Posts

राजश्री संताजी घोरपडे (ममलकतमदार) यास देशमुख⛳⛳श १६१४श्रावण व १११ता २९जुलै १६९२ श्री

⛳⛳राजश्री संताजी घोरपडे (ममलकतमदार) यास देशमुख⛳⛳ श १६१४श्रावण व १११ ता २९जुलै १६९२               श्री अखंडित लक्ष्मा अलंकृत राजमान्य स्नेहांकित रामचंद्र अमात्य आशीर्वाद सुरुसन अल्लास तिस्सैन मेय्या व अल्लफ राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जातेसमयी तुम्हास या प्रांतात ठेऊन गेले  त्यासमयी इक्डे गलिमाची  धामधूम बहुत होऊन कुल देशदुर्ग हस्तगत केली होती ता गेला राज्यामध्ये काही अर्थ उरला नाही कुल मराठे याणी इमान खत्ता करुन गलिमाकडे गेले परतु तुम्ही इमान खत्ता न करिता राजश्रीच्या पायाशी बहुतच एकनिष्ठ धरून जमाव करुन शेख  निजाम व सर्जाखान व रणमस्तखान व जानसरखान असे उमदे वजीर बुडविले जागोजाग गलीमास कोट घालून नेस्तनाबूद केले आणि देश साडविला राज्य संरक्षणाच्या  प्रसगांस असाधारण श्रम केले,  अवरगजेबास दहशत लाविली पुढेही कित्येक स्वामिकार्याच्या ठाया हिम्मत धारिता या करिता तुम्हारविर राजश्री स्वामी संतोष होऊन मामले मिरज कर्याती २२ बेवीस एथील देशमुख होत ते नस्तनाबृद झाले त्याचे मुतालक होते ते बळावून देशमुखी वतन खात होते तेही दुर्बुद्धी धरून गलिमाशा मिळून फिसालत केली,  एकनिष्ठ धरून इकडे येऊन भेटले नाही

श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या बाबत जगप्रसिद्ध लेखकांनी केलेले मूल्यमापन*______________________________

*श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार यांच्या बाबत जगप्रसिद्ध लेखकांनी केलेले मूल्यमापन* ______________________________ रुलर्स ऑफ इंडिया लेखक किनी महादजीं विषयी म्हणतो.. Amongst Asiatic public men no name to match Madhva Sindhia- पान क्रमांक १९१ *अर्थ:-तात्काळ भारतात कोणी अशा सेनानीच नाव नाही जो की महादजी शिंदेंची बरोबरी करू शकेल* तत्कालीन(महादजींच्या समकालीन) जनरल सर जॉन मालकम याने आपल्या Memoirs Of Central India  या पुस्तकात केलेला उल्लेख "Steel under Velvet Gloves" *अर्थ:- मखमली कपडयात लोखंड* "This  able chief was the principal oppose of the english...""..This able  chief was, throughout his life,consistent in the part he acted" "His  actions were suited to the Constitution of the society he was born in  which had a just pride in his talent & energy and esteemed him of  the ablest as he was the most successful of mahratta leaders ever."He  cherished the intention of giving to his vast possession a more compact  & permanent From *अर्थ:-&q

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ एप्रिल १६३३* मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ एप्रिल १६६०* पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तेशामखान हा वारला; त्यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ एप्रिल १६६९* उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात. सूर्य ग्रहण आले, या सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ एप्रिल १६७०* औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा ही ९ एप्रिल १६७० ला वारली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *९ एप्रिल १६७४* इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्झेंडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्झेंडन व उष्टीक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले; त्

गायकवाड घराण्याचा कुळाचार - - आडनाव - गायकवाड

गायकवाड घराण्याचा कुळाचार - -  आडनाव  - गायकवाड  कुळ - यदुवंशी  गोत्र - गौतम आपले पूर्वज उत्तरेत वास्तव्यास असताना कुलदेवी  - चामुंडेश्वरी  कुलदेवता  - भैरवनाथ  आराध्य देव  - शंकर-पार्वती आपले पूर्वज दक्षिणेमध्ये आल्यानंतर कुलदेवी  - रेणुकादेवी ( माहुरगड )  कुलदैवत - निमगाव चा खंडोबा  छत्र सिंहासन झेंडा  - गडद लाल जरीचा चमकदार कपडा  ध्वजस्तंभ  - गरुड , शंख , चक्र  - सोनेरी रंगाचे  प्रवर  - तीन पदरी जाणवे आपल्या  अंगावर असलेच पाहिजे  , प्रत्येक क्षत्रियाच्या डोक्यावर शेंडी असलीच पाहिजे , हातात कोणत्याही बोटात अंगठी असलीच पाहिजे.  विजय शस्त्र   - सोन्याच्या मुठीची तलवार  शाखा  - माध्यमिक  वेद  - यजुर्वेद  आराध्य नदी - यमुना  आराध्य वृक्ष - कळंब  आराध्यपक्षी - गरुड  आराध्य पशु - गाय  आराध्य देव - भगवान श्रीकृष्ण  प्रत्येकाच्या घरात श्रीकृष्णाचा फोटो असलाच पाहिजे .  आराध्यशास्त्र - श्रीमद् भागवत पुराण  कुलदेवी पूजा  - नवरात्रीची नवमी, अश्विन नवरात्री , चैत्र नवरात्री .  कुलदेवता पूजा  - भैरव पूजा षष्ठी  • नवरात्रीचा सहावा दिवस  शस्त्र पूजा  - विजयादशमीच्या दिवशी करावी  सती पूजा  - अमावस्ये

फलटण प्रांत येथील मराठा सरदार मानकोजी गाढवे याना बजाजी नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या जमिनी बाबत ताम्रपट

फलटण प्रांत येथील मराठा सरदार मानकोजी गाढवे याना बजाजी नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या जमिनी बाबत  ताम्रपट  शिक्का - बजाजी म्हाहादाजी नाईक १) माहाराज राजे २) श्री बजाजी नाईक देशमुष(ख)पा।(परगणे) फळेटणा (फलटण ) माणीकोजी बीनजाउजी गाढवे मोकदम मैज(मौजे) कालजाये पा। ( काळज ) (परगणा) मा।(मजकूर)सुरसन अर्बामया आळफ सन हजार १११३ पट क्र १: श्री  (चौरसाकृती शिक्का: बजाजी महादाजी नईक) १) माहाराज राजे २) श्री बजाजी न ३) ईक देशमुख  ४) प|| फळटण म|| ५) तुकोजी बीन  ६) जाऊजी गाढवे  ७) मोकदम मैजे काल ८) जाये प|| म|| × ९) सुर सन अर्बा  १०) मया आळफ स ११) न हजार १११३ पट क्र २: १) ले तरी येणेप्र २) माणे खाऊन  ३) दीवान दीवा ४) ण नफरी कर ५) णे इनामपै ६) की समाई ७) क बिघे 6१० ८) दाहा बिघे  ९) तुज दिळ्हे ब १०) की कुळवा टीप: दोन्ही ताम्रपट कदाचित एकाच मोठ्या ताम्रपटाचा भाग आहेत पण मधले भाग गायब आहेत. पहिल्यानंतर थेट पाचवा आहे. वर्ष आहे सुहुर सन अर्बा मया व अलफ. म्हणजे इ.स. १७०३-१७०४. यात एक घोळ आहे तो म्हणजे या वर्षी हिजरी हा १११४-१५ आणि फसली १११३ सुरू होता. हिजरी सन चुकला आहे इथे (According to Khare Jantri). ताम्रपट

हंसाजी_ऊर्फ_हंबिरराव_सरसेनापती_पदी_विराजमान ८ एप्रिल १६७४, पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापती ची तलवार दिली.

#हंसाजी_ऊर्फ_हंबिरराव_सरसेनापती_पदी_विराजमान      ८ एप्रिल १६७४, पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापती ची तलवार दिली. त्यांना लहानपणा पासुन हंसाजी च म्हटले जायचे जसे कुडतोजी गुजर यांना सेनापती करताना प्रतापराव किताब दिला तसाच हंसाजी यांना ८ एप्रिल १६७४ रोजी #हंबीरराव हा किताब दिला. ...स्वराज्याच #सरसेनापती पद मिळणं हे पद मिळणे हि गोष्ट साधी नाही,हा  हे सर्वोच्च पद हंबीरराव यांना तलवार गाजऊन मिळाले.हंबिररावांनी त्यांच्या बुद्धी,तलवार, गनिमी कावा आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिल.  का . ना . साने लिखित सभासद बखरीत  प्रतापराव गुजरांच्या बरोबर हंसाजी मोहिते पंचहजारी सरदार होता . प्रतापराव गुजर व हबीरराव मोहिते यांनी १६७३ मध्ये सुरते वर स्वारी केली होती त्या वेळेस एक तुकडी प्रताप राव व एक तुकडी हंबीरराव अश्या दोन तुकड्या केल्या एक तुकडी बुऱ्हाणपूर कडे जाळपोळ करत गेली तर  दुसरी तुकडी घेऊन हंबीरराव स्वत  भडोच पर्यंत लूट करित गेले होते.    #प्रतापराव_गुजर_पडले त्यावेळेस हंसाजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संताजी व धनाजी हो मोजकी काही सैन्याची तुकडी यांना सोबत घेऊन लढाई केली.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *८ एप्रिल १६५७* २७ वर्षीय छत्रपती शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇   *८ एप्रिल १६६६* छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून औरंगाबादला पळून गेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *८ एप्रिल १६६७* महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. आपण वाचा. त्यातील मुख्य विषय असा की, ‘मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो, याचे मला वाईट वाटते. मी पूर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे.‘ औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली. सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. 🏇🚩🏇