आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ डिसेंबर

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १६४४*
सदर पत्र शाहजीराजे भोसले यांनी महादभट बिन तिमणभट यांस मार्गशीर्ष वद्य ९, शके १५६६ दि. १२ डिसेंबर १६४४ रोजी लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, 'तुमच्या वडिलांना तिमणभट बिन दामोदरभट यांना आमच्या मातुश्री उमाई आवा यांनी घृष्णेश्वराचा अभिषेक सांगितला होता. त्याप्रमाणे तुम्हीही अभिषेक करीत जाणे.' ह्यासाठी शाहजीराजांनी वर्षाचे १७ होन दिलेले आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १६७३*
छत्रपती शिवरायांचा कर्नाटकातील हुबळीवर हल्ला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १६८४*
१६८१ च्या एप्रिल महिन्यापासून मुघलांनी नाशिक जिल्ह्यात आक्रमक हालचाली सुरू केल्या होत्या. दिंडोरी तालुक्यातील रामसेज किल्ल्याची माहिती मुघल सरदार शहाबुद्दीन खानाला असल्याने औरंगजेबाने खानाला रामसेजला वेढा देण्यासाठी पाठवले होते. पण रामसेज किल्ल्याचा किल्लेदार हा अत्यंत अनुभवी आणि कसलेला योद्धा होता. शिवाय जवळच्याच त्रिंम्बकगडावरून केशव त्रिमल हे रामसेजला युद्धसाहित्य पुरवठा करत होते. शहाबुद्दीन खानाची मात्र त्याच्यापुढे चालेना. त्यामुळे औरंगजेबाने खानाला परत बोलावून त्याच्या जागी खानजहान कोकलताश याची नेमणूक केली. पण अनेक नामांकित सरदार मदतीस पाठवूनही मराठ्यांच्या चिवट प्रतिकाराने खानजहान बहादूर अपयशी ठरला. सण १६८४ चा डिसेंबर महिना उगवला तरी रामसेज मुघलांना घेता आला नव्हता. १६८४ च्या डिसेंबर महिन्यात मराठ्यांची फौज मुघली प्रदेशातील गावावर हल्ला करण्यासाठी किल्ल्याच्या जवळपास जमली होती. ही बातमी मुघलांना समजताच नाशिकहून इकरामखान बहादूर याने त्या भागात येऊन मराठ्यांशी लढाई केली. या लढाईत मराठ्यांची २०० माणसे कामी आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १६८५*
राज्यपदावर आल्यावर संभाजीराजेंनी आपल्या वडिलांच्या धोरणाचा अवलंब करत मुघली हद्दीत हल्ला करणे सुरू ठेवले. दक्खणेत आलेल्या औरंगजेबाची डाळ मराठ्यापुढे शिजत नसल्याने त्याने १६८५ मध्ये आपला मोर्चा विजापुर आणि गोवळकोंड्याकडे वळवला होता. ही संधी साधून मराठ्यांनी मुघल हद्दीतील धरणगावावर हल्ला केला. १६८५ मधील फेब्रुवारी महिन्यात मराठा सरदार भिमाजी मोरे हे वऱ्हाडत गेले होते. एका मुघल सरादाराने पाठलाग केल्याने ते धरणगावजवळ आले. धरणगावची लूट घेऊन जात असताना मुघल सरदार मूनव्वर खानाने त्यांचा पाठलाग सुरू केला. याच वेळी निळो मोरेश्वर आणि रंगराव हे दोघे ७०० स्वारासह धरणगावला गेले. थोड्या सैन्यानिशी मराठ्यांनी सकाळीच शहर लुटून अनेक घरांना आगी लावल्या. मराठ्यांनी यावेळी इंग्रजांची वखारही जाळली. ही बातमी समजताच औरंगजेबाने आपले सरदार धरणगावाला पाठवले. दोन्ही सैन्यात ७ फेब्रुवारी १६८५ ला चकमकी उडाल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १६९०*
छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात रामचंद्रपंत हे अमात्य पदावर नव्हते असे दिसते. अण्णाजी दत्तो च्या मृत्युनंतर ते इ.स. १६९० पर्यंत तो सचिव पदावर होता. पुढे १२ डिसेंबर १६९० साली छत्रपती राजाराम महाराजांनी त्यास अमात्य पद दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १७३९*
सन १७३९ च्या मध्यापासून नासीरजंगाने लढाईची तयारी जोरदार सुरू केली होती. बाजीरांना पराभूत करणे हे आपल्याला सहज शक्य आहे असे त्यास वाटत असे. नासीरजंगांचा बंदोबस्त करायचा हे राऊंनी अगोदरच ठरवले होते. अखेर दिनांक १२ डिसेंबर सन १७३९ रोजी राऊंनी नासीरजंगा विरूध्द चढाई सुरू केली. काही दिवसांतच अप्पासाहेब त्याना अहमदनगर जवळ येऊन मिळाले. राऊंनी निजामाची राजधानी हैदराबादेवरच चालून जाण्याची योजना आखली. नासीरजंग औरंगाबादेकडून चालून गोदावरीकडे आला. या युध्दात मराठ्यांनी नासीरजंगास औरंगाबादेपर्यंत पळवून लावले. राऊंनी निजामाच्या गळ्यात पट्टा बांधण्याचा नेहमीचाच "पालखेड फाॅर्म्यूला" याही वेळी वापरला. राऊंच्या साथीला होते अप्पासाहेब, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर आदी दिग्गज सरदार.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १७५०*
मल्हारराव जयपूरच्या शहराबाहेर पोहोचले.
सप्टेंबर १७५० मध्ये मराठे निघाले. खंडेराव व मल्हारराव होळकर, गंगोबा तात्या, जयाप्पा शिंदे असे मातब्बर असामी ससैन्य जयपूरच्या रोखाने पुन्हा निघाले. केशवदास मल्हाररावचा चांगला मित्र होता त्यामुळे मल्हारराव चांगलाच संतप्त झाला होता. ईश्वरीसिन्हाकडून आलेल्या वकिलाला त्याने धुडकावून लावले आणि खंडणीचे १० लाख रुपये मागितले. ईश्वरीसिन्हाने हा क्रोध प्रथम ओळखलाच नाही आणि वकीलासोबत आधी २ आणि नंतर ४ लाख रुपये पाठवले, ह्या कृत्याने तर मल्हारराव जास्त संतापला आणि त्याने जयपूर खालसा करण्याची जणू प्रतीज्ञाच केली. जयपूरच्या रोखाने मल्हारराव निघाला आणि १२ डिसेंबर रोजी तो जयपूरच्या शहराबाहेर पोहोचला. ईश्वरीसिन्हाला ही खबर मिळाली त्याने आपले प्रिय सल्लागार माहूत आणि न्हावी ह्यांना पर्याय शोधायला सांगितला आणि त्यांच्या सांगण्यावरून एक छोटी कुमक मराठ्यांवर चालून गेली. संतप्त मराठ्यांनी एका प्रहरात जयपूर बाहेरील मैदानावर ह्या फौजेचा निकाल लावला आणि जयपूरच्या रोखाने निघाले. आता मात्र ईश्वरीसिंह चांगलाच घाबरला त्यानी पुन्हा आपल्या सल्लागारांना बोलावले पण तोवर सल्लागारांनी पळ काढला होता. प्रधान हरगोविंद ह्याने उरलेली तुटपुंजी फौज मराठ्यांवर पाठवून स्वतः अज्ञात झाला होता. ईश्वरीसिन्हाला आता आपल्या कृतीचा पश्चाताप झाला. मल्हाररावच्या ताकदीचा अंदाज त्याला होता, बगृच्या किल्ल्यात बसून त्याने मराठ्यांची ताकद पहिली होती आणि आता तो भयंकर घाबरला, त्याला ह्यातून काहीच मार्ग सुचेना. कुणीही सल्लागार मिळेना. मराठे जयपुरात दाखल झाल्याची एक उडती अफवा दुपारच्या शेवटी त्याला मिळाली आणि सायंकाळच्या पहिल्या तासी त्याने एक भयानक पवित्रा घेतला.
त्याने आपल्या नोकरांना बोलावले आणि आपल्याला काही औषध करण्याकरिता हवे आहे असे सांगून त्याने नोकरांकरवी सोमलखार आणि एक जहरी नाग मागवला. रात्रीचा अंमल सुरु होताच त्याने, त्याच्या ३ राण्यांनी आणि एका आवडत्या रखेलीने सोमलखार प्राशन करून व नाग दंश करवून आत्महत्या केली. एका बंद महालात घडलेली ही दुर्दैवी घटना पुढे सुमारे १८ तास गुप्त राहिली. अनाथ जयपूर स्वैर मर्जीने प्रतिकार करीत होते. प्रेते तशीच सडत कुजत पडली होती. मराठे कब्जा करीत शहरात पोहोचले आणि त्यांना ही शोकांतिका समजली. वृद्ध मंत्री विद्याधर आणि हरगोविंद हे आता महालात जमले होते आणि त्यांनी ही वार्ता मराठ्यांना सांगितली. १८ तास राजाचे कलेवर अग्निसंस्काराशिवाय पडून होते. मल्हाररावाने जरूर त्या खर्चास पैसे देवून त्या मृतदेहावर राजवाड्याच्या बागेत अंत्यसंस्कार करविले. त्या अग्नीत ईश्वरीसिंहाची एक राणी आणि आणखी २० रखेल्या सती गेल्या. राजवाड्यात मराठे पहारेकरी बसले आणि जयपूरवर मराठी अंमल.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १८४१*
सेनापती झोरावरसिंग याचा मृत्यू
पश्चिम तिबेटवर स्वारी करून विजय मिळविणारा पहिला भारतीय धाडसी सेनापती. जम्मू -काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात एका गावी डोग्रा रजपूत कुटुंबात जन्म. महाराजा रणजितसिंगाच्या लष्करात साधा सैनिक म्हणून भरती होऊन आपल्या लष्करी व प्रशासकीय गुणवत्तेवर त्याने वझीर हा सन्मान मिळविला. १८३८–४१ या काळात ५,००० मी. पेक्षा अधिक उंचीवरील बर्फमय तिबेट प्रदेशात लष्करी कामगिरी करून, लडाख आणि बल्टिस्तान हे भाग त्याने जम्मू-काश्मीर राज्याला जोडले. १८४१ मध्ये तिबेट मुक्त करण्यासाठी लेहपासून कूच करून वाटेत रूडोक, ताशीगाँग व गार्टोक घेऊन मानस सरोवरापर्यंत त्याने मजल मारली. कार्टुंग व ताक्लाकोट येथे चिनी सैन्याशी लढाया झाल्या. त्या प्रसंगी चिनी सेनापतीस पळ काढावा लागला व त्याचा मानतलाई ध्वज झोरावरसिंगने हस्तगत केला. शेवटी मानस सरोवरापाशी तीर्थपुरी येथे भयंकर थंडी असताना चिनी सैन्याचा डोग्रा सेनेवर हल्ला होऊन त्यात झोरावरसिंग ठार झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ डिसेंबर १९३०*
हुतात्मा बाबू गेनू सैद स्मृतिदिन
(जन्म इ.स. १९०८; महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, महाराष्ट्र) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवा पडले. १२ डिसेंबर १९३० ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...