. क्र. ८१२ या वेंगुर्ल्याच्या डचांच्या पत्राची. शिवाजी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकण्यापूर्वी - नंतरची हि पत्रे असून या सर्वांचं सारांश, इत्यर्थ हाच आहे कि, स. १६६० मध्ये शिवाजी विजापुरी सत्ता समूळ उखडून काढण्याइतपत समर्थ होता, बलवान होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० डिसेंबर १६५९*
छत्रपती शिवरायांचे सरदार दौलोजीने कोकणातील "दाभोळ" किनारा जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० डिसेंबर १६६१*
"सरसेनापती नेताजी पालकर" हे सुपे ते परिंडा या मुघल परगण्यात भयानक धुमाकुळ घालत असल्याची खबर शाहीस्तेखानाला पुण्यातील लाल महालात समजली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१० डिसेंबर १७४७*
नानासाहेब पेशवेंची नेवाईवर स्वारी
छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेबांस २५ जून सन १७४० रोजी पेशवेपदावर नियुक्त केले. तदनंरच्या
श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ  नानासाहेब पेशवे यांच्या २१ वर्षांच्या पेशवेपदाच्या काळात नानासाहेबांनी स्वतः जातीने खालील मोहिमा केल्या. त्यातील एक नेवाईच्या स्वारीसाठी पुण्यातून प्रस्थान.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...